आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य : जाणून घ्या, कसा राहील 26 जुलैपर्यंतचा तुमचा काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सात दिवसांची सुरुवात कर्क राशीतील बुध ग्रहापासून होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हा ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत आला आहे. आपल्या शत्रू ग्रहाच्या राशीत आल्यामुळे बुध काही लोकांसाठी अशुभ नक्की ठरेल, परंतु इतर ग्रहांच्या प्रभावाने या ग्रहाच अशुभ प्रभाव कमी होईल. बुद्धी, पैसा, बिझनेस, पार्टनर इ. गोष्टींवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. यांच्याशी संबंधित शुभ-अशुभ घटना या सात दिवसांमध्ये घडतील.

गुरु आणि सूर्य ग्रहानेसुद्धा नुकतेच रास परिवर्तन केले असून या दोन्ही ग्रहांचा शुभ-अशुभ प्रभाव सर्व राशींवर राहील. या आठवड्याच्या शेवटी सिंह राशीतील शुक्र वक्री होईल. एखादा ग्रह वक्री झाल्यास याचा अशुभ प्रभाव पडतो. शुक्र सुख, भोग, पैसा, आणि प्रेमाचा स्वामी असल्यामुळे लोकांना या कार्याशी संबंधित सुभ-अशुभ फळ प्राप्त होऊ शकतात. अशाप्रकारे हे सात दिवस काही लोकांसाठी खूप चांगले तर काहींसाठी त्रासदायक ठरू शकतात. तुमच्या राशीसाठी हे सात दिवस कसे राहतील हे जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...