आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य : डिसेंबर महिन्याची सुरुवात कशी राहणार तुमच्यासाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. तो या राशीचा स्वामी आहे. या व्यतिरिक्त चंद्रसुद्धा स्वतःच्या राशीत राहील. या स्थितीमुळे अनेक राशीच्या लोकांना फायदा होईल. तूळ राशीतील शुक्र अडकलेला पैसा आणि अचानक धनलाभ करून देऊ शकतो. या ग्रहाच्या प्रभावाने विविधप्रकारचे भौतिक सुख प्राप्त होतात. लव्ह लाइफवर या ग्रहाचा विशेष शुभ प्रभाव पडतो. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या काळात कन्या राशीत मंगळ आणि राहू हे दोन ग्रह राहतील. ग्रहांच्या या जोडीमुळे काही लोकांचे कर्ज मंजूर होईल व काहींची कर्जातून मुक्तता होईल.
हे सात दिवस राशीनुसार काही लोकांसाठी अडचणीचेसुद्धा ठरू शकतात. सूर्य आणि शनी एकाच राशीत असल्यामुळे आठवडाभर काही लोक तणावात राहतील. काही लोकांना जुने आजारही त्रस्त करू शकतात. नऊ ग्रहांच्या स्थितीनुसार हे सात दिवस सर्व राशींना संमिश्र फळ देणारे ठरू शकतात. तुमच्यासाठी हा आठवडा कसा राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...