आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजान दारुवालानुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील 10 मे पर्यंतचा काळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही राशिभविष्य वाचून आपल्या कामांचे आणि योजनांचे नियोजन करत असाल तर, येथे वाचा प्रख्यात ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी हा आठवडा ( ४ -१० मे ) कसा राहील.

मेष
श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुमची मिळालेल्या संधीचा लाभ घ्याल. जीवनात काही बदल घडतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रत्येक अडचणीवर मात करण्यात तुम्ही सक्षम आहात.
वृषभ
तुमची आर्थिक स्थिती देवसेंदिवस मजबूत होत जाईल.तुम्हाला कोणत्याही कामासाठी पैशांची अडचण भासणार नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. बृहस्पती ग्रहामुळे तुमच्यामध्ये उर्जा आणि स्फूर्तीचा संचार होईल.