आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुकाळ का मानला जातो अशुभ; वाचा, राहुकाळाशी संबंधित खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तामध्ये केले गेलेले कार्य शुभफळ प्रदान करते. त्याउलट एखादे शुभ कार्य मुहूर्त न पाहता केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. राहुकाळाला कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य मानले जात नाही. शुभ कार्य करण्यापूर्वी राहुकाळाचा अवश्य विचार करावा. राहुकाळाचे नाव सर्वांनीच ऐकले असेल परंतु फार कमी लोकांना राहुकाळा संदर्भात संपूर्ण माहिती असावी

90 मिनिटांचा असतो राहुकाळ
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळामधील आठव्या भागाचा स्वामी राहू असतो. यालाच राहूकाळ असे म्हणतात. प्रत्येक दिवशी ९० मिनिटांचा निश्चित राहू काळ असतो. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात केले गेलेले कोणतेही कार्य, खरेदी-विक्रीचे व्यवहार शुभ मानले जात नाहीत. ज्योतिष शास्त्रामध्ये राहुला छाया ग्रह मानले गेले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, राहुकाळ केव्हा असतो...
बातम्या आणखी आहेत...