आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 उपाय, जे बुधवारी करू शकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन मान्यतेनुसार श्रीगणेशाच्या पूजेचा विशेष दिवस बुधवार आहे. तसेच या दिवशी बुध ग्रहाची पूजा केली जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह अशुभ असेल तर बुधवारी येथे सांगण्यात आलेले खालील उपाय करू शकता...

1. बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर गणपती मंदिरात जाऊन श्रीगणेशाला 11 किंवा 21 दुर्वा अर्पण कराव्यात.
2. गायीला हिरवा चार टाकावा. शास्त्रानुसार गायीला पूजनीय आणि पवित्र मानले जाते. गायीची देव करणाऱ्या व्यक्तीवर सर्व देवी-देवतांची कृपा राहते.
3. एखाद्या गरजू वाय्क्तीला एखाद्या मंदिरात जाऊन हिरवे मुग दान करावेत. मुग बुध ग्रहाशी संबंधित धान्य आहे. याचे दान केल्यास बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात.
4. करंगळीमध्ये पन्ना रत्न धारण करावे. पन्ना रत्न धारण करण्यापूर्वी ज्योतिष विद्वानाचा सल्ला घ्यावा.
5. श्रीगणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा.