आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' पासून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अनुष्का शर्माने कमी वेळातच बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. वर्ष 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जब तक है जान' या चित्रपटातील अनुष्काच्या अभिनयाचे भरपूर कौतुक झाले आणि दर्शकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. वर्ष 2013 मध्ये अनुष्काचा 'मटरु की बिजली का मंडोला' या चित्रपटाने विशेष अशी काही कमाल पडद्यावर केली नाही. अनुष्काच्या कुंडलीतील ग्रह स्थितीनुसार 2014 वर्ष तिच्यासाठी संमिश्र फलदायी राहील.
अनुष्काचा जन्म 1 मे 1988 साली बंगळूरू येथे झाला. कुंडलीत शुक्र स्वग्रही वृषभ राशीचा तसेच सूर्य व मंगळ उच्च स्थितीमध्ये आहेत. चंद्रमा नीच स्थितीत आहे, जो विचलित करेल. अनुष्काच्या कुंडलीत सूर्य, बुध, गुरुची युती तर शुक्र स्वतःच्या राशीत मालव्य योग तयार करत आहे.
कसे राहील वर्ष 2014?
मालव्य योगात जन्मलेल्या अनुष्का शर्मासाठी वर्ष 2014 संमिश्र फलदायी राहील. बृहस्पतीच्या महादशेमध्ये शुक्राचे अंतर परस्पर विरोधी ग्रहांची दशा आहे, जी अनुष्कासाठी जास्त अनुकूल नाही. परंतु जाहिरातींच्या माध्यमातून अनुष्का छोट्या पडद्यावर दिसेल. मोठ्या यशासाठी अनुष्काला आणखी काही काळ वात पाहावी लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.