आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर कपूर : गुरूच्या महादशेमध्ये सुरु राहील यशस्वी घौडदौड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूरला पुढील सुपर स्टार म्हणणे वावगे ठरणार नाही. रॉकस्टार आणि बर्फी या चित्रपटांमध्ये रणबीरच्या अभिनयाचे कौशल्य सर्वांनीच पाहिले आहे. वर्ष 2013 मध्ये प्रदर्शित झालेला 'ये जवानी है दिवानी' चित्रपट सुपर हिट झाला. रणबीरच्या कुंडलीतील ग्रह-तारे सांगत आहे की, येणाऱ्या काळातही रणबीरला भरपूर यश प्राप्त होईल. जन्म कुंडलीनुसार वर्तमानात रणबीरला गुरूची महादशा सुरु आहे, जी त्याच्यासाठी लाभदायक राहील.

कसे राहील वर्ष 2014
रणबीर कपूरच्या कुंडलीनुसार वर्ष 2012 पासून त्याला गुरूची महादशा सुरु असून पुढील सोळा वर्षांपर्यंत लाभदायक राहील. या काळामध्ये रणबीरला मोठे यश प्राप्त होईल. रणबीरला सुपर स्टार बनण्याच्या विविध संधी चालून येतील. तूळ राशीमध्ये स्थित असलेला उच्चेचा शनि रणबीरला सर्वश्रेष्ठ बनवेल. रणबीरसाठी वर्ष 2014 खूप खास राहील. या काळामध्ये त्याला एक नवीन ओळख मिळेल.