हिंदू धर्मामध्ये मुला-मुलीची कुंडली पाहिल्यानंतरच लग्न निश्चित केले जाते. कुंडली पाहताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जाते. मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे का नाही, हे आवर्जून पाहिले जाते. कारण मुलाला किंवा मुलीला मंगळ असेल तर त्या दोघांचे लग्न केले जात नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार मुलगा आणि मुलगी दोघांनाही मंगळ असेल तर त्यांचे लग्न होऊ शकते. याच कारणामुळे मंगळ असलेल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमण्यात अडचणी निर्माण होतात. आज (9 डिसेंबर) अंगारिका चतुर्थी (चतुर्थी तिथी आणि मंगळवार योग) आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास या दोषाचे निवारण शक्य आहे.
मंगळ असलेल्या मुलासोबतच होते मंगळ असलेल्या मुलीचे लग्न
ज्योतिष शास्त्रानुसार मांगळिक लोकांवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव राहतो. मंगळ शुभ असेल तर मंगळ असलेल्या लोकांना मंगळ मालामाल करतो. मंगळ असलेल्या व्यक्ती
आपल्या जोडीदाराकडून प्रेम-प्रसंग संबंधात काही विशेष इच्छा बाळगतात. या इच्छा एखादी मांगळिक व्यक्तीच पूर्ण करू शकते. याच कारणामुळे मंगळ असलेल्या लोकांचे लग्न मांगळिक व्यक्तीसोबत केले जाते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, कोण असतात मांगळिक व मंगळ दोष निवारणाचे उपाय....