आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मपरीक्षणातून रागावर नियंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संतापी माणसांना राग येऊ नये, असे वाटत असते. कितीही रागीट असला तरी त्याला ही स्वत:ची कमकुवत बाजू वाटते. अनेक लोक तर यामुळे उदास होतात. राग संपवण्यासाठी एक छोटी गोष्ट जीवनशैलीचा एक भाग बनवा. फावला वेळ मिळाल्यानंतर काही जुन्या गोष्टी आठवा. पूर्वायुष्यात जा. तुम्ही ४० वर्षांचे असाल तर जीवनाचे तीन भागांत विभाजन करा. मग आयुष्यातील घटना आठवा. वयाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला तुमच्या संतापाचे मूळ दिसेल. त्याला खतपाणी मात्र दुसऱ्याकडून मिळते. आता तो तुमचा भूतकाळ आहे. घडून गेलेल्या गोष्टी संतापाच्या रूपाने इतरांवर ढकलता. ही एक साखळी आहे. तुम्ही विचार केल्यास कोणत्या गोष्टीवर राग आला होता, हे तुमच्या लक्षात येईल. मग तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की अजूनही आपण हेच करत आहोत. पूर्वी ज्या गोष्टींवर तुम्हाला राग येई त्यावर आता राग करू नका. मग बघा, हळूहळू तुम्ही रागापासून मुक्त व्हाल. दिवंगत माता-पिता, पूर्वज किंवा एखाद्या आराध्याचे छायाचित्र जवळ ठेवा. राग आल्यावर किंवा नंतर त्या फोटोकडे शांतपणे पाहा. किंबहुना त्या चित्रात तुम्ही पूर्णप्णे बुडून जायला हवे. हळूहळू तुम्ही रागातून मुक्त व्हाल. जीवनात यशस्वितेची प्रदीर्घ वाटचाल करण्याची इच्छा असल्यास त्यांनी ऊर्जेची बचत केली पाहिजे. कारण आतील ऊर्जा सर्वाधिक संपवण्याचे काम क्रोधामुळे होते.
पं. विजयशंकर मेहता