आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जसा विचार तसे जग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले मन वाईट दृष्टिकोनातून पाहते तेव्हा जगही तसेच वाटायला लागते. दु:ख स्वीकारणे हा मनाचा स्वभाव आहे. जगाकडे कसे पाहावे यासाठी श्रीराम किष्किंधा कांडात बालीची विधवा पत्नी ताराला समजून घेतले पाहिजे. या चर्चेवर तुलसीदास लिहितात, तारा बिकल देखी रघुराया दिन्ह गान हरी लिन्ही मारा ।। छिती जल पावक गगन समीरा । पंच रचित अति अधम सरीरा ।। व्याकूळ ताराकडे पाहून श्रीरघुनाथजीने तिला ज्ञान देऊन अज्ञान दूर केले.
त्यांनी म्हटले की, पृथ्वी, जल, अग्नि, आकाश आणि वायु या पंचतत्त्वापासून शरीराची रचना झाली आहे. प्रगट सो तनु तव आगे साेवा । जीव नित्य केही लागि तुम्ह रोवा ।। हे शरीर प्रत्यक्ष तुमच्यासमोर झोपले आहे आणि प्राण नित्य, निरंतर आहे. त्यामुळे तुम्ही कशासाठी अश्रू ढाळता? श्रीरामाने ताराला समजावून सांगितले की, निपचित पडलेले शरीर हे तुझ्या पतीचे होते. शरीराचा अंत झाल्यानंतर पाचही तत्त्वे आपला हिस्सा त्यातून नेतात. मात्र, त्यामध्ये असणारा आत्मा कधीच मृत होत नाही. ज्या शरीरासाठी तू रडत आहे, त्यातील आत्मा निघून गेल्यानंतर ठेवशील काय? या संवादातून आपणास हेच कळते की, जगाकडे कसे पाहतो त्यावरून ते चांगले वाई जाणवते. श्रीरामाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास जे आले ते जाईल.
जगातील कणन् कण परमात्म्याच्या रूपात पाहिल्यास कोणी दुरावले असेल, धोका दिला असेल तर आपण दु:खाकडे वेगळ्या भावनेने पाहू शकू. परमात्मा प्रत्येक गोष्टीत सामावला आहे. त्याला जेवढे द्यावयाचे तेवढे दिले आणि जेवढे घ्यावयाचे होते तेवढे घेतले. त्यामुळे काेणत्याही गोष्टीचे दु:ख मनाला लावून घेऊ नका. आपण त्याचा एक भाग आहोत, त्या पद्धतीनेच आनंदी राहा.
पं. विजयशंकर मेहता