आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान जयंतीला शुभ योग, तुमची प्रत्येक अडचण दूर करतील हे अचूक उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 11 एप्रिलला मंगळवारी आहेत. यसोबतच मंगळवार हा दिवस हनुमानाच्या उपासनेचा खास दिवस मानला जातो यामुळे या शुभ योगात काही खास उपाय केल्यास हनुमान प्रसन्न होऊन तुमची प्रत्येक अडचण दूर करू शकतात.

उपाय - 
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला लाल वस्त्र अर्पण केले जाते. हनुमानाला वस्त्र अर्पण करण्यापूर्वी स्वतः स्नान करून शुद्ध व्हावे. त्यानंतर लाल रंगाचे धोतर परिधान करावे. वस्त्र अर्पण करण्यासाठी चमेलीच्या तेलाचा उपयोग करावा. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा एक दिवा लावून ठेवावा. लाल वस्त्र अर्पण केल्यानंतर हनुमानाला गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करून केवड्याचे अत्तर लावावे. त्यानंतर गुळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर त्याच ठिकाणी बसून तुळशीच्या माळेने खालील मंत्राचा कमीत कमी पाच माळ जप करावा.

मंत्र -
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने।।

जप झाल्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या गुलाबाच्या हारातील एक फुल तोडून लाल कपड्यात बांधून धन स्थानावर ठेवा. या उपायाने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

हनुमानाला प्रसन्न करण्याचे इतर काही उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...