आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसातील पशूचा जन्म भीतीतून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पं. विजयशंकर मेहता - Divya Marathi
पं. विजयशंकर मेहता

पशू आणि भय या दोन्ही गोष्टींचा खोलवर संबंध आहे. पशू शक्तिशाली असतात. म्हणून ते माणसावर आक्रमक होतात; परंतु मूळ स्वरूपात त्यांना माणसाची भीती वाटते. प्राण्याची जीवनशैलीच वेगळी असते. जंगलात कायदा नसतो. जे बलाढ्य आहेत, ते दुबळ्यांना खाऊन टाकतात. आता माणसाविषयी बोलूया. माणूस आतून घाबरल्याबराेबर त्याच्यातील पशू जागृत होतो.
माणसातील पशू एकांतामध्ये विशेष करून कामेच्छेच्या वेळी अधिक जागृत होतो. मानसाेपचार तज्ज्ञांच्या मते तुम्ही स्वत:चे शांतपणे चिंतन केल्यास तुम्हाला तुमच्यातील पशू सहजपणे सापडेल. अलीकडेच काही घटना वाचण्यात आल्या आहेत. शहरात आणि काही गावांतही जनावरे मोकटे फिरत असतात. मोकट फिरणारी जनावरे माणसांची वस्ती असलेल्या ठिकाणी आक्रमक नसतात; परंतु एकदा एका श्वानाने काही मुलांवर हल्ला केल्याची बातमी वाचण्यात आली होती. त्या हल्ल्यात काही मुलांना प्राणही गमवावा लागला होता. जसे माणसांच्या वस्तीत जनावर आक्रमक होते. तसेच आता माणसातील पशूदेखील अचानक आक्रमक होतो. म्हणूनच गुन्हेगारीच्या घटनांत गुन्हेगार पशूसमान वर्तन करतात.
कोणत्याच माणसाला पशूसारखे झाल्याशिवाय गुन्हा करता येत नसतो. आपल्यातील पशू नियंत्रणाबाहेर गेल्यानंतरच चुकीचे काम होते. त्यामुळेच माणसाने स्वत:चे अन्न-विचार या दोन्ही गोष्टींवर काम केले पाहिजे. या दोन्ही गोष्टी तुमच्या आत प्रवेश करून तुमच्यातील पशूला जागृत करू शकतात. बाह्य पशूवर तर नियंत्रण मिळवता येईल; परंतु आतील पशूचे काय? त्याला तुम्ही स्वत:च नियंत्रित केले पाहिजे. नियंत्रित असलेला पशू, आज्ञाधारक जनावरही माणसापेक्षा श्रेष्ठ आचरण करू शकते.
पं. विजयशंकर मेहता
बातम्या आणखी आहेत...