आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वासनेला चांगल्या गोष्टींकडे वळवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पं. विजयशंकर मेहता
इंद्रियांच्या सदुपयोगाला दुरुपयोगात रूपांतर करण्याला वासना म्हटले जाते. वासनेचा संबंध इंद्रियांशी अर्थात डोळे, नाक, कान, हात-पाय, मुख, त्वचा, कंठाशी असतो. वासना या सर्वांशी जोडलेली असते. वासना बाहेरून येते. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे. म्हणून वासनेला ईश्वराच्या दिशेने वळवले पाहिजे. फकीर म्हणतात, वासना नष्ट केली जाऊ शकत नाही, परंतु तिला संस्कारित केले जाऊ शकते. वेगळ्या पद्धतीने वळण देता येऊ शकते. जीवनाच्या सर्वश्रेष्ठ दिशेकडे तिला नेता येऊ शकते. वासनांना नष्ट करण्यावर अधिक ऊर्जा खर्च करू नका. त्यांचे शुद्धीकरण कसे करता येईल व त्यावर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण, चुकीच्या गोष्टीशी वासना जोडल्यानंतर ती वाईट काम करण्यास प्रवृत्त करत असते.
चांगल्या गोष्टीला जोडली गेल्यास ती चांगले काम करू लागते. त्यासाठी वासनेचे रूपांतर करायला शिकले पाहिजे. वासना मनाला स्पर्श करते, इंद्रियांना भेटते त्या वेळी आतमध्ये बेचैनी सुरू होते. नंतर इंद्रिये इकडे-तिकडे भटकू लागतात. कोणी मद्यपान करतो, काही जण नशा करतात. काही जण चुकीच्या मार्गाने जातात. एकूणच शुभकार्य करण्यापासून लोक विन्मुख होतात. वासना आपल्या इंद्रियांना भेटते तेव्हाच सावध व्हायला हवे. त्यासाठी इंद्रियांचे आतून पाच ते दहा मिनिटे अवलोकन करा. त्या वेळी तुम्हाला वासना इंद्रियाची कशी भेट घेतात हे दिसून येईल. भेटीचा तो बिंदू तुम्ही लक्षात घ्यायला हवा. त्याची जेवढी अधिक आेळख होईल तेवढे वासनेच्या प्रवेशावेळी तुम्ही सजग राहाल. वासना कोणकोणत्या मार्गाने आत येऊन इंद्रियांची चोरी करते याची एका चांगल्या साधकाला जाणीव असते. थोडे सावधपणदेखील जीवनाला आनंदाने भरून टाकू शकते.
पं. विजयशंकर मेहता