आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदासाठी लहानपणीची शिकवण आठवा , असा मिळतो आनंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अायुष्यात चांगली शिकवण लहान मुलांच्या पुस्तकातूनच मिळते, हे लक्षात घ्या. मोठे झाल्यावर आपण ती गोष्ट विसरूनही जातो, पण लहानपणीचे खेळ आणि आठवलेल्या काही गोष्टी मोठेपणी नवे अर्थ घेऊन समोर येतात. या वेळी "नो निगेटिव्ह' आयुष्य लहानपणीच्या शिकवणीस समर्पित
मुलांचे अश्रू खूप अनमोल आहेत : त्यांना वाहू देऊ नका.

कामात लपलेल्या अानंदाचे कंगोरे शोधा
प्रत्येक कामात आनंदाची एखादी गोष्ट असते. तुम्हाला त्याचे कंगाेरे शोधायचे आहेत. कामानेच आनंद मिळेल. - पीएल ट्रॅव्हर्स, मेरी पॉपिन्स
सकाळी उठल्यानंतर फक्त दाेन मिनिटे आरशासमोर उभे राहा आणि कल्पना करा की, दिवसभरात तुम्हाला काय मिळवायचे आहे. जे काम कराल, मन लावून करा. तसे केले तरच आनंद मिळतो आणि यशही मिळेल.
मुलांची जिज्ञासा खूप असते : त्याची पूर्तता करा.

चांगले काम कधी वाया जात नाही
कोणतेही चांगले काम कधी वाया जात नाही. मग ते कितीही लहान असो. -लॉयन अँड माऊस - इसापनीतीमधून
इसापनीतीतील कथा बोधकारक असतात. दुसऱ्यासाठी काही ना काही करत राहा. बसमध्ये गरजूंना आपले अासन द्या. कोणासाठी दरवाजे उघडा, कोणाच्या कपड्याचे कौतुक करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होईल.

मुलांना वाईट वाटते :
कारणे जाणून घ्या.
मित्रांशी बोला, हिंमत येईल
 प्रत्येक तर्काला तीन बाजू आहेत. तुमचा पक्ष, माझा पक्ष आणि योग्य पक्ष - पंचतंत्र
आपल्या समस्या जाणून घ्या. चार सहकाऱ्यांशी बोला. तुम्हाला बळ मिळेल. कदाचित ते तुम्हाला मदतही करतील. तुमच्या कामाच्या वेगवेगळ्या बाजू आणि काम न झाल्याची कारणे जाणून घ्या. या विचार विमर्शामुळे योग्य गोष्टी समोर येतील. काम पूर्ण करण्याचे बळ मिळेल.
मुलांच्या खेळात सहभागी व्हा
माणूस आस्था असेल तेव्हाच जवळ येतो, तशी मुले खेळत असतात. -हेराडोटस, ग्रीक इतिहासकार

खेळणे काेणत्याही वयात चांगले असते. लहानांइतकाच मोठ्यांनाही यात आनंद मिळतो. खेळामुळे तणाव नाहीसा होतो. शास्त्रज्ञांच्या मते, मातीत खेळल्याने माणसे थेट सुक्ष्म जीवाणुंच्या संपर्कात येतात. यामुळे मंेदूतील सिरेटोनिनचा स्तर वाढतो.