आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखींशी नाते दृढ करण्याच्या काही पद्धती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण अनेकदा काही गोष्टी टाळू लागतो. असे न करता ध्येयवादी बना. ध्येयवाद काय असतो आणि तो कसा प्राप्त करावा, याविषयी आजच्या सदरात माहिती देण्यात आली आहे. सोबतच मनातील शंका सहकाऱ्यांना सांगून त्यांचा विश्वास जिंकणे आणि लक्ष्य मिळवणे कसे सोपे जाते हेसुद्धा जाणून घ्या. शिवाय, तथ्यहीन बैठकांना कसा नकार द्यावा याविषयीही आजच्या हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमधून जाणून घ्या...

वेळ वाया जात असेल, तिथे जाण्यास द्या नकार
कार्यालयातील अनेक बैठका निरर्थक असतात. अनेकदा वरिष्ठ अशा बैठकांमध्ये विनाकारणच अडकून पडतात. हा केवळ वेळेचा अपव्यय असतो. अनेकदा बैठकीत २० पेक्षा अधिक सहभागी असल्यास त्यातील मल्टिटास्करसह कोणालाच पुरेसे महत्त्व मिळत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी अशी संस्कृती बनवा की ज्यात बैठकीत न येण्याची मोकळीक असावी. शिवाय, संबंधित बैठकीला उपस्थित राहणे का आवश्यक आहे, हे विचारण्याची कर्मचाऱ्यांना मुभा द्यावी. बैठका अधिक प्रभावी करण्यासाठी काही धोरणात्मक विकासही करता येईल. यासाठी दोन गोष्टींवर कटाक्ष असू द्या. एक तर बैठकीपूर्वी अजेंडा किंवा बैठकीनंतर प्लॅन ऑफ अॅक्शन तयार करा. नेतृत्वांनी या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. संपूर्ण टीम आपण दिवसभरासाठी मायक्रोमॅनेज करत नसून सर्वांना वेळेेचे महत्त्व कळावे हाच यामागचा उद्देश असल्याचे सहकाऱ्यांना पटवून द्या. आठवड्यात किती बैठका होतात, याचा तपशीलही व्यवस्थापकाने ठेवावा.
(स्रोत : हाऊ टू फायनली किल द युजलेस, रिकरिंग
मीटिंग्ज बाय रयान फुलर)

शंका व्यक्त करा, सहज विश्वास जिंकता येईल
लीडर्सना काही गोष्टींचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. उदा. जोखीम कमी करणे, सतत चांगले काम करणे, नेहमी नियंत्रणात असणे इत्यादी. मात्र, तर्कसंगत, गंभीर आणि नियंत्रित
व्यक्तीवर विश्वास करणे अडचणीचे ठरते. सहकारी किंवा बॉसचा विश्वास जिंकायचा असेल, तर स्वत:ला योग्यप्रकारे त्यांच्यासमोर सादर करा. डोक्यात शंका असेल तर
त्याविषयी त्यांना सांगा. असे केल्याने वागण्यात सहजपणा येईल. प्रत्येक गोष्टीची दोन योग्य उत्तरे असतात, हे स्मार्ट लीडर जाणून असतात. आपण घेतलेला एखादा निर्णय कधीही बदलता येईल, याची त्यांना जाणीव असते. याबाबत त्यांच्यात कोणतीही भीती नसते. एखाद्या कठीण समस्येतून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत असाल, तर त्याबाबत तुमची बाजू कणखरपणे
मांडा आणि ती बदलण्याचेही धैर्यही बाळगा. प्रत्येक वेळी ध्येयवादी बनण्याची गरज नसते. योग्य वेळी शंका उपस्थित करून आपला दृष्टिकोनही बदला.
(स्रोत : लीडर्स विन ट्रस्ट व्हेन दे शो अ बिट ऑफ ह्युमॅनिटी बाय टीम)
विश्रांतीपेक्षा स्वत:ला आव्हान द्या
१० वर्षांपूर्वी आयुष्यात जितक्या अडचणी किंवा तणाव होते. आज त्यापेक्षा अनेकपटींनी जास्त आहे. त्यामुळे ज्याने चेहऱ्यावर हास्याची लकेर येईल असे सुंदर क्षण आठवणे आणि त्यांना कायम स्मरणात ठेवणे, ही स्वत:ला रिचार्ज करण्याची चांगली पद्धत आहे. ई-मेल चेक करणार नाही, सहकाऱ्यांशी बोलणार नाही, असे निरर्थक ध्येय ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगले करणे किंवा मिळवण्याविषयीची ध्येये बाळगा. पत्नीसोबत एखाद्या वेळी स्वयंपाक बनवणे किंवा मित्रासोबत टेनिस खेळणे हे ध्येयवादी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. ध्येयवादी दृष्टिकोन सोपे असतात आणि ते गाठण्यातही आनंद मिळतो. एका जागी शांतपणे विश्रांती घेण्यापेक्षा आपल्या आवडीचे एखादे काम करायला हवे, असे अनेक संशोधनांतून आढळले आहे. विश्रांतीच्या वेळेत आपण सोफ्यावर बसून पॉपकॉर्नच खात असतो. मात्र, एखाद्या उपक्रमात सहभागी होऊन स्वत:लाच आव्हान देतो. उदा. शब्दकोडे भरणे किंवा बुद्धिबळ खेळणे. हे कठीण असले तरी असे केल्याने आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. कारण, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते की आपण रिकाम्या वेळेत नेमके काय करतो. (स्रोत : हाऊ टू ओव्हरकम बर्नआऊट अँड स्टे मोटिव्हेटेड बाय रेबेका नाइट
बातम्या आणखी आहेत...