आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटेपणातून गाठता येते आनंदाची स्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पं. विजयशंकर मेहता - Divya Marathi
पं. विजयशंकर मेहता

एकटेपणातून गाठता येते आनंदाची स्थिती
माणूस दु:खी होतो, त्या वेळी त्याला एकटेपणा जाणवू लागतो आणि एकटा पडल्यानंतर दु:ख आेढवून घेतो. आपल्यात ही क्षमता आहे. एकटे राहताना घाबरून जाण्याची गरज नाही. आतून प्रसन्नता अनुभवता येऊ शकते. ही माणसाच्या आतील क्षमता आहे. मी अशा अनेक लोकांना आेळखतो ज्यांच्याभोवती कायम लोकांचा कोंडाळा असतो. ते प्रतिष्ठित आहेत. लोकप्रिय आहेत; परंतु ते आतून एकदम एकटे आणि रिक्त आहेत. त्यांना बाहेरून एकटे राहावे लागल्यास ते मोडून पडतात. किंबहुना भरकटतात. पुरुष असल्यास एकटेपण घालवण्यासाठी परस्त्रीकडे जातात.
अनेक वेळा महिलादेखील एखाद्या पुरुषात आपल्या एकटेपणावरील तोडगा शोधू लागतात. अनेक लोक थोडे एकटेपण येताच आपले खासगी संबंध बिघडवतात. अनेक पती-पत्नी आपापल्या व्यग्रतेमुळे परस्परांना एकटेपण देतात. पुन्हा भरकटतात. सध्याच्या काळात सर्वांकडे भरपूर काम आहे. म्हणूनच आपल्या एकटेपणामुळे भरकटण्याची गरज नसते. उदास व्हायचीदेखील गरज नाही. तुमच्या मनाला कंगाल करून टाका. धनाढ्य मन काम, क्रोध, लोभाने तयार होते. या तीन गोष्टींचा मनात अभाव राहू द्या. त्या अर्थाने मन कंगाल करा. त्यानंतर पाहा. एकटेपणाचे रूपांतर उदासीनतेमध्ये होणार नाही, याची खबरदारी मात्र जरूर घ्या.
पं. विजयशंकर मेहता
बातम्या आणखी आहेत...