Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You

हजारो वर्षांपासून झोपलेले आहेत हे 14 लोक, कुणी राजकुमार तर कुणी बौद्ध भिक्षू

दिव्‍यमराठी वेब टीम | Update - Nov 10, 2017, 12:04 AM IST

माणूस आपल्‍या आप्‍त स्‍वकियांवर खूप प्रेम करतो. याचे एक उदाहरण म्‍हणजे 'ममी' आहे. आपल्‍या जिवलगांच्‍या मृत्‍यूनंतरही

 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  माणूस आपल्‍या आप्‍त स्‍वकियांवर खूप प्रेम करतो. याचे एक उदाहरण म्‍हणजे 'ममी' आहे. आपल्‍या जिवलगांच्‍या मृत्‍यूनंतरही त्‍यांना आपल्‍या जवळच ठेवण्‍यासाठी त्‍यांच्‍या मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून त्‍यांना जतन करून ठेवले जात होते. divyamarathi.com सांगणार आहे अशाच 14 'ममी'बाबत ज्‍या की आजही सुस्‍थ‍ितीत आहेत.

  कसे पडले ममी नाव?
  > ममी म्हणजे वर्षानुवर्ष संरक्षित करून ठेवलेले शव.
  > ममी तयार करण्याच्या प्रक्रियेत राळेचा वापर केला जातो.
  > इजिप्तच्या भाषेत राळ म्हणजे 'ममरी. त्यामुळे ममरी या शब्दांचा अपभ्रंश होऊन त्याला ‘ममी’ असे नाव पडले.

  ममी कशी तयार होते?
  > मृत शरीरावर एका शांत, शीतल, कमी आद्रता आणि कमी हवा असलेल्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून ममी तयार केली जाते.
  > रासायनिक प्रक्रियेत नाकाला छिद्रं पाडून त्यातून मेंदू काढला जातो.
  > त्याचप्रमाणे फुप्फुसं, आतडी, मूत्रपिंड काढून टाकल्या जातात.
  > नंतर त्यावर राळेचा लेप लावला जातो.
  > डोक्याला मातीचा एक गोल लावला जातो.
  > त्यामुळे ती राळ घट्ट बसते.
  > त्यानंतर शरीरात विविध धार्मिक चिन्हं बसवली जातात. नंतर ते संपूर्ण शरीर एका ज्युट सदृश्य कपड्यात गुंडाळले जाते.
  > त्यानंतर ते एका लाकडी शवपेटीत ठेवले जाते.
  > ही पेटी आणखी एका पेटीत ठेवली जाते. ही शेवटची पेटी रंगवलेली दिसते.
  > इजिप्त संस्कृतीत विग घालण्याची पद्धती होती. म्हणून ममीच्या पेटीवर त्याप्रमाणे चित्रं रंगवण्यात येतात.
  > याशिवाय ममी नेमकी कोणाची आहे हे ओळखण्यासाठी काही चिन्हांकित भाषांनी त्यावर नाव कोरले जाते.
  > प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार ममी कशी रंगवली जातं हे ठरवलं जातं.
  रोसालियाची ममी
  फोटोत दिसत असलेली 'ममी' ही रोसालिया लोमबॅर्डो या मुलीची आहे. इटालियन सैन्‍य अधिकारी अल्फ्रेडो यांची ती मुलगी होती. वर्ष 1920 मध्‍ये तिचा मृत्‍यू झाला. अल्फ्रेडो हे आपल्‍या मुलीवर निवांत प्रेम करत होते. त्‍यामुळेच त्‍यांनी रासायनिक प्रक्रिया करून तिचे शव जतन करून ठेवले.

  पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, सुस्‍थ‍ितीत असलेल्‍या जगातील इतर ममींविषयी...

 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  ला डोंसेला
  15 वर्षीय ला डोंसेला या तरुणीची ममी 1999 मध्‍ये सापडली. ती खूप सुरक्षित अवस्‍थेत असून, ही ममी हजारो वर्षांपूर्वीची आहे.
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  ज्वॉनिता, द आइस मॅडन
  ही ममी पाच हजार वर्षांपूर्वीची आहे. पण, अजूनही ज्वॉनिताचा मृतदेह चांगल्‍या स्थितीत आहे. वयाच्‍या 14 व्‍या वर्षी तिने स्‍वत:ला 'कुर्बान' केले होते. 1995 मध्‍ये  आर्कियोलॉजिस्ट जॉन रीनहार्ड आणि मॅगुअल जराटे यांनी पेरू देशातील माउंट अम्पाटोमध्‍ये ही ममी शोधून काढली होती.
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  फ्रॅकलिनच्‍या ममी
  फ्रॅकलिन शहरामध्‍ये 1984 मध्‍ये 150 वर्षांपूर्वीच्‍या अनेक ममी सापडल्‍या. विशेष म्‍हणजे त्‍या सर्व आजही सुस्‍थ‍ितीत असून, त्‍यांना जतन करण्‍यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. 
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  अविता पेरॉन
  अर्जेंटिनाच्‍या राजकीय विश्‍लेषक एविता पेरॉन यांचे 1952 मध्‍ये निधन झाले. त्‍यांच्‍या पतीच्‍या दुसऱ्या पत्‍नीने त्‍यांचा मृतदेह जतन करून ठेवला. 
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  ओएत्जी, द आईसमॅन
  इटॅलियन गिर्हारोहकांनी स्च्नालस्टल ग्लेशियरवर 5000 वर्षांपूर्वीची ममी शोधून काढली. युरोपमधील सर्वात प्राचीन ममी म्‍हणून तिला उल्‍लेख होतो. विशेष म्‍हणजे या ममीवर कोणत्‍याच रसायनाचा वापर केला गेलेला नाही. 
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  रामेसस द ग्रेट की ममी
  ही ममीसुद्धा खूप सुरक्षित असून, तिच्‍या शरिरावर चाकूचे वार दिसतात. त्‍यामुळे या व्‍यक्‍तीचा खून झाला असावा, असा अंदाज लावला जातो.
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  दाशी-दोरझो इतिगिलोव्‍ह
  रशियन बौद्ध भिक्षूने 1927 मध्‍ये ध्यानात बसून समाधी घेतली. त्‍यांच्‍या अंतिम इच्‍छेप्रमाणे त्‍यांचा मृतदेह कमळाच्‍या आकारात ठेवला आहे
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  तुलुंग मॅन
  या व्यक्‍तीला 2000 हजार वर्षांपूर्वी फासावर लटकवले होते. 1950 मध्‍ये त्‍याची ममी सापडली. ती सुस्‍थितीत आहे.
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  उकोक प्रिंस
  1993 मध्‍ये एका सायबेरियन राजकुमाराची 2500 वर्षांपूर्वीची ममी सापडली. त्‍याच्‍या संपूर्ण शरिरावर काही चिन्‍हे गोंदवलेली आहेत. 
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  जॉर्ज मॅलॉरी
  जगातील सर्वात सुरक्षित ममींपैकी ही एक आहे. वर्ष 1924 मध्‍ये जॉर्ज आणि यांनी त्‍यांच्‍या सहकाऱ्यासह एवरेस्ट मोहीम आखली होती. पण, शिखर गाठण्‍यापूर्वीच दोर तुटून त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांचा मृतदेह 85 वर्षांनी सापडला. बर्फामुळे तो सुरक्षित राहिला. 
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  द वेट ममी
  ही ममी 600 वर्षांपूर्वीची आहे. ती 2011 मध्‍ये चीनमध्‍ये सापडली. तिला पाण्‍यात ठेवले आहे.
 • 14 Unbelievably Alive Dead People Who Will Scare You
  साल्टमॅन ऑफ इराण
  1993 ते 2008 या काळात मिठाच्‍या खाणीत 6 मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह तर 1700 वर्षापूर्वीचा असून, त्‍याचा  ब्लडग्रुप बी+  आहे.

Trending