आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारतात देण्‍यात आलेल्‍या या 3 शापांचा आजही दिसतो पृथ्‍वीवर प्रभाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत हिंदू धर्मातील सर्वात रोचक आणि मोठा ग्रंथ आहे. यातील अनेक कथा आणि रहस्‍य असे आहेत, ज्‍याची माहिती आजही अनेक लोकांना नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला महाभारतातील 3 अशा शापांविषयी सांगणार आहोत, ज्‍यांचा परिणाम आजही पृथ्‍वीवर व पृथ्‍वीवरील लोकांवर दिसून येतो.

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, महाभारतातील 3 अतिशय महत्‍त्‍वाच्‍या शापांविषयी...


शाप, ज्‍यामुळे पृथ्‍वीवर झाले कलियुगाचे आगमन
महाभारत युद्धानंतर पांडव स्‍वर्गाकडे जात होते, तेव्‍हा त्‍यांनी सर्व राज्‍य अभिमयुचा पुत्र परीक्षित याच्‍याकडे सोपविले होते. राजा परीक्षितही गुणी होता. त्‍याच्‍या शासनकाळामध्‍ये सर्व प्रजा सुखी होती. एकदा राजा वनामध्‍ये खेळण्‍यासाठी गेला असता तेथे त्‍याच्‍या नजरेस ऋषि शामिक पडले. ते आपल्‍या तपस्‍येमध्‍ये लीन होते. त्‍यांनी मौन व्रत धारण केले होते. परीक्षितने त्‍यांच्‍याशी बोलण्‍याचा खूप प्रयत्‍न केला. मात्र तो त्‍यांचे मौन मोडू शकला नाही. यामुळे राजा क्रोधित झाला व त्‍याने ऋषिच्‍या गळ्यामध्‍ये मेलेला साप टाकला.

 

हे सर्व ऋषि शमिपच्‍या पुत्राला कळाले तेव्‍हा त्‍याने संतप्‍त होऊन राजाला शाप दिला की, 'जलाल विष असलेला ‘नागराज-तक्षक’ माझ्या शापप्रभावामुळे, आजपासून सात दिवसांनी दंश करून तुला यमाच्या घरी नेईल.' 7 दिवसानंतरच एका ब्राह्मानाने काही फळ राजाला अर्पण केली असता तक्षक नाग अळी बनून त्‍यातील एका फळामध्‍ये लपला. राजाने ते फळ चावताच तक्षक नागाने कडाडून राजाचा चावा घेतला व त्‍यातच राजाचा मृत्‍यू झाला.

 

राजा परिक्षित जिवंत असेपर्यंत कलियुगात एवढे साहस नव्‍हते की, तो पृथ्‍वीवर आपले राज्‍य निर्माण करू शकेल. मात्र राजाच्‍या मृत्‍यूनंतर हळूहळू पापपुण्‍यातील भेद मिटू लागला व पृथ्‍वीवर पुर्णपणे कलियुग आरूढ झाले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर 2 शाप....

बातम्या आणखी आहेत...