Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Akshay Tritiya 2018, Parshuram Jayanti 2018, Lord Parshuram

श्रीकृष्णच नाही तर भगवान विष्णूंचा हा अवतारही होता कर्णाच्या मृत्यूचे कारण

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 16, 2018, 06:53 PM IST

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान

 • Akshay Tritiya 2018, Parshuram Jayanti 2018, Lord Parshuram

  वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा सण 18 एप्रिल, बुधवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान परशुराम यांच्याविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.


  परशुराम यांनी कर्णाला दिला होता शाप
  महाभारतानुसार परशुराम भगवान विष्णूंचे अंशावतार होते. कर्ण परशुरामांचा शिष्य होता. कर्णाने परशुराम यांना स्वतःची ओळख ब्राह्मण पुत्राच्या रुपात दिली होती. एकदा परशुराम कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते. त्याच वेळी एक किडा कर्णाच्या मांडीला चावला. गुरूंची झोप मोडू नये म्हणून कर्णाने सर्व वेदना सहन केल्या. झोपेतून उठल्यानंतर गुरु परशुराम यांच्या लक्षात आले की, कर्ण ब्राह्मण पुत्र नसून क्षत्रिय आहे. तेव्हा क्रोधीत परशुरामांनी कर्णाला शाप दिला की, मी शिकवलेली सर्व शास्त्र-अस्त्रांची विद्या तुला खूप आवश्यकता असेल तेव्हा विसरून जाशील. अशाप्रकारे गुरूंच्या शापामुळे कर्णाचा मृत्यू झाला.


  पुढे वाचा, कशामुळे केला कार्तवीर्य अर्जुनाचा वध...

 • Akshay Tritiya 2018, Parshuram Jayanti 2018, Lord Parshuram

  का केला कार्तवीर्य अर्जुनाचा वध
  एकदा महिष्मती देशाचा राजा कार्तवीर्य अर्जुन युद्ध जिंकून जमदग्नी वृष्णिच्या आश्रमातून निघाला. तेव्हा तो थोडा आराम करण्यासाठी आश्रमात थांबला. त्याने पाहिले की, कामधेनु गाईने सहजपणे त्यांच्या संपुर्ण सेनेच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. तेव्हा त्याने कामधेनूच्या वासराला बळजबरीने आपल्यासोबत नेले. ही गोष्ट परशुरामाला कळाली तेव्हा त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या एक हजार भुजा कापल्या आणि त्याचा वध केला.


  यामुळे केला क्षत्रियांचा संहार
  जमदग्नी ऋषींचा वध करुन कार्तवीर्य अर्जुनाच्या मुलांनी वडिलांच्या वधाचा सूड घेतला. क्षत्रियांचे हे काम पाहून परशुराम खुप क्रोधित झाले. त्यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या सर्व पुत्रांचा वध केला. ज्या क्षत्रिय राजांनी त्यांना मदत केली होती त्यांच्यासुद्धा त्यांनी वध केला.

Trending