Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Akshay Tritiya Parshuram Jayanti 2018

भगवान विष्णूंच्या या अवताराने केला होता आपल्याच आईचा वध, जाणून घ्या कारण

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 17, 2018, 11:59 AM IST

18 एप्रिल, बुधवारी परशुराम जयंती आहे. परशुराम हे भगवान विष्णूंच्या प्रमुख अवतारांपैकी एक आहेत.

 • Akshay Tritiya Parshuram Jayanti 2018

  18 एप्रिल, बुधवारी परशुराम जयंती आहे. परशुराम हे भगवान विष्णूंच्या प्रमुख अवतारांपैकी एक आहेत. धर्म ग्रंथानुसार परशुराम अष्टचिरंजीवी मधील एक आहेत, म्हणजेच ते आजही जिवंत आहेत. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान परशुराम यांच्याविषयीची एक खास गोष्ट सांगत आहोत.


  का केला होता मातेचे वध
  एकदा परशुरामाची आई रेणुका स्नान करुन आश्रमातून येत होत्या. तेव्हा संयोगाने राजा चित्ररथसुद्धा तेथेच जलविहार करत होते. राजाला पाहून रेणुका यांच्या मनात विकार उत्पन्न झाला. त्याच अवस्थेत त्या आश्रमात पोहोचल्या. जमदग्रिने रेणुका यांना पाहून त्यांच्या मनातील गोष्ट जाणुन घेतली आणि आपल्या मुलांना मातेचा वध करण्यास सांगितले. परंतु मोहवश कोणीच त्यांच्या आज्ञेचे पालन केले नाही. तेव्हा परशुरामाने विचार न करता आईचे शिर कापले. हे पाहून जमदग्नी मुनी प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामाने आपल्या आईला जिवंत करण्याचा आणि ही गोष्ट तिला माहिती होऊ न देण्याचे वरदान मागितले. या वरदानाचे फळ म्हणून त्यांची आई पुनर्जीवित झाली.


  पुढील स्लाईडवर वाचा, श्रीरामासोबत परशुराम यांचा वाद झाला होता की नाही...

 • Akshay Tritiya Parshuram Jayanti 2018

  श्रीरामासोबत झाला नव्हता कोणताच विवाद
  गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसमध्ये वर्णन आहे की, श्रीरामाने सीता स्वयंवरात शिव धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवताना धनुष्य तुटले. धनुष्य तुटण्याचा आवाज ऐकून परशुराम तेथे आले. आपले आराध्य महादेवाचे धनुष्य तुटलेले पाहून ते खुप क्रोधित झाले आणि तेथे त्यांचा श्रीराम आणि लक्ष्मणासोबत वाद झाला. परंतु वाल्मिकी रामायणनुसार, सितेसोबत लग्न झाल्यानंतर जेव्हा श्रीराम आयोध्येला पोहचले, त्यानंतर परशुराम तेथे आले आणि त्यांनी श्रीरामाला आपल्या धनुष्यावर बाण चढवण्यास सांगितले. श्रीरामाने बाण चढवल्यानंतरच परशुराम तेथून निघून गेले.

Trending