Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | ashadhi ekadashi 2018 and pundalik vitthal katha

पांडुरंग फक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी नाही तर या कारणांमुळेही अवतरले पंढरपुरात

रिलिजन डेस्क | Update - Jul 22, 2018, 11:49 AM IST

पंढरपुरात पांडुरंग कसे प्रकटले याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृ भक्ताशी संबंधित आहे.

 • ashadhi ekadashi 2018 and pundalik vitthal katha

  पंढरपुरात पांडुरंग कसे प्रकटले याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृ भक्ताशी संबंधित आहे. आषाढी एकादशी (24 जुलै, सोमवार)च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला पांडुरंग पंढरपुरात अवतरित होण्यामागच्या आणखी तीन खास कथा सांगत आहोत.


  पुंडलिक भेट
  पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठाचे देव श्रीविष्णू हे पंढरपुरात आले. त्यावेळी पुंडलिक आई-वडिलांची सेवा करत होते. त्यांनी ‘आईवडिलांची सेवा करतो आहे; ती पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांब’ असे देवाला सांगून एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला, अशी ही कथा आहे. सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी कथा मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे. भक्तराज, महावैष्णव म्हणून पुंडलिक ओळखला जातो. पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे.


  पुढे जाणून घ्या, इतर तीन रोचक कथा...

 • ashadhi ekadashi 2018 and pundalik vitthal katha

  1. कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही म्हणून रुक्मिणी रुसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रुक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे, तिथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात.


  2. डिंडीरव वनातल्या डिंडीरव या नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो.

 • ashadhi ekadashi 2018 and pundalik vitthal katha

  3. पद्मा नावाच्या एका सुंदर तरुण स्त्रीने इष्ट वर मिळावा म्हणून तपश्चर्या सुरू केली, तेव्हा विष्णूने तिच्यापेक्षा मनोहर रूप धारण करून तो तिच्यासमोर प्रकट झाला. त्या रूपाचा तिला मोह पडला. तिचे वस्त्र गळून पडले आणि केस मोकळे झाले. पुढे तिच्या नावाने ‘मुक्तकेशी’ नावाचे तीर्थ निर्माण झाले. पंढरपूरच्या पश्चिमेस पद्मावती तीर्थ नावाचे तळे (कोरडे) आहे. तिथे पद्मावतीचे देऊळही आहे. पद्मावतीला ‘नग्ना’ आणि ‘मुक्तकेशी’ अशी विशेषणे लावली जातात. लखूबाई आणि पद्मावती या दोन्ही देवतांच्या पूजेचा अधिकार श्रीविठ्ठलाच्या पुजाऱ्यांकडेच आहे. या कथांपैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रुक्मिणीची कथा पाद्म पांडुरंग माहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कंद पांडुरंग माहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कंद आणि पद्म अशा दोन्ही पांडुरंग माहात्म्यात आली आहे. ही पांडुरंग माहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्त्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत.

Trending