Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | dhrutrashtra responsible for Mahabharata war

कौरव पांडवांमधील शत्रुत्वाचे कारण ठरल्या धृतराष्ट्राच्या या 10 चुका ठरल्या

यूटीलिटी डेस्क | Update - Mar 03, 2018, 02:07 PM IST

इतिहासामध्ये सर्वात मोठ्या युद्धाच्या रुपात महाभारताला ओळखले जाते. या युद्धामध्ये लाखोच्या संख्येत

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  इतिहासामध्ये सर्वात मोठ्या युद्धाच्या रुपात महाभारताला ओळखले जाते. या युद्धामध्ये लाखोच्या संख्येत जीवित हानी झाली आणि यामागे कारण केवळ कौरव आणि पांडव भावंडांमधील शत्रुत्व एवढेच होते. या शत्रुत्वामागे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आणखी एक कारण म्हणजे राजा धृतराष्ट्र. आज आम्ही तुम्हाला धृतराष्ट्र राजाविषयी दहा अशा गोष्टी सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हालाही पटेल की, महाभारताचा महाविनाश धृतराष्ट्राच्या या 10 चुकांमुळेच झाला.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धृतराष्ट्र यांनी केलेल्या कोणत्या चुकांमुळे घडले महाभारत...

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  धृतराष्ट्र पांडूपेक्षा मोठे होते परंतु जन्मापासून अंध असल्यामुळे धृतराष्ट्र यांना हस्तिनापुरच्या सिंहासनावर बसवण्यात आले नाही. त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पांडूला सिंहासनावर बसवण्यात आल्यामुळे धृतराष्ट्र पांडू राजाचा द्वेष करत होते. हा द्वेष एवढा वाढला होता की, पांडूच्या मुलांना नेहमीच सिंहासनापासून दूर ठेवण्यात आले.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  शकुनीला हस्तिनापुरचा विनाश हवा होता. ही गोष्ट भीष्म आणि विदुर यांनी अनेकवेळा धृतराष्ट्र यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु धृतराष्ट्र शकुनीला आपला शुभचिंतक मानत होते. याचा परिणाम म्हणजे शकुनीने दुर्योधनाच्या मनात पांडवांबद्दल एवढी घृणा निर्माण केली की, दुर्योधन पांडवाना आपला कट्टर शत्रू समजू लागला.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  दुर्योधन जन्माच्या वेळी ज्योतिष विद्वानांनी सांगितले होते की, कुरु वंशाच्या विनाशाला हे आपत्य कारणीभूत ठरेल. दुर्योधनाला राजमहालात न ठेवण्याचा सल्ला विद्वानांनी राजा धृतराष्ट्र यांना दिला होता, परंतु ते मोहामध्ये अडकलेल्या धृतराष्ट्र यांनी विद्वानांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणजे ज्योतिष विद्वानांची भविष्यवाणी खरी ठरली.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  धृतराष्ट्र यांनी नेहमी दुर्योधनाच्या चुकांवर पडदा टाकण्याचे काम केले. वार्णाव्रतमध्ये पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याची योजना दुर्योधनाने आखली परंतु पांडव सौभाग्याने जिवंत राहिले. या योजनेची संपूर्ण माहिती धृतराष्ट्र यांना माहिती असूनही त्यांनी यावर पडदा टाकला.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  दुर्योधनाची महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी धृतराष्ट्र यांनी हस्तिनापुरचे विभाजन केले. विभाजनामध्ये पांडवाना खडकाळ आणि नापीक जमीन देण्यात आली. धृतराष्ट्र यांनी ही विभागणी पांडवाना निराश करणारे होती.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  धृतराष्ट्र यांना हेसुद्धा माहिती होते की, द्यूत क्रीडेमध्ये दुर्योधन पांडवांसोबत कपट कारस्थान करणार आहे. तरीही राजा धृतराष्ट्र यांनी दुर्योधनाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी पांडवांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रित केले. येथूनच कौरव आणि पांडवांच्या  शत्रुत्वामध्ये आणखी भर पडली.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  द्यूत क्रीडा भवनात धृतराष्ट्रसमोर दुर्योधनाने द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा आदेश दिला. या आदेशावरही धृतराष्ट्र मौन राहिले. याचा परिणाम म्हणजे दुर्योधन आणि दुःशासनला यमसदनी जावे लागले.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  द्रौपदीच्या अपमानानंतरसुद्धा धृतराष्ट्र यांचे डोळे उघडले नाहीत आणि त्यांनी पुन्हा पांडवांना द्यूत क्रीडेसाठी आमंत्रित केले. याचा परिणाम म्हणजे पांडवांना वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागला आणि या दरम्यान पांडव युद्धाची तयारी करत राहिले.

 • dhrutrashtra responsible for Mahabharata war

  सिंहासनावर बसल्यानंतर धृतराष्ट्र यांना सत्तेची अशी नशा चढली की त्यांनी शुभचिंतक आणि मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. विदुर आणि भीष्म यांनी अनेकवेळा समजावून सांगितले तरीही धृतराष्ट्र यांनी असे निर्णय घेतले, ज्यामुळे कौरव आणि पांडवांमधील शत्रुत्व वाढत गेले. एवढे घडूनही धृतराष्ट्र यांनी महाभारत युद्धाला परवानगी दिली.

Trending