Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | , Facts About Ravan and shanidev

शनिदेवाने ऐकली नाही रावणाची ही एक गोष्ट आणि जुळून आला मेघनादच्या मृत्यूचा योग

रिलिजन डेस्क | Update - May 14, 2018, 10:04 AM IST

मंगळावर 15 मे रोजी शनी जयंती आहे. आजच नाही तर प्राचीन काळापासून ज्योतिषमध्ये शनीची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते

 • , Facts About Ravan and shanidev

  मंगळावर 15 मे रोजी शनी जयंती आहे. आजच नाही तर प्राचीन काळापासून ज्योतिषमध्ये शनीची स्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. या ग्रहामुळे व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. त्रेतायुगात रावण आणि शनीशी संबंधित एक प्रसंग प्रचित आहे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हा संपूर्ण प्रसंग..


  शनिदेव आणि रावणाशी संबंधित प्रसंग -
  रावण आणि मंदोदरीचा पुत्र मेघनादाच्या जन्मावेळी रावणाला त्याचा पुत्र पराक्रमी, दीर्घायू, शक्तिशाली, योद्धा, ज्ञानी व्हावा असे वाटत होते. रावणाला ज्योतीष्याचे संपूर्ण ज्ञान होते. त्यामुळे मेघनादाच्या जन्मावेळी रावणाने सर्व ग्रह आणि नक्षत्रांना अशा स्थितीत राहण्याचा आदेश दिला की, ज्यामुळे त्याच्या मुलगा सर्वगुण संपन्न होईल.


  रावणाचा दरारा एवढा होता की, सर्व ग्रह आणि नक्षत्र त्याने सांगितलेल्या राशीमध्ये स्थित झाले होते. शनि न्यायाधीश आणि आयुचे(आयुष्य) देवता असल्याचे रावणाला माहित होते. त्यामुळे रावणाने शानिदेवालाही बळजबरीने त्याच्या मनाप्रमाणे राशीमध्ये स्थित राहण्यास सांगितले होते.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, नंतर काय झाले...

 • , Facts About Ravan and shanidev

  शनिदेव न्यायाधीश असल्यामुळे त्यांनी मेघनादाच्या जन्मावेळी आपली दृष्टी वक्र केली. वक्रदृष्टीमुळे मेघनाद अल्पायु झाला. जेव्हा रावणाला ही गोष्ट समजली, तेव्हा रागामध्ये रावणाने शनिदेवाच्या पायावर गदेने प्रहर केला त्यामुळे शनिदेव लंगडे झाले.


  शनीच्या अशुभ स्थितीमुळे रावणाचा पुत्राचा मृत्यू अल्पायुमध्ये लक्ष्मणाच्या हातून झाला. मेघनाद पराक्रमी, ज्ञानी, शक्तीशाली त्यामध्ये रावणाला हवे असलेले सर्वगुण आले होते, परंतु शानिदेवाने स्थिती बदलल्यामुळे तो अल्पायु झाला होता.

Trending