जन्मताच तरुण झाले / जन्मताच तरुण झाले होते हे ऋषी, एका रात्रीसाठी जिवंत केले होते भीष्म, दुर्योधन, कर्ण यांना

रिलिजन डेस्क

Jul 26,2018 12:03:00 AM IST

हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अनेक महान ऋषीमुनींविषयी सांगण्यात आले आहे. महर्षी वेदव्यास यामधीलच एक आहेत. महाभारतसारख्या विशाल ग्रंथाची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली आहे. यासोबतच हे या ग्रंथाचे एक पात्रही आहेत. प्रत्येक वर्षी आषाढ मासातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा (या वेळी 27 जुलै, शुक्रवार) महर्षी वेदव्यास यांच्या स्मृतीमध्ये साजरी केली जाते. आज आम्ही तुम्हाला महर्षी वेदव्यास यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात.


1. जन्म घेताच ऋषी व्यास मोठे झाले आणि तपश्चर्या करण्यासाठी द्वैपायन पर्वतावर गेले. तप करता-करता त्यांचा रंग काळा पडला. यामुळे त्यांना कृष्ण द्वैपायन म्हटले जाते. वेदांचे भाग केल्यामुळे हे वेदव्यास नावाने विख्यात झाले.


2. महाभारत युद्धानंतर महर्षी वेदव्यास यांनी आपल्या ऋषी बळाने मृत योद्धांना एक रात्रीसाठी पुनर्जीवित केले होते.

3. महर्षी वेदव्यास यांनीच महाभारत ग्रंथाची रचना केली. महर्षी वेदव्यास सांगत होते आणि श्रीगणेश हा ग्रंथ लिहीत होते.


4. वेदव्यास यांच्या कृपेने पांडू, धृतराष्ट्र आणि विदुर यांचा जन्म झाला होता. कौरवांचा जन्मही यांच्या आशीर्वादाने झाला.


5. धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या 8 अमर व्यक्तींमधील एक महर्षीं वेदव्यास हे आहेत. यामुळे यांना आजही जिवंत मानले जाते.


6. कलियुगाचा वाढत प्रभाव पाहून वेदव्यास यांनी द्रौपदीसहित पाच पांडवांना स्वर्ग यात्रेवर जाण्यास सांगितले.


7. महर्षी वेदव्यास यांनी संजयला दिव्यदृष्टी दिली होती. ज्यामुळे संजयने संपूर्ण युद्धाचे वर्णन धृतराष्ट्र राजाला महालात बसून ऐकवले होते.


8. ग्रंथामध्ये महर्षी वेदव्यास यांच्या मुलाचे नाव शुकदेव सांगण्यात आले आहे. शुकदेव यांनी परीक्षित राजाला श्रीमद्भागवत कथा सांगितली होती.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन खास गोष्टी...

9. पांडवांना द्रौपदीच्या पूर्व जन्माची कथा महर्षीं वेदव्यास यांनीच सांगितली होती. त्यानंतर पांडव स्वयंवरात सहभागी झाले होते.10. महर्षी वेदव्यास यांनी 13 वर्षांपूर्वीच कौरवांसहित संपूर्ण क्षत्रियांचा नाश होणार असल्याचे युधिष्ठिरला सांगितले होते.

9. पांडवांना द्रौपदीच्या पूर्व जन्माची कथा महर्षीं वेदव्यास यांनीच सांगितली होती. त्यानंतर पांडव स्वयंवरात सहभागी झाले होते.

10. महर्षी वेदव्यास यांनी 13 वर्षांपूर्वीच कौरवांसहित संपूर्ण क्षत्रियांचा नाश होणार असल्याचे युधिष्ठिरला सांगितले होते.
X
COMMENT