Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

पांडवांनी युद्ध जिंकल्यानंतर त्यांच्यासोबत कितीवेळ होते हनुमान, त्यानंतर काय घडले?

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 28, 2018, 12:10 PM IST

चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वेळी 31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती साजरी होत आहे.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वेळी 31 मार्च, शनिवारी हनुमान जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानासंबंधीत काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. महाभारताप्रमाणे, युध्दाच्या वेळी अर्जुनाच्या रथावर स्वयं हनुमान विराजित होते. युध्द समाप्त झाल्यावर काय झाले आणि का हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजित होते. हे आम्ही सांगत आहोत...


  जेव्हा अर्जुनाच्या रथावरून उडाले हनुमान
  महाभारतानुसार जेव्हा कौरव सेनेचा नाश झाला तेव्हा दुर्योधन पळून एका तलावात लपला. जेव्हा पांडवांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान केले. दुर्योधन तलावातून बाहेर निघाला आणि भीमने त्याला पराभूत केले. दुर्योधनाला मरणासन्न अवस्थेत सोडून पांडव आपआपल्या रथांमध्ये कौरवांच्या शिबिरात आले. तेव्हा श्रीकृष्णने अर्जुनाला अगोदर रथातुन उतरायला सांगितले आणि नंतर ते स्वत: उतरले.


  श्रीकृष्ण उतल्यावर अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान देखील उडून गेले. तेव्हा एका क्षणात अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, हा रथ दिव्यास्त्रांच्या प्रहाराने अगोदरच जळाला होता. फक्त मी बसलेलो असल्यामुळेच हा रथ भस्म झाला नव्हता. जेव्हा तुमचे काम पुर्ण झाले तेव्हाच मी हा रथ सोडला. यामुळे आता हा रथ भस्म झाला.


  हनुमान अर्जुनाच्या रथावर का बसले, हा संपूर्ण प्रसंग जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  द्रौपदीने भीमला कमळ आणायला सांगितले होते
  - वनवासकाळात पांडव जेव्हा बद्रिकाश्रमात राहत होते, तेव्हा एके दिवशी अचानक एक सहस्त्रदल कमळ येउन पडले. त्या कमळाचा सुगंध खूपच मनमोहक होता. द्रौपदीने ते कमळ उचलले आणि भीमाला म्हणाली की, हे कमळ खूपच सुंदर आहे. मी हे कमळ धर्मराज युधिष्ठीर यांना भेट देणार आहे. जर तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मला असेच आणखी कमळ हवे आहेत. द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीम कमळ आलेल्या दिशेने चालू लागला. भीमाच्या चालण्यामुळे आभाळ गरजल्यासारखा मोठा आवाज येत होता. तो आवाज ऐकून तेथे राहणारे पशु-पक्षी ते ठिकाण सोडून इकडे-तिकडे पळू लागले. 

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  गंधमादन पर्वतावर राहत होते हनुमान
  - कमळाच्या शोधत चालत-चालत भीम एका केळीच्या बागेपर्यंत पोहोचला. ही बाग गंधमादन पर्वताच्या खूप उंचावर अनेक योजन लांब आणि विस्तीर्ण होती. भीम निःसंकोच त्या बागेमध्ये शिरला. या बागेत श्रीहनुमानाचे वास्तव्य होते. त्यांना त्यांचा भाऊ भीम आल्याची चाहूल लागली. (धर्म ग्रंथानुसार हनुमान पवन देवाचे पुत्र होते आणि भीमसुद्धा, यामुळे हे दोघे भाऊ आहेत) हनुमानाने विचार केला की, हा मार्ग भिमासाठी योग्य नाही. यामुळे भीमाचे रक्षण करण्यासाठी केळीच्या बागेतच रस्त्यावर हनुमान झोपले.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  भीमला थांबवू इच्छित होते हनुमान
  बागेत चालत असताना भीमाला रस्त्यावर झोपलेले वानरराज दिसले. त्यांचे ओठ पातळ, जीभ आणि तोंड लाल होते, कानांचा रंगही लाल होता, उघड्या तोंडामध्ये पांढरे आणि टोकदार दात दिसत होते. बागेमध्ये अशा अवस्थेमध्ये झोपलेल्या वानराला पाहून भीमाने त्याच्याजवळ जाऊन गर्जना केली. श्रीहनुमानाने आपले डोळे उघडून उपेक्षापुर्वक भिमाकडे पाहिले आणि विचारले - तू कोण आहेस आणि येथे काय करत आहेस. मी एक रोगी असून येथे शांत झोपलो होतो, तू मला का जागे केलेस. येथून पुढे हा पर्वत अगम्य (पुढे जाणे ठीक नाही) आहे. यावर कोणीही चढू शकत नाही. यामुळे तू येथून निघून जा. 

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  भीमने अशाप्रकारे दिला हुनमानला परिचय
  हनुमानाचे बोलणे ऐकून भीम म्हणाला - वानरराज, तुम्ही कोण आहात आणि येथे काय करत आहात? मी चंद्रवंश अंतर्गत कुरुवंशात उत्पन्न झालो आहे. मी आई कुंतीच्या गर्भातून जन्म घेतला असून महराज पांडूचा पुत्र आहे. लोक मला वायुपुत्र असेही म्हणतात. माझे नाव भीम आहे.
  भीमाचे शब्द ऐकून हनुमान म्हणाले की - मी तर माकड आहे. तुला ज्या रस्त्यावरून पुढे जायचे आहे तेथून मी तुला जाऊ देणार नाही. तू येथूनच परत जा नाही तर तुला मरावे लागेल.
  हे ऐकून भीम म्हणाला की - मी जिवंत राहू किंवा मरू, तुला तर याबद्दल मी काहीही विचारात नाहीये. तू बाजूला हो आणि मला पुढे जाऊ दे.
  हनुमान म्हणाले - मी रोगाने ग्रस्त आहे, तुला जायचेच असेल तर मला ओलांडून पुढे जा.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  जेव्हा भीमने हनुमानाला जाण्यासाठी रस्ता विचारला
  भीम म्हणाला -
  या सृष्टीवरील सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराचा वास असल्यामुळे मी तुला ओलांडून परमात्म्याचा अपमान करणार नाही. जर मला परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान नसते तर मी तुलाच काय या पर्वतालासुद्धा त्याच प्रकारे ओलांडले असते ज्याप्रकारे हनुमानाने समुद्र ओलांडला होता.


  हनुमान म्हणाले की - हा हनुमान कोण होता, ज्याने समुद्र ओलांडला? त्याच्याविषयी तू मला काही सांगू शकतोस का.


  भीम म्हणाला - ते माझे भाऊ असून बुद्धी, बळ आणि उत्साहाने संपन्न तसेच गुणवान आणि रामायणात विख्यात आहेत. त्यांनी श्रीरामाची पत्नी देवी सीतेच्या शोधात एकाच उडीत शंभर योजन मोठा समुद्र ओलांडला होता. मीसुद्धा बळ आणि पराक्रमात त्यांच्यासारखाच आहे. यामुळे तू उभा राहा आणि बाजूला हो. जर तू माझ्या आज्ञेचे पालन केले नाहीस तर मी तुला यमाकडे पाठवेल.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  जेव्हा हनुमानाची शेपूट उचलू शकले नाही भीम
  भीमाचे बोलणे ऐकून हनुमान म्हणाले - हे वीर! तू रागात येऊ नकोस म्हातारपणामुळे माझ्यामध्ये उठण्याची ताकद नाही. यामुळे कृपा करून माझी शेपटी बाजूला करून तू पुढे निघून जा.


  हे ऐकून भीम हसला आणि डाव्या हाताने शेपटी बाजूला करू लागला. परंतु शेपटी एक इंचही हलवू शकला नाही. नंतर त्याने दोन्ही हातांनी शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळीही तो अपयशी ठरला. त्यानंतर भीमाने शरमेने मान खाली घालून विचारले की, तुम्ही कोण आहात? तुमचा परिचय द्या आणि माझ्या कटू वाणीला विसरून मला माफ करा.


  तेव्हा श्रीहनुमानाने स्वतःचा परिचय देत सांगितले की, या रस्त्यामध्ये देवता राहतात. मनुष्यासाठी हा रस्ता सुरक्षित नसल्यामुळे मी तुला आडवले होते. तू ज्या कामासाठी आला आहेस तो तलाव येथेच आहे.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  हनुमानाने भीमला सांगितले होते चार युगांविषयी
  हनुमानाचे दर्शन घेऊन भीम म्हणाला की, आज माझ्याएवढे भाग्यवान कोणीच नाही, कारण आज मला माझ्या मोठ्या भावाचे दर्शन झाले आहे. परंतु माझी एक इच्छा आहे, ती तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. समुद्र ओलांडताना तुम्ही जे विशाल रूप धारण केले होते ते मला पाहायचे आहे.


  भीमाची इच्छा ऐकून हनुमान म्हणाले -तू आणि इतर कोणताही व्यक्ती माझे ते रूप पाहू शकत नाही. सतयुगातील तो काळ वेगळा होता आणि त्रेता आणि द्वापार युगही वेगळे होते. काळ तर निरंतर क्षय करणारा आहे. आता माझे ते रूप दिसणे शक्य नाही.


  तेव्हा भीमाने विचारले की - तुम्ही मला युगांची संख्या आणि प्रत्येक युगात आचार, धर्म, अर्थ आणि कामाचे रहस्य, कर्मफळाचे स्वरूप तसेच उत्पत्ती आणि विनाशाची माहिती सांगा.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  जेव्हा हनुमानने भीमला दाखवले आपले विशाल रुप
  हनुमानाने सांगितलेली सर्व माहिती ऐकल्यानंतर भीम म्हणाला - तुमचे विशाल रूप पाहिल्याशिवाय मी येथून जाणार नाही. जर तुमची माझ्यावर कृपा असेल तर मला त्या रूपाचे दर्शन द्या.


  भीमाचे हे शब्द ऐकून हनुमानाने आपले विशाल रूप दाखवले. हनुमानाच्या त्या रूपामुळे ती केळीची बाग झाकून गेली. भीम आपल्या भावाचे रूप पाहून आश्चर्यचकित झाला. त्यानंतर भीम म्हणाला की, हे हनुमंता मी तुमचे विशाल रुप पाहिले आहे आता तुम्ही तुमच्या पूर्व रुपात या. तुम्ही उगवत्या सुर्यासमान आहात, मी तुमच्याकडे पाहू शकत नाही.


  त्यानंतर हनुमान मूळ रुपात आले आणि त्यांनी भीमाला मिठी मारली. मिठी मारताच भीमाचा सर्व थकवा दूर झाला.

 • Hanuman Jayanti 2018 Intersting Stories about mahabahrta

  हनुमानने भीमला दिले हे वरदान
  त्यानंतर हनुमान म्हणाले की -भीम, आता तू परत जा, मी या ठिकाणी राहतो हे कोणालाही सांगू नकोस. तू माझा भाऊ असल्यामुळे कोणताही एक वर मागू शकतोस. तुझी इच्छा असेल तर मी हस्तिनापुरला जाऊन धृतराष्ट्र पुत्रांचा वध करू का दगडांनी ते नगर नष्ट करू, दुर्योधनाला तुझ्यासमोर बांधून उभे करू का. तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करू शकतो. हनुमानाचे हे वाक्य ऐकून भीम खूप प्रसन्न झाला आणि म्हणाला - हे वानरराज, तुम्ही जे म्हणालात ते काम तर होणारच आहे. फक्त तुमची कृपादृष्टी आमच्यावर ठेवा.


  त्यानंतर हनुमान म्हणाले - भाऊ असल्यामुळे मी तुझे कल्याण करेल. जेव्हा तू शत्रू सैन्यात घुसून सिंहनाद करशील तेव्हा मी माझ्या शब्दांनी तुझी गर्जना वाढवेल तसेच अर्जुनाच्या रथावर बसून अशी भीषण गर्जना करेल, ज्यामुळे शत्रूंचे प्राण सुकून जातील आणि तू सहजपणे त्यांचा वध करशील. असे सांगून हनुमानाने भीमाला मार्ग दाखवला आणि अंतर्धान झाले.

Trending