Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Interesting Facts Of Mahabharata, Pandvas, Dropadi

पांडवांनी यांच्या सांगण्यावरून द्रौपदीसोबत राहण्यासाठी बनवला होता 1 नियम

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 20, 2018, 03:11 PM IST

शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत.

 • Interesting Facts Of Mahabharata, Pandvas, Dropadi

  शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत. या ग्रंथामध्ये एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला ग्रंथाच्या काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत...


  1. पांडवांनी द्रोपदीसाठी बनवला होता एक खास नियम
  द्रौपदीसोबत विवाहनंतर एक दिवस नारदमुनी पांडवांना भेटण्यास गेले. त्यांनी पांडवांना सांगितले की, प्राचीन काळात सुंद-उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने देवतांवर विजय मिळवला होता. परंतु एका स्त्रीच्या कारणामुळे त्यांच्यात फूट पडली. त्या दोघांना एकमेकांचा वध केला. अशी स्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी नियम तयार करा. तेव्हा पांडवांनी द्रौपदीसाठी एक नियम बनवला, एका नियमित वेळेपर्यंत द्रौपदी एका भावाजवळ राहिल. जेव्हा एक भाऊ द्रौपदीसोबत एकांतात असेल तेव्हा दुसरा भाऊ तेथे जाणार नाही. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला 12 वर्षे ब्रम्हचारी राहुन वनात जावे लागेल.


  पुढील स्लाईडवर वाचा...पांडवांच्या पत्नी आणि पुत्रांविषयी...

 • Interesting Facts Of Mahabharata, Pandvas, Dropadi

  जाणुन घ्या पांडवांच्या पत्नी आणि पुत्रांविषयी
  1. पांडवांची द्रौपदी व्यतिरिक्त दूस-या पत्निदेखील होत्या. युधिष्ठिरच्या पत्नीचे नाव देविका होते, त्यांच्या पुत्राचे नाव यौधेय होते. नकुलची पत्नी करेणुमती, त्यांचा पुत्र निरमित्र आणि सहदेवची पत्नी विजया त्यांचा पुत्र सुहोत्र होता.
  2.भीमसेनच्या दोन पत्नि होत्या. पहिली हिडिंबा आणि दुसरी काशीराजची पुत्री बलंधरा. हिडिंबाच्या पुत्राचे नाव घटोत्कच आणि बलंधराच्या पुत्राचे नाव सर्वग होते.
  3. अर्जुनाने श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा, नागकन्या उलूपी आणि मणिपुरचा राजकुमारी चित्रांगदासोबत लग्न केले होते. अर्जुनाला सुभद्रापासुन अभिमन्यू, उलूपी पासुन इडावान् आणि चित्रांगदापासुन बभ्रूवाहन हा पुत्र होता.
  4.द्रोपतीला पाची पांडवांपासुन एक एक पुत्र होता. युधिष्ठिरच्या पुत्राचे नाव प्रतिविन्ध्य, भीमाच्या पुत्राचे नाव सुतसोम, अर्जुनच्या पुत्राचे नाव श्रुतकर्मा, नकुलच्या पुत्राचे नाव शतानीक तर सहदेवाच्या पुत्राचे नाव श्रुतसेन होते.

Trending