Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Mahabharata war and duryodhan mistake

दुर्योधनाच्या या 10 चुकांनी पांडवांचा विजय केला सोपा, अन्यथा चित्र असते वेगळे

जीवनमंत्र डेस्क | Update - Feb 15, 2018, 01:01 PM IST

महाभारत युद्ध का घडले या विषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. परंतु दुर्योधनाने या 10 चुका केल्या

 • Mahabharata war and duryodhan mistake

  महाभारत युद्ध का घडले या विषयीच्या अनेक कथा प्रचलित आहेत. परंतु दुर्योधनाने या 10 चुका केल्या नसत्या तर कदाचित महाभारत युद्ध झाले नसते किंवा या युद्धात पांडव पराभूत नक्कीच झाले असते.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या दहा चुकांमुळे पांडवांना फायदा आणि दुर्योधनाला नुकसान झाले...

 • Mahabharata war and duryodhan mistake

  बालपणात दुर्योधनाने भीमाला विष खाऊ घालून गंगा नदीत फेकून दिले. गंगेत वाहत-वाहत भीम नागलोकात पोहचला. नागराज नात्यामध्ये भीमाचे पंजोबा निघाले, त्यांनी भीमाला 100 हत्तींचे बळ दिले. महाभारत युद्धात भीम याच ताकदीच्या जोरावर दुर्योधनावर विजय प्राप्त करू शकला.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  दुर्योधनाने कट-कारस्थान रचून पांडवाना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला. लाक्षागृहातून सुखरूप बाहेर पडून पांडव जंगलात पोहोचले आणि त्यानंतर तेथे भीमाला हिडींबा भेटली. हिडींबापासून भीमाला घटोत्कच नावाचा मुलगा प्राप्त झाला, ज्याने महाभारत युद्धात कौरवांचे सैन्य अस्तव्यस्त केले.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  दुर्योधनाने आपल्या हट्टापायी हस्तिनापुरचे विभाजन करून घेतले. पांडवांना खांडवप्रस्थ भेटले, जे पुढे चालून त्यांनी इंद्राच्या नगराप्रमाणे बनवले आणि इंद्रप्रस्थ असे नाव दिले. याच इंद्रप्रस्थमध्ये दुर्योधनाला द्रौपदीने केलेला अपमान सहन करावा लागला.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  द्रौपदीकडून झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुर्योधनाने द्यूतक्रीडा(जुगार) खेळण्याचे आयोजन केले. येथे द्रौपदीच्या वस्त्रहरणाची घटना घडली. यामुळे दुर्योधन अनेक राज्यकर्त्यांचा विश्वास आणि आधार गमावून बसला. याचा लाभ युद्धामध्ये पांडवाना झाला.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  दुर्योधनाने पांडवाना द्यूतक्रीडेत पराभून केल्यानंतर त्यांना बारा वर्ष वनवासात पाठवले. याच काळात वनवासात राहताना पांडवानी आपली शक्ती वाढवली. एवढेच नाही तर अर्जुनाने इंद्रदेवाकडून दिव्यास्त्र प्राप्त केले. या अस्त्रांचा युद्धामध्ये पांडवाना खूप फायदा झाला.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  अज्ञातवासाच्या शेवटच्या काळात कौरवांनी विराट राजाच्या राज्यावर आक्रमण केले, जेथे कौरवांचा सामना बृहन्नला बनलेल्या अर्जुनाशी झाला. एकट्या बृहन्नलाने संपूर्ण कौरव सैन्याला परास्त केले. यामुळे कौरव सैन्यांचे मनोबल खचले याचे नुकसान कौरवांना महाभारत युद्धामध्ये चुकवावे लागले.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर पांडवानी भगवान श्रीकृष्णाला सलोखा प्रस्थापित करण्यासाठी आपला दूत बनवून हस्तिनापुरला पाठवले. परंतु दुर्योधनाने श्रीकृष्णाचा अपमान करून त्यांना त्यांना बंदी बनवण्याचाही प्रयत्न केला आणि त्याच क्षणापासून कौरवांचा विनाशाची सुरुवात झाली.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  श्रीकृष्णाने युद्ध टाळण्यासाठी दुर्योधनाला सल्ला दिला की, पांडवाना इंद्रप्रस्थ देणे शक्य नसेल तर कमीत कमी पाच गाव तरी द्यावेत. परंतु दुर्योधन म्हणाला की, पाच गाव काय मी त्यांना एका सुईएवढीसुद्धा जमीन युद्ध केल्याशिवाय देणार नाही. दुर्योधनाच्या या हट्टी स्वभावाने संपूर्ण कौरवांना नष्ट केले आणि हस्तिनापुरही गमवावे लागले.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  नकुल, सहदेवचे मामा मद्र नरेश युद्धात पांडवांची मदत करण्यासाठी निघाल्यानंतर दुर्योधनाने कट-कारस्थान रचून त्यांना आपली मदत करण्यासाठी तयार केले. मद्र नरेश कर्णाचे सारथी बनले. परंतु संपूर्ण युद्धादरम्यान कर्णासोबत राहून ते अर्जुनाचे गुणगान करत कर्णाचे खच्चीकरण करत राहिले.

 • Mahabharata war and duryodhan mistake

  कर्णाने जे अस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी इंद्रदेवाकडून प्राप्त केले होते, दुर्योधनाच्या हट्टापायी त्याने त्याच अस्त्राने घटोत्कचचा वध केला. यामुळे अर्जुन सुरक्षित झाला आणि शेवटी अर्जुनाचा हातून कर्णाचा वध झाला आणि दुर्योधन महाभारताचे युद्ध हरला.

Trending