Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

रोचक गोष्टी : स्वयंवरात नाही, असे झाले होते प्रभू श्रीराम आणि देवी सीताचे लग्न

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 24, 2018, 12:31 PM IST

चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी उत्सव साजरा केला जातो.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णूंनी श्रीरामा रूपात जन्म घेतला होता. या वर्षी हा उत्सव 25 मार्चला रविवारी आहे. भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि रावणाच्या जीवनाचे वर्णन विविध ग्रंथांमध्ये आढळून येते, परंतु या सर्वांमध्ये वाल्मिकी रामायणात लिहिण्यात आलेल्या गोष्टी अधिक योग्य मानल्या जातात. आज आम्ही तुम्हाला वाल्मिकी रामायणातील काही खास आणि कदाचित तुम्हाला माहिती नसतील अशा गोष्टी संगांत आहोत.


  तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसमध्ये वर्णन आहे की, भगवान श्रीरामाने सीता स्वयंवरामध्ये शिवधनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवताना धनुष्य तुटले. परंतु वाल्मिकी ऋषी रचित रामायणामध्ये स्वयंवराचे वर्णन करण्यात आलेले नाही. रामायणानुसार जेव्हा श्रीराम व लक्ष्मण ऋषी विश्वामित्र यांच्यासोबत मिथिला नगरी पोहचले तेव्हा विश्वामित्रांनी जनक राजाला श्रीरामाला शिवधनुष्य दाखवण्यास सांगितले. तेव्हा श्रीरामाने खेळण्यासाठी ते धनुष्य उचलले आणि प्रत्यंचा चढवताना धनुष्य तुटले. राजा जनकाने प्रण केला होता की, जो कोणी हे शिवधनुष्य उचलेले त्याच्याशी माझ्या मुलीचा विवाह करण्यात येईल.


  रामायणाशी संबंधित खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  रामायणानुसार दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी पुत्रेष्ठि यज्ञ केला होता. हा यज्ञ ऋषि ऋष्यश्रृंग याच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ऋष्यश्रृंग ऋषींच्या वडिलांचे नाव विभाण्डक होते. एकदा नदीमध्ये स्नान करताना त्यांचा वीर्यपात झाला. ते पाणी एका हरिणीने पिले, अशा प्रकारे ऋषी ऋष्यश्रृंग यांचा जन्म झाला होता.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  श्रीरामचरित मानसनुसार सीता स्वयंवराच्या वेळी भगवान परशुराम तेथे उपस्थित होते. परंतु रामायणानुसार सितेसोबत लग्न झाल्यानंतर जेव्हा श्रीराम आयोध्येला पोहचले, त्यानंतर परशुराम तेथे आले आणि त्यांनी श्रीरामाला आपल्या धनुष्यावर बाण चढवण्यास सांगितले. श्रीरामाने बाण चढवल्यानंतरच परशुराम तेथून निघून गेले.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  आपले वडील दशरथ राजाच्या मृत्यूचा आभास भरताला पहिलेच एका स्वप्नाच्या माध्यमातून झाला होता. स्वप्नामध्ये दशरथ राजाला काळे वस्त्र परिधान केलेले त्याने पहिले होते.त्यांच्यावर पिवळ्या रंगाची स्त्री प्रहार करत होती. स्वप्नामध्ये राजा दशरथ लाल फुलांचा हार घालून लाल चंदन लाऊन गाढव जुंपलेल्या रथातून वेगाने दक्षिण (यमाची दिशा) दिशेकडे जात होते.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  रघुवंशामध्ये परम प्रतापी अनरण्य नावाचा राजा होता. जेव्हा रावण विश्वविजयासाठी निघाला तेव्हा अनरण्य राजासोबत त्याचे भंयकर युद्ध झाले. या युद्धामध्ये अनरण्य राजाचा मृत्यू झाला. परंतु मृत्युपूर्वी अनरण्य राजाने रावणाला शाप दिला की, माझ्या वंशातील एक तरुण तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. यांच्या वंशामध्ये पुढे चालून भगवान श्रीरामाचा जन्म झाला आणि त्यांनी रावणाचा वध केला.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  ज्या दिवशी रावणाने सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठवले होते.त्याचदिवशी रात्री ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार देवराज इंद्र सीतेसाठी खीर घेऊन गेले होते. पहिल्यांदा इंद्राने आशिक वाटिकेतील सर्व राक्षसांना संमोहित करून झोपी घातले. त्यानंतर सीतेला खीर अर्पण केली. ती खीर खाल्यानंतर सीतेची भूक-तहान शांत झाली.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  श्रीरामचरित मानसनुसार समुद्राने श्रीरामाला लंकेत जाण्यासाठी मार्ग देण्याचे नाकारले होते, तेव्हा लक्ष्मण खूप क्रोधित झाले होते. परंतु रामायणामध्ये दिलेल्या माहितीनुसार भगवान श्रीराम समुद्रावर क्रोधित झाले होते आणि त्यांनी समुद्रातील पाणी आटवण्यासाठी बाणही सोडले होते. तेव्हा लक्ष्मण आणि इतर लोकांनी श्रीरामाला शांत होण्याची विनंती केली.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  सर्वांनाच माहिती आहे की, समुद्रावर सेतू निर्माण करण्याचे काम नल नावाच्या वानराने केले होते. कारण पाण्यात टाकेलेली कोणतीही वस्तू बुडणार नाही असा त्याला शाप होता. वाल्मिकी रामायणानुसार नल देवतांचे शिल्पी (इंजीनियर) विश्वकर्माचे पुत्र होते आणि ते स्वतः शिल्पकलेत निपुण होते. आपल्या याच कलेने त्यांनी समुद्रावर सेतू निर्माण केला.

 • Ramnavami 2018 Know The Interesting Facts About Valmiki Ramayana

  श्रीराम आणि रावणाचे अंतिम युद्ध चालू होते तेव्हा इंद्रदेवाने श्रीरामाला आपल्या दिव्य रथ दिला होता. या रथावर स्वार होऊन श्रीरामाने रावणाचा वध केला.

Trending