Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

येथे आजही श्रीकृष्ण आणि राधा करतात रासलीला, पाहणाऱ्याचा होतो मृत्यू !

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 14, 2017, 12:06 AM IST

भारतामधील विविध स्थळ रहस्यमयी चमत्कारांनी भरलेले आहेत. यामधील एक स्थळ, वृंदावन येथील निधीवन हे आहे.

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  भारतामधील विविध स्थळ रहस्यमयी चमत्कारांनी भरलेले आहेत. यामधील एक स्थळ, वृंदावन येथील निधीवन हे आहे. येथील मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्ण येथे दररोज रात्री गोपिकांसोबत रासक्रीडा करतात. याच कारणामुळे संध्याकाळची आरती झाल्यानंतर निधीवन बंद केले जाते, त्यानंतर येथे कोणीही जात नाही. एवढेच नाही तर दिवसभर निधीवनात राहणारे पशु-पक्षी संध्याकाळी निधीवन सोडून जातात.


  जो कोणी पाहतो रासलीला तो होतो वेडा
  संध्याकाळ होताच सर्व लोकांना येथून बाहेर काढून निधीवन बंद केले जाते. कारण येथील मान्यतेनुसार, दररोज रात्री येथे भगवान श्रीकृष्ण येतात आणि गोपिकांसोबत रासक्रीडा करतात. एवढेच नाही तर जो व्यक्ती, येथे रासक्रीडा पाहण्याचा प्रयत्न करतो, तो पागल होतो किंवा त्याचा मृत्यू होतो. ही गोष्ट माहिती असूनही अनेक लोक निधीवनातील झाडांमध्ये लपून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी थांबले, याचा परिणाम म्हणजे ही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले तर काहींचा मृत्यू झाला.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, श्रीकृष्ण आणि निधीवनाशी संबंधित काही खास गोष्टी...

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  दररोज रात्री येथे पान खातात आणि पाणी पितात श्रीकृष्ण
  निधीवनामध्येच रंग महाल नावाचे एक मंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार दररोज रात्री श्रीकृष्ण देवी राधासोबत येथे आराम करतात. यामुळे रंग महालात देवी राधा आणि भगवान श्रीकृष्णासाठी संध्याकाळ होण्यापूर्वी चंदनाचा पलंग, पाण्याचा कलश, देवी राधासाठी शृंगार साहित्य, प्रसाद, पान ठेवले जाते. संपूर्ण मंदिर सजवल्यानंतर  रात्री निधीवनासोबतच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. सकाळी पाच वाजता मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर सर्व सामान पसरलेले, पान खाल्लेले, पाण्याचा कलश रिकामा आढळतो.

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  अनोखे आहेत यथील वृक्ष
  निधीवनमधील झाडेसुद्धा एक रहस्य आहेत, इतर झाडांच्या फांद्या वरच्या दिशेने वाढत जातात, परंतु निधीवनमधील झाडांच्या फांद्या जमिनीकडे वाढतात.

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  तुळशीचे झाडं बनतात गोपिका
  निधीवनमधील आणखी एक रहस्य आहे येथील तुळशीची झाडे. निधीवनमधील तुळशीचे प्रत्येक झाड जोडीमध्ये आहे. यामागे अशी मान्यता आहे की, राधा-कृष्ण वनात रासक्रीडा करताना तुळशीची हीच जोडीदार झाडे गोपिका बनतात. सकाळ होताच सर्व गोपिका परत तुळशीच्या झाडामध्ये परिवर्तित होतात.

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  भगवान श्रीकृष्णाने आपल्या बासरीने येथे तयार केले होते कुंड
  निधीवनमधील विशाखा कुंडाविषयी सांगितले जाते की, जेव्हा श्रीकृष्ण गोपिकांसोबत रासक्रीडा करत होते, तेव्हा विशाखा नावाच्या एका गोपिकेला तहान लागली. गोपिकेची तहान भागवण्यासाठी श्रीकृष्णाने बासरीने एक कुंड बनवले. तेव्हापासून त्या गोपिकेच्या नावाने हे कुंड प्रसिद्ध आहे.

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  बासरी चोर राधाराणी मंदिर
  निधीवनमध्ये बासरी चोर राधारणी मंदिर आहे. हे मंदिर बासरी चोर राधारणी नावाने प्रसिद्ध होण्यामागे एक कथा आहे. या कथेनुसार, एकदा देवी राधा श्रीकृष्णावर खूप रुसून बसल्या होत्या, कारण भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवण्यात एवढे मग्न होऊन जायचे की, त्यांना आपल्या जवळपास कोण आहे याचे भानही राहत नव्हते. या गोष्टीमुळे रुसलेल्या राधेने श्रीकृष्णाची बासरी चोरून लपवली होती. तेव्हापासून या मंदिराचे नाव बासरी चोर राधारणी असे पडले.

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  निधीवन परिसरातील रंग महाल

 • Krishna And Radha Dance In Nidhivan, Vrindavan

  निधीवन 

Trending