Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | lord shanidev and piplad muni story

शनिदेव का देत नाहीत शिव भक्तांना त्रास, कोणी केला होता शनिवर प्रहार?

रिलिजन डेस्क | Update - May 14, 2018, 09:39 AM IST

15 मे, मंगळवारी शनि जयंती आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये शनिदेवाशी संबंधित विविध कथा प्रचलित आहेत.

  • lord shanidev and piplad muni story

    15 मे, मंगळवारी शनि जयंती आहे. हिंदू धर्म ग्रंथांमध्ये शनिदेवाशी संबंधित विविध कथा प्रचलित आहेत. पुराणात सांगण्यात आले आहे, की शनीची गती मंद म्हणजे संथ आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की असं का? शनिदेव कोणत्या कारणामुळे मंद गतीने चालतात. या संदर्भात ग्रंथांमध्ये एका कथेचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.


    पौराणिक मान्यतेनुसार महादेवाने आपल्या परम भक्त दधिची मुनींच्या घरात पुत्र स्वरुपात जन्म घेतला. ब्रह्मदेवाने त्या मुलाचे नाव पिप्पलाद ठेवले, परंतु जन्मापूर्वीच त्यांच्या वडिलांचा दधिची मुनीचा मृत्यू झाला. पिप्पलादने मोठे झाल्यानंतर देवतांना आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण विचारले, तेव्हा शनिदेवाची कुदृष्टीमुळे वडिलांचा मृत्यू झाला असे त्यांना समजले. त्यानंतर क्रोधीत झालेल्या पिप्पलादने शनीदेवावर ब्रह्म दंडाचा प्रहार केला. शनिदेव ब्रह्म दंडाचा प्रहार सहन करू शकत नव्हते, त्यामुळे घाबरलेले शनिदेव पळू लागले. तिन्ही लोकांची प्रदक्षिणा घातल्यानंतरही ब्रह्म दंडाने शनिदेवाचा माग सोडला नाही आणि ब्रह्म दंड त्यांच्या पायावर येउन लागला.


    पुढील स्लाईड्सवर वाचा, नंतर काय झाले...

  • lord shanidev and piplad muni story

    ब्रह्मदंड पायावर लागल्यामुळे शनिदेव लंगडे झाले. तेव्हा देवतांनी पिप्पलाद मुनीना शनिदेवाला क्षमा करण्यास सांगितले. देवतांनी सांगितले, की शनिदेव न्यायधीश आहेत आणि ते आपल्या कर्तव्याचे पालन करतात. त्यांनतर देवतांच्या आग्रहामुळे पिप्पलाद मुनींनी शनिदेवाला माफ केले. देवतांच्या आग्रहानंतर पिप्पलाद मुनींनी शनिदेवाला या गोष्टीवर माफी दिली, की शनिदेव जन्मापासून 16 वर्षापर्यंतच्या शिवभक्तांना त्रास देणार नाहीत. जर त्यांनी 16 वर्षापर्यंतच्या शिवभक्तांना त्रास दिला तर शनिदेव भस्म होतील. तेव्हापासून पिप्पलाद मुनींचे स्मरण केल्यास शनि पिडा दूर होते असे मानले जाते.

Trending