Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Mahabharata draupadi story in marathi

पाच पराक्रमी पती तरीही द्रौपदीवर होती या पाच पुरुषांची वाईट दृष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 14, 2018, 11:00 AM IST

महाभारतानुसार पांडव पाच भाऊ होते. पाच भावांची द्रौपदी नावाची एकच पत्नी होती. द्रौपदीच्या जन्माविषयी एक कथा होती.

 • Mahabharata draupadi story in marathi

  महाभारतानुसार पांडव पाच भाऊ होते. पाच भावांची द्रौपदी नावाची एकच पत्नी होती. द्रौपदीच्या जन्माविषयी एक कथा होती. त्या कथेनुसार द्रौपदीचा जन्म अग्नीकुंडातून झाला. द्रौपदी वीर आणि गुणवान स्त्री असण्यासोबतच अत्यंत रूपवान होती. यामुळेच द्रुपद राजाने द्रौपदीच्या लग्नासाठी आयोजित केलेल्या स्वयंवरात सहभागी होण्यासाठी भारतातील सर्व राजकुमार पांचाळ राज्यात दाखल झाले होते.


  पांडू पुत्र अर्जुनाने द्रौपदी स्वयंवर जिंकले आणि आई कुंतीच्या आज्ञेनुसार द्रौपदीला पाचही पांडवांशी लग्न करावे लागले. द्रौपदीचे सर्व पती शूरवीर, पराक्रमी आणि अजेय होते. तरीही पाच पुरुषांची द्रौपदीवर कुदृष्टी होती.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, द्रौपदीवर कोणत्या पाच पुरुषांची वाईट दृष्टी होती..

 • Mahabharata draupadi story in marathi

  जयद्रथ
  दुर्योधनाला दुशाला नावाची एक बहिण होती. दुशालाचे लग्न राजकुमार जयद्रथशी झाले होते. जयद्रथ द्रौपदीच्या रूपावर आसक्त आणि तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक होता. जुगारात सर्वकाही हरल्यानंतर पांडव वनवासात असताना एके दिवशी जयद्रथची दृष्टी द्रौपदीवर पडली. द्रौपदी त्यावेळी एकटीच होती. या संधीचा फायदा घेऊन जयद्रथने द्रौपदीचे हरण केले आणि स्वतःच्या राज्याकडे निघाला. परंतु पांडवाना जयद्रथच्या या कुकर्माची चाहूल लागली आणि त्यांनी द्रौपदीला त्याच्या बंधनातून मुक्त केले.

 • Mahabharata draupadi story in marathi

  कीचक
  द्रौपदीला महालात पाहताच कीचक तिच्यावर मोहित झाला. कीचकच्या वाईट हेतूंविषयी द्रौपदीला समजल्यानंतर तिने सर्व हकीकत पांडवांना सांगितली. एका रात्री भीम द्रौपदीचे वस्त्र परिधान करून कीचकच्या खोलीत गेला. कीचकने द्रौपदी समजून भीमावर हात टाकला आणि त्याचेवेळी भीमाने त्याचा वध केला.

 • Mahabharata draupadi story in marathi

  दुःशासन
  कौरवांनी पांडवांना द्यूतक्रीडा (जुगार) खेळण्याचे आमंत्रण दिले आणि पांडवांनी क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी हे आमंत्रण स्वीकारले. कौरवांनी कपट कारस्थान करून पांडवांना जुगारात हरवले. जुगाराच्या डावात पांडव द्रौपदीलाही हरून बसले. भर सभेत दुर्योधनाचा लहान भाऊ दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला. दुर्योधनाच्या सांगण्यावरून त्याने द्रौपदीचे वस्त्रहरण केले. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने द्रौपदीचे वस्त्रहरण होऊ शकले नाही.

 • Mahabharata draupadi story in marathi

  कर्ण
  दुर्योधनाचा मित्र आणि अंगराज कर्णाचीसुधा द्रौपदीवर दृष्टी होती. द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये कर्ण द्रौपदीशी लग्न करण्याच्या इच्छेने सहभागी झाला होता. कर्ण जेव्हा लग्नाचा पण पूर्ण करण्यासाठी उभा राहिला तेव्हा तो क्षत्रिय नसल्याचे सांगून त्याला स्वयंवरात सहभागी करून घेतले नाही. या अपमानाचा बदला कर्णाने द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी घेतला. कर्ण द्रौपदीला म्हणाला की, जी स्त्री पाच पतींसोबत राहते तिला मान काय आणि अपमान काय सर्वकाही सारखेच आहे.

 • Mahabharata draupadi story in marathi

  दुर्योधन
  महाभारताचा खलनायक दुर्योधनाला मानले जाते. दुर्योधनाने पांडव जुगारात डाव हरल्यानंतर द्रौपदीला भर सभेत केसांना धरून ओढत आणण्याचा आदेश दिला होता. यानेच द्रौपदीला निर्वस्त्र करण्याची आज्ञा दिली होती. द्रौपदीला सभेत आणल्यानंतर दुर्योधनाने तिला त्याच्या मांडीवर बसण्यास सांगितले होते. याच कारणामुळे भीमाने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा घेतली होती. महाभारत युद्ध सामातीच्या वेळी भीमाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

Trending