एका ऋषींच्या शापामुळे / एका ऋषींच्या शापामुळे यमदेवालाही घ्यावा लागला होता मनुष्य अवतार

May 08,2018 09:18:00 AM IST

धर्म ग्रंथानुसार, मनुष्याच्या मृत्यूनंतर यमदूत मृत व्यक्तीच्या आत्मा यमदेवाकडे घेऊन जातात. येथे यमदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, यमदेवालाही एका ऋषींच्या शापामुळे पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घ्यावा लागला होता. येथे जाणून घ्या, संपूर्ण कथा...


मांडव्य ऋषींचा यमदेवाला शाप
महाभारतानुसार, मांडव्य नावाचे एक ऋषी होते. राजाने चुकीने त्यांना चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली. सुळावर काही दिवस राहूनही जेव्हा त्यांचे प्राण गेले नाहीत, तेव्हा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी मांडव्य ऋषींची क्षमा मागून त्यांना सोडून दिले. त्यानंतर मांडव्य ऋषी यमदेवाकडे गेले आणि यमदेवाला विचारले की, मी असा कोणता गुन्हा केला होता ज्यामुळे मला अशाप्रकारे खोट्या आरोपाची शिक्षा भोगावी लागली. तेव्हा यमदेवाने सांगितले की, तुम्ही 12 वर्षांचे असताना एका भुंग्याला सुई टोचवली होती, त्या फळस्वरुपात तुम्हाला हे दुःख भोगावे लागले. तेव्हा मांडव्य ऋषी यमदेवाला म्हणाले की, 12 वर्षाच्या वयात तर कोणालाही धर्म-अधर्माचे ज्ञान नसते. तुम्ही छोट्या अपराधाची मला मोठी शिक्षा दिली आहे. यामुळे मी तुम्हाला शाप देतो की, तुम्हाला क्षुद्र योनीत एका दासी पुत्राच्या रुपात जन्म घ्यावा लागेल. ऋषी मांडव्य यांच्या याच शापामुळे यमदेवाने महात्मा विदुर रुपात जन्म घेतला.


पुढील स्लाईडवर वाचा, विदुराचा कसा झाला मृत्यू...

जेव्हा धृतराष्ट, गांधारी आणि कुंती वानप्रस्थ आश्रमात वास्तव्यास होते, तेव्हा युधिष्ठीर कुटुंबीयांसोबत त्यांना भेटण्यासाठी गेले. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती याना पाहून पांडवांना पाहून खूप आनंद झाला. तेथे विदुर न दिसल्यामुळे युधिष्ठीरने त्यांच्याविषयी धृतराष्ट्रांकडे विचारणा केली. धृतराष्ट्रांनी सांगितले की, ते कठोर तप करत आहेत. तेव्हा युधिष्ठीरला विदुर त्यांच्याकडे येत असल्याचे दिसले, परंतु आश्रमात एवढे लोक पाहून ते पुन्हा मागे फिरले. युधिष्टिर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या मागे धावले. तेव्हा एका झाडाखाली विदुर त्यांना उभे असलेले दिसले. त्याचवेळी विदुरांच्या शरीरातील प्राण युधिष्ठीरमध्ये सामावला.
X