भगवान परशुराम यांना / भगवान परशुराम यांना का येत होता एवढा राग? हे आहे कारण

Apr 18,2018 10:40:00 AM IST

हिंदू पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा सण 18 एप्रिल, बुधवारी आहे. धर्म ग्रंथानुसार, या दिवशी भगवान विष्णू यांचे अवतार परशुराम यांचा जन्म झाला होता. आज आम्ही तुम्हाला भगवान परशुराम यांच्याविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.


यामुळे भगवान परशुराम यांच्यामध्ये होते क्षत्रियांचे गुण
महर्षी भृगुचे पुत्र ऋचिकचा विवाह राजा गाधिची पुत्री सत्यवतीसोबत झाला होता. विवाहानंतर सत्यवतीने आपले सासरे महर्षी भृगु यांच्याकडे यांना पुत्राची याचना केली तसेच सत्यवतीच्या आईनेसुद्धा ऋषींकडे पुत्र प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. तेव्हा महर्षी भृगुने सत्यवतीला दोन फळ दिले आणि म्हटले की, ऋतु स्नानानंतर तू उंबराचे वृक्ष आणि तुझ्या आईने पिंपळाच्या वृक्षाला आलिंगन केल्यानंतर हे फळ खावे. परंतु सत्यवती आणि त्यांच्या आईने हे काम करण्यात चुक केली. ही गोष्ट महर्षी भृगुला कळाली. तेव्हा त्यांनी सत्यवतीला सांगितले की, तु चुकीच्या वृक्षाला आलिंगन दिले आहे. यामुळे तुझा पुत्र ब्राम्हण असूनही क्षत्रिय गुणांचा असेल आणि तुझ्या आईचा पुत्र क्षत्रिय असूनही ब्राम्हणांप्रमाणे आचरण करेल.


तेव्हा सत्यवतीने महर्षि भृगुला प्रार्थना केली की, माझा पुत्र क्षत्रिय नसावा. त्यावर ऋषी म्हणाले की तुझा मुलगा क्षत्रिय झाला नाही तर तुझा नातू मात्र अवश्य क्षत्रीय होईल. काही काळानंतर जमदग्नी ऋषींनी सत्यवतीच्या गर्भातून जन्म घेतला. त्यांचे आचरण ऋषिंप्रमाणे होते. त्यांचा विवाह रेणुकेसोबत झाला. ऋषी जमदग्नी यांना चार पुत्र झाले. त्यामधील परशुराम हे चौथे होते. अशाप्रकारे एका चुकीमुळे परशुरामाचा स्वभाव क्षित्रियांप्रमाणे होता.


परशुरामासंबंधीत इतर रंजक तथ्य जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

पितामह भीष्म यांना करु शकले नाहीत पराभूत महाभारतानुसार, महाराज शांतनुचे पुत्र भीष्माने परशुरामाकडून अस्त्र-शस्त्राची विद्या प्राप्त केली होती. एकदा भीष्म यांनी काशीमध्ये होणा-या स्वयंवरातून काशीराजाच्या मुली अंबा, अंबिका आणि अंबालिकाला आपल्या लहान भाऊ विचित्रवीर्यसाठी पळवून आणले. तेव्हा अंबाने भीष्माला सांगितले की, तिने मनातल्या मनात राजा शाल्वला आपले पती मानले आहे. तेव्हा भीष्माने तिला सन्मानाने काशीला पाठवले, परंतु हरण केलेले असल्यामुळे शाल्वने अंबाचा स्वीकार केला नाही. तेव्हा अंबा भीष्म यांचे गुरु परशुरामांकडे पोहोचली आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. अंबाची कथा ऐकून परशुराम यांनी भीष्माला तिच्यासोबत विवाह करण्यास सांगितले. परंतु ब्रम्हचारी असल्यामुळे भीष्माने असे करण्यास नकार दिला. तेव्हा परशुराम आणि भीष्मामध्ये युद्ध झाले. शेवटी आपल्या पितरांचे ऐकून परशुराम यांनी आपले अस्त्र ठेवले. अशाप्रकारे या युध्दात कोणाचा विजय किंवा पराभव झाला नाही.राम कसे बनले परशुराम बाल्यावस्थेत परशुरामाचे आई-वडिल त्यांना राम म्हणून आवाज देत होते. राम मोठे झाल्यावर त्यांनी वडिलांकडून वेदांचे ज्ञान प्राप्त केले. वडिलांकडे त्यांनी धनुर्विद्या शिकण्याची इच्छा प्राप्त केली. ऋषी जमदग्नी यांनी त्यांना हिमालयात जाऊन महादेवाला प्रसन्न करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा ऐकून रामाने असेच केले. तेव्हा आसुरांच्या त्रासाने त्रस्त झालेले देवता महादेवाजवळे पोहोचले आणि असुरांपासून मुक्ति मिळवण्याचे निवेदन केले. तेव्हा महादेवाने तपस्या करत असलेल्या रामाला असुरांचा नाश करण्यास सांगितले. रामाने कोणत्याही मदतीशिवाय त्या आसुरांचा नाश केला. रामाचा हा पराक्रम पाहून महादेवाने त्यांना अनेक अस्त्र-शस्त्र प्रदान केले. यामधूनच एक परशु हे अस्त्र होते. हे अस्त्र रामाला खुप प्रिय होते. हे प्राप्त केल्यानंतर रामाचे नाव परशुराम झाले.
X