Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Shani Jayanti 2018 gujrat kashtbhanjan temple information

येथे स्त्री वेशात हनुमानाच्या पायाजवळ बसले आहेत शनिदेव, खास आहे कारण

रिलिजन डेस्क | Update - May 14, 2018, 03:07 PM IST

गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते.

 • Shani Jayanti 2018 gujrat kashtbhanjan temple information

  गुजरातमध्ये भावनगर येथील सारंगपूर येथे हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. जे कष्टभंजन हनुमान नावाने ओळखले जाते. हे मंदिर खूप खास मानले जाते कारण येथे हनुमानासोबत शनिदेव विराजित आहेत. एवढेच नाही तर येथे शनिदेव स्त्री रुपात हनुमानाच्या चरणाजवळ बसलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला शनी जयंतीच्या (15 मे, मंगळवार)च्या निमित्ताने या संदर्भातील एक पौराणिक कथा सांगत आहोत.


  का हनुमानाच्या पायाजवळ स्त्री रुपात बसले आहेत शनिदेव
  पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी शनिदेवाचा प्रकोप खूप वाढला होता. या प्रकोपामुळे सर्व लोकांना दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागत होते. शनिदेवापासून मुक्ती मिळवण्यासाठी भक्तांनी हनुमानाकडे प्रार्थना केली. भक्तांचे दुःख ऐकून हनुमान शनीदेवावर क्रोधीत झाले आणि त्यांनी शनिदेवाला दंडित करण्याचा निश्चय केला. शनिदेवाला ही गोष्ट समजताच ते खूप घाबरले आणि हनुमानाच्या क्रोधापासून दूर राहण्यासाठी उपाय शोधू लागले. शनिदेवाला हे माहिती होते की, हनुमान बालब्रह्मचारी असून ते स्त्रियांवर हात उचलत नाहीत. यामुळे शनिदेवाने स्त्रीचे रूप धारण केले आणि हनुमानाच्या चरणाजवळ बसून क्षमा मागू लागले. तेव्हापासून आजपर्यंत या मंदिरात शनिदेव हनुमानाच्या चरणाजवळ स्त्री रुपात आहेत. भक्तांचे कष्ट दूर केल्यामुळे या मंदिराला कष्टभंजन हनुमान मंदिर नावाने ओळखले जाते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंदिराशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

 • Shani Jayanti 2018 gujrat kashtbhanjan temple information

  एखाद्या किल्ल्याप्रमाणे आहे मंदिराचा परिसर
  सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. हा एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसतो. हे मंदिर आपल्या पौराणिक महत्त्वासोबतच येथील सौंदर्य आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. कष्टभंजन हनुमान सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असून यांना महाराजाधिराज नावानेही ओळखले जाते. हनुमानाच्या मूर्तीजवळ वानर सेना आहे.

 • Shani Jayanti 2018 gujrat kashtbhanjan temple information

  येथे दूर होतात सर्व शनि दोष
  एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असल्यास या मंदिरातील कष्टभंजन हनुमानाचे दर्शन आणि पूजन केल्यास सर्व दोष नष्ट होतात असे मानले जाते. याच कारणामुळे या मंदिरात वर्षभर भक्तांची गर्दी राहते.

Trending