Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Story Of Lord Hanuman Son Makardhwaj

तुम्हाला माहिती आहे का, हनुमानाचा मुलगा मकरध्वजचा जन्म कसा झाला होता

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 09, 2017, 02:37 PM IST

सर्वांनाच हे माहिती असेल की, भगवान श्रीरामाचे परमभक्त आणि महादेवाचे 11 वे रुद्र अवतार श्रीहनुमान बालब्रह्मचारी होते.

 • Story Of Lord Hanuman Son Makardhwaj

  सर्वांनाच हे माहिती असेल की, भगवान श्रीरामाचे परमभक्त आणि महादेवाचे 11 वे रुद्र अवतार श्रीहनुमान बालब्रह्मचारी होते. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, शास्त्रामध्ये हनुमानाच्या एका मुलाचेही वर्णन आढळून येते. हनुमानाच्या मुलाचे नाव मकरध्वज होते. एका माशापासून मकरध्वजचा जन्म झाला होता. संपूर्ण जगात केवळ 2 मंदिर असे आहेत, जेथे हनुमान आणि मकरध्वज यांची पूजा केली जाते.


  असा झाला होता मकरध्वजचा जन्म
  धर्म शास्त्रानुसार, हनुमान सीतेच्या शोधात लंकेला पोहचल्यानंतर मेघनादने त्यांना पकडून रावणाच्या दरबारात प्रस्तुत केले. तेव्हा रावणाने हनुमानाच्या शेपटीला जाळून टाकण्याचे आदेश दिले आणि हनुमानाने त्याच जळत्या शेपटीने संपूर्ण लंका जाळून टाकली. जळलेल्या शेपटीमुळे हनुमानला तीव्र वेदना होत होत्या. वेदना शांत करण्यासाठी हनुमान समुद्राच्या पाण्याने शेपटीचा अग्नी शांत करण्यासाठी पोहचले. त्यावेळी त्यांच्या घामाचा एक थेंब समुद्राच्या पाण्यात पडला जो एका मत्स्य कन्येने गिळून घेतला. त्याच घामाच्या थेंबाने मत्स्यकन्या गर्भवती राहिली आणि तिच्यापासून एक पुत्र उत्पन्न झाला. त्या मुलाचे नाव मकरध्वज ठेवण्यात आले. मकरध्वजसुद्धा हनुमानाप्रमाणे पराक्रमी, तेजस्वी होता. अहिरावण याने मकरध्वजला पाताळ लोकचा द्वारपाल म्हणून नियुक्त केले होते.


  जेव्हा अहिरावणने श्रीराम आणि लक्ष्मण यांना देवीसमोर बळी देण्यासाठी पाताळात आणले तेव्हा श्रीराम आणि लक्ष्मणाला मुक्त करण्यासाठी हनुमान पाताळलोकात पोहचले. त्याठिकाणी त्यांची भेट मकरध्वजशी झाली. मकरध्वजने आपल्या उत्पत्तीची कथा हनुमानाला सांगितली. त्यांनतर हनुमानाने अहिरावण याचा वध करून श्रीराम आणि लक्ष्मण यांची मुक्तता केली. त्यानंतर श्रीरामाने मकरध्वजला पाताळ लोकचा अधिपती नियुक्त केले आणि त्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मकरध्वज आणि हनुमान एकत्र असलेल्या दोन मंदिरांविष्यी...

 • Story Of Lord Hanuman Son Makardhwaj
  हनुमान मकरध्वज मंदिर (भेंटद्वारिका, गुजरात)

  मकरध्वज आणि हनुमानाचे पहिले मंदिर गुजरात येथील भेंटद्वारिका येथे स्थित आहे. हे स्थान मुख्य द्वारकेपासून दोन किलोमीटर आत आहे. या मंदिराला दांडी हनुमान मंदिराच्या नावाने ओळखले जाते. असे मानले जाते की, याच ठिकाणी पहिल्यांदा हनुमान आणि मकरध्वज यांची भेट झाली असे मानण्यात येते. मंदिरात प्रवेश करताच समोर मकरध्वजची मूर्ती आणि जवळच हनुमानाची मूर्ती आहे. या दोन्ही मूर्तीची विशेषता अशी आहे की, या दोघांच्याही हातामध्ये कोणतेही शस्त्र नाहीत तसेच हे आनंदी मुद्रेमध्ये आहेत.

 • Story Of Lord Hanuman Son Makardhwaj

  राजस्थानमधील अजमेरपासून ५० किलोमीटर लांब जोधपुर मार्गावर स्थित ब्यावरमध्ये हनुमानाचा मुलगा मकरध्वजचे मंदिर आहे, याठिकाणी मकरध्वजसोबत हनुमानाची पूजा केली जाते. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी देशातील विविध भागातून श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येतात. या ठिकाणी शारीरिक, मानसिक आजार तसेच भूतबाधांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. संपूर्ण भारतामध्ये हेच एक असे मंदिर असावे ज्याठिकाणी हनुमान आणि त्यांच्या मुलाची एकत्रित पूजा-अर्चना केली जाते.

Trending