आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रौपदी आणि पांडव सशरीर स्वर्गात जाण्यास इच्छुक होते, परंतु गेले फक्त युधिष्ठिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीसहित पांडवानी राजपाठ त्याग करून सशरीर स्वर्गात जाण्याचा निश्चय केला. परंतु रस्त्यामध्येच द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांचा मृत्यू झाला. भीमाने यांच्या मृत्यूचे रहस्य विचारल्यानंतर युधिष्ठिरने सांगितले की, च द्रौपदी आपल्या सर्वांमध्ये सर्वात जास्त अर्जुनावर प्रेम करत होती आणि नकुलला स्वतःच्या रूपावर गर्व होता. यामुळे हे सशरीर स्वर्गात जाऊ शकले नाहीत. येथे जाणून घ्या, संपूर्ण प्रसंग...


सर्वात पहिले झाले द्रौपदीचे पतन
पाच पांडव, द्रौपदी आणि एक श्वान सुमेरु पर्वत चढत असताना द्रौपदी जमिनीवर कोसळली. द्रौपदीला पडलेले पाहून भीमने युधिष्ठीरला विचारले की, द्रौपदीने तर कधीच कोणतेही पाप केले नाही. मग कोणत्या कारणामुळे द्रौपदी कोसळली? युधिष्ठीरने सांगितले की, द्रौपदी आपल्या सर्वांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम करत होती. यामुळे तिच्यासोबत असे घडले. एवढे बोलून युधिष्ठीर द्रौपदीला न पाहताच पुढे मार्गस्थ झाले.


त्यानंतर कोसळले सहदेव
द्रौपदीनंतर थोड्यावेळाने सहदेवसुद्धा कोसळले. भीमने सहदेव पडण्याचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, सहदेव कोणालाही स्वतःपेक्षा जास्त विद्वान समजत नव्हता. याच दोषामुळे त्याची आज ही स्थिती झाली आहे.


असा झाला नकुलचा मृत्यू
द्रौपदी आणि सहदेवनंतर चालता-चालता नकुलसुद्धा खाली पडले. भीमाने नकुल खाली पडण्यामागचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, नकुलला स्वतःच्या रूपाचा खूप अभिमान होता. तो कोणालाही स्वतःप्रमाने रूपवान समजत नव्हता. यामुळे आज त्याची ही गती झाली आहे.

 

यामुळे झाले अर्जुनाचे पतन
युधिष्ठीर, भीम, अर्जुन आणि श्वान पुढे जात असतानाच अर्जुन जमिनीवर कोसळला. युधिष्ठीरने भीमाला सांगितले की, अर्जुनाला स्वतःच्या पराक्रमावर जास्त अभिमान होता. अर्जुन म्हणाला होता की, मी एका दिवसातच सर्व शत्रूंचा नाश करून टाकेल, परंतु असे केले नाही. स्वतःच्या या अहंकारामुळे अर्जुनाची आज अशी स्थिती झाली आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारे झाला भीमचा मृत्यू...

बातम्या आणखी आहेत...