Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | who enjoying sex most man or woman

संभोग सुखाचा सर्वोच्च आनंद कोण उपभोगतो, स्त्री की पुरुष ?

जीवनमंत्र डेस्क | Update - Dec 14, 2017, 12:01 AM IST

या वादग्रस्त विषयावर प्राचीन काळापासून चर्चा सुरु आहेत की, संभोग करताना स्त्री आणि पुरुषामध्ये कोण जास्त आनंद उपभोगतो.

 • who enjoying sex most man or woman

  या वादग्रस्त विषयावर प्राचीन काळापासून चर्चा सुरु आहेत की, संभोग करताना स्त्री आणि पुरुषामध्ये कोण जास्त आनंद उपभोगतो. या विषयी वेगवेगळी मतं असू शकतात. हिंदूंचा प्रसिद्ध धर्मग्रंथ 'महाभारत' आणि ग्रीक (युनान)च्या धर्म ग्रंथामध्ये या प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या दोन कथा सांगण्यात आल्या असून या दोन्ही पौराणिक कथांचे चकित करणारे उत्तर एकच आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन कथा आणि या प्रश्नाचे उत्तर सांगत आहोत.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रोचक पौराणिक कथा आणि प्राण्याचा आनंद कोण जास्त उपभोगतो स्त्री का पुरुष..

 • who enjoying sex most man or woman

  जेव्हा युधिष्ठीरने पितामह भीष्म यांना विचारला हा प्रश्न
  एकदा युधिष्ठीर पितामह भीष्मकडे गेले आणि म्हणाले ' हे तातश्री ! तुम्ही माझी एक शंका दूर कराल का? तुम्ही मला सत्य सांगा की, स्त्री किंवा पुरुषामध्ये संभोग करताना कोण जास्त आनंद प्राप्त करतो? भीष्म म्हणाले या संदर्भात मी तुला भंगस्वाना आणि सकाराची कथा सांगतो. या कथेमध्ये तुझ्या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

 • who enjoying sex most man or woman

  प्राचीन काळी भंगस्वाना नावाचा एक राजा होऊन गेला. तो न्यायप्रिय आणि यशस्वी राजा होता, परंतु त्याला एकही आपत्य नव्हते. एका अपत्याच्या प्राप्तीसाठी त्याने 'अग्नीष्टुता' नावाचे अनुष्ठान केले. या यज्ञामध्ये केवळ अग्नी देवाचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे देवराज इंद्र खूप क्रोधीत झाले.


  इंद्रदेव स्वतःचा राग काढण्यासाठी राजा भंगस्वाना केव्हा एखादी चूक करतात या संधीचा शिधात होते. पंरतु भंगस्वाना एवढा चांगला राजा होता की, त्याच्याकडून कोणतीही चूक होत नव्हती, हे पाहून इंद्रदेवाचा राग अधिकच वाढत चालला होता. एके दिवशी राजा शिकारीसाठी निघाला असताना इंद्रदेवाने विचार केला की, अपमानाचा बदल घेण्याची ही संधी चांगली आहे. इंद्रदेवाने राजा भंगस्वानाला संमोहित केले.


  पुढे जाणून घ्या, नंतर काय घडले....

 • who enjoying sex most man or woman

  राजा भंगस्वाना जंगलात इकडे-तिकडे भटकू लागला. संमोहनाच्या प्रभावामुळे तो शुद्ध हरपून बसला. राजाला दिशाही लक्षात येत नव्हत्या आणि सैनिकही दिसत नव्हते. तहान-भुकेने तो व्याकूळ झाला होता. थोड्यावेळाने त्याला एक नदी दिसली. ती नदी त्याला एखाद्या जादुसारखी वाटली. राजाने सर्वात पहिले आपल्या घोड्याला पाणी पाजले आणि नंतर स्वतः पाणी घेतले. राजाने नदीमध्ये पाणी पिण्यासाठी प्रवेश केला आणि पाणी प्यायल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होत असल्याचे त्याला जाणवले. हळूहळू तो एका स्त्रीमध्ये रुपांतरीत झाला. शरमेने राजा मोठमोठ्या विलाप करू लागला, त्याला काय घडले हे काहीच कळेना.


  पुढे वाचा, त्यानंतर काय घडले....

 • who enjoying sex most man or woman

  राजा भंगस्वाना विचार करू लागला की, 'हे प्रभू! या अनर्थानंतर मी आता माझ्या राज्यात परत कसा जाऊ? माझ्या 'अग्नीष्टुता' अनुष्ठानामुळे मला 100 पुत्र झाले आहेत, त्यांना मी कसे भेटू? राणी माझी वाट पाहात असेल, तिला कसे भेटू? माझ्या पौरुषासोबत माझे राज्य नष्ट होईल तसेच माझ्या प्रजेचे काय होईल. अशाप्रकारे राजा दुःख करीत आपल्या राज्यात परत आला.


  स्त्री रुपात राजाला पाहून सर्वजण चकित झाले. राजाने सभा बोलावून आपल्या राणी, मुलांना, मंत्र्यांना सांगितले की, मी आता राज्य सांभाळण्यास लायक राहिलो नाही. तुम्ही सर्वजण येथे सुखाने राहा आणि मी जगलात जाऊन माझे उर्वरित आयुष्य जगतो.


  पुढे वाचा, त्यानंतर काय घडले....

 • who enjoying sex most man or woman

  असे सांगून राजाने जंगलाकडे प्रस्थान केले. जंगलात गेल्यानंतर तो स्त्री रुपात एका साधूंच्या आश्रमात राहू लागला. तेथे तिने अनेक पुत्रांना जन्म दिला. काही काळानंतर ती आपल्या सर्व मुलांना घेऊन राज्यात परत गेली आणि आपल्या पूर्वीच्या मुलांना म्हणाली की, तुम्ही सर्वजण माझे पुत्र आहात जेव्हा मी एक पुरुष होतो आणि हे माझे पूत्र आहेत जेव्हा मी एक स्त्री आहे. तुम्ही सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्रतीतपणे राहून राज्य करा. सर्व भाऊ एकत्रीतपणे सुखात राहू लागले.


  पुढे वाचा, त्यानंतर काय घडले....

 • who enjoying sex most man or woman

  सर्वांना सुखी जीवन जगताना पाहून इंद्रदेव अधिक क्रोधीत झाले. इंद्रदेवाला असे वाटू लागले की, राजाला स्त्री रुपात बदलून मी त्याच्यासोबत वाईट नाही तर चांगलेच केले. त्यानंतर इंद्रदेव एक ब्राह्मणाचे रूप घेऊन राजा भंगस्वानाच्या राज्यात पोहोचले. तेथे जाऊन इंद्रदेवाने सर्व राजकुमारांचे कान भरण्यास सुरुवात केली.


  इंद्रदेवाने सर्व भावांमध्ये भांडण लावल्यामुळे सर्व भावंडांनी एकमेकाला मारून टाकले. ही गोष्ट राजा भंगस्वानाला समजताच तो खूप दुःखी झाला. ब्राह्मण रुपात इंद्रदेव राजाजवळ गेले आणि विचारले तू का रडत आहेस. भंगस्वानाने रडत रडत सर्व घटना इंद्रदेवाला सांगितली. त्यानंतर इंद्रदेवाने स्वतःचे खरे रूप दाखवून राजाला त्याची चूक सांगितली.


  पुढे वाचा, त्यानंतर काय घडले....

 • who enjoying sex most man or woman

  इंद्रदेवाने सांगितले की, ' तू फक्त अग्नीची पूजा केली आणि माझा अनादर केलास यामुळे मी तुझ्यासोबत असे केले.' हे ऐकताच भंगस्वाना इंद्रदेवाच्या पायामध्ये पडला आणि त्याने आपल्याकडून नकळतपणे झालेल्या चुकीची क्षमा मागितली. राजाची अशी दयनीय अवस्था पाहून इंद्रदेवाला दया आली आणि त्यांनी राजाला क्षमा करत आपल्या पुत्रांना जिवंत करण्याचे वरदान दिले.


  इंद्रदेव म्हणाले, 'हे स्त्री रुपी राजन, या सर्व मुलांमधील कोत्याही एका रूपातील मुलांना तू जिवंत करू शकतेस. भंगस्वाना इंद्रदेवाला म्हणाली की, मी स्त्री रुपात असताना झालेल्या मुलांना तुम्ही जिवंत करा. चकित झालेल्या इंद्रदेवाने यामागचे कारण विचारले. राजाने उत्तर दिले की, ' हे इंद्र ! एका स्त्रीचे प्रेम पुरुषाच्या प्रेमापेक्षा जास्त असते यामुळे मी माझ्या गर्भातून जन्मलेल्या मुलांचे जीवनदान मागते.


  पुढे वाचा, त्यानंतर काय घडले....

 • who enjoying sex most man or woman

  भीष्माने या कथेला पुढे वाढवत युधिष्ठीरला सांगितले की, इंद्रदेव राजावर प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाचा सर्व मुलांना जिवंत केले. त्यानंतर इंद्रदेवाने पुन्हा राजाला पुरुष रूप देण्याविषयी विचारले. परंतु राजाने पुन्हा पुरुष रूप घेण्यास स्पष्ट नकार दिला.

  पुढा वाचा राजाने इंद्रदेवाला नकार का दिला....

 • who enjoying sex most man or woman

  स्त्री रुपात भंगस्वाना राजा म्हणाला की, 'हे इंद्रदेव, मी स्त्री रूपातच खुश असून मला स्त्री रूपातच राहण्याची इच्छा आहे. हे ऐकून इंद्रदेव उत्सुक झाले आणि त्यांनी विचारले असे का राजन, तुम्हाला पुन्हा पुरुष बनून राज्यकारभार करायचा नाही का? राजा म्हणाला, ' हे देवा, संभोगाच्या वेळी स्त्रीला पुरुषापेक्षा अधिक आनंद, तृप्ती आणि सुख मिळते. यामुळे मला स्त्रीच राहू द्या. इंद्रदेव तथास्तु म्हणून तेथून निघून गेले.

  पुढे वाचा, ग्रीक कथा...

 • who enjoying sex most man or woman

  तिरेसिआस नावाचा एक राजा एकदा शिकार करण्यासाठी जंगलात गेला. तेथे त्याने दोन मोठ्या सापांना संभोग करताना पाहिले. ते पाहून राजाच्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक आणि त्याने शिपायांना आदेश देऊन त्या सापांना विभक्त केले. त्याचवेळी एक आकाशवाणी झाली आणि राजाला त्याचे पौरुषत्व जाईल असा शाप मिळाला. त्यानंतर तो राजा एका स्त्रीमध्ये रुपांतरीत झाला.

 • who enjoying sex most man or woman

  अनेक वर्षांनंतर तिरेसिआस आपल्या स्त्री रुपात पुन्हा त्याच जंगलातून जाऊ लागला. त्याच्या मनामध्ये त्या सापांबद्दल अजूनही द्वेष होता. त्याने पुन्हा शिपायांना एका सापाच्या जोडप्याला विभक्त करण्यास सांगितले परंतु यावेळेस सापाचे जोडपे विभक्त होताच तो राजा पुन्हा स्त्री रूपातून पुरुष रुपात आला. त्यानंतर त्याकाळात तो एकमेव्क असा व्यक्ती होता ज्याने स्त्री आणि पुरुष दोघांचेही जीवन जगले होते. त्याचवेळी ग्रीक भगवान जिउस आणि त्यांची पत्नी हिरा यांच्यामध्ये वाद चालू होता की, सेक्सचा आनंद सर्वात जास्त कोण घेतो, स्त्री की पुरुष?


  त्यांनी या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तिरेसिआसला बोलावून घेतले. तिरेसिआसने जिउस आणि हिरा यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले की - महिला पुरुषांपेक्षा 9 टक्के जास्त सेक्सचा आनंद घेतात. या उत्तराने देवी हिरा खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी तिरेसिआसवर वार केला, यामध्ये तो अंध झाला. भगवान जिउस यांनी तिरेसिआसच्या अंधत्वासाठी स्वतःला जबाबदार मानले आणि त्यांनी त्याला भविष्य पाहण्याचे वरदान दिले.

Trending