आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळस नाही श्रीकृष्णाची पत्नी, तरीही या पानांशिवाय पूर्ण होत नाही नैवेद्य, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळी जलंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. या राक्षसाचे लग्न वृंदा नावाच्या एका मुलीशी झाले. वृंदा भगवान विष्णूची भक्त होती. वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे जलंधर अजेय झाला होता. या राक्षसाने एका युद्धामध्ये महादेवालाही पराभूत केले होते. या गोष्टीचा जलंधरला खूप अहंकार आणि गर्व झाला होता. तो स्वर्गातील देवतांना, अप्सरांना त्रास देवू लागला. दुःखी होऊन सर्व देवता भगवान विष्णूला शरण गेले आणि जलंधरच्या त्रासातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले. भगवान विष्णू यांनी आपल्या माया शक्तीने जलंधरचे रूप धारण केले. माया शक्तीने त्यांनी वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. यामुळे जलंधरची शक्ती क्षीण झाली. युद्धामध्ये तो मृत्युमुखी पडला. जेव्हा वृंदाला भगवान विष्णूच्या छळ-कपाटाबद्दल समजले तेव्हा तिने विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, कथेचा उर्वरित भाग...
बातम्या आणखी आहेत...