Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | How Can Arjuna Change As Brihannala Without A Curse

या कारणामुळे महान योद्धा अर्जुनाला व्हावे लागले किन्नर, अशी आहे कथा

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 10, 2017, 10:00 AM IST

महाभारताचा महान योद्धा अर्जुनचा जन्म इंद्र कृपेने झाला होता. यामुळे इंद्रदेवाला अर्जुनाचे वडीलही मानले जाते.

 • How Can Arjuna Change As Brihannala Without A Curse
  महाभारताचा महान योद्धा अर्जुनचा जन्म इंद्र कृपेने झाला होता. यामुळे इंद्रदेवाला अर्जुनाचे वडीलही मानले जाते. कौरवांशी युद्ध करण्यासाठी अर्जुन स्वतःची शक्ती वाढवण्यात मग्न होते. याकाळात इंद्रदेवाने दिव्यास्त्रांचे सखोल ज्ञान घेण्यासाठी अर्जुनाला इंद्रपुरीत बोलावले.

  महाभारताच्या वनपर्वमधील इंद्रलोकाभिगमन पर्वामध्ये याची सविस्तर कथा आढळून येते. यानुसार इंद्रलोकातील उर्वशी नामक अप्सरा अर्जुनावर मोहित झाली होती. उर्वशी पुरुवंशची आदिमाता होती. त्यांचेच वंशज अर्जुन होता. यामुळे अर्जुनाने उर्वशीचा स्वीकार करण्यास नकार दिला. यामुळे काम पीडेने क्रोधीत झालेल्या उर्वशीने अर्जुनाला नर्तक बनून स्त्रियांमध्ये राहण्याचा नपुंसक होण्याचा शाप दिला. त्यानंतर इंद्रदेवाच्या कृपेने अर्जुनाला असे वरदान मिळाले की, ते केवळ काही काळासाठीच नपुंसक राहतील आणि त्यांना हवे असेल तेव्हा पुरुषत्व प्राप्त करतील. हेच किन्नर रूप अर्जुनाने वनवास काळात अज्ञातवासामध्ये धारण केले होते.

  पुढे जाणून घ्या, उर्वशी आणि राजा पुरुरवा कसे आले एकत्र...

 • How Can Arjuna Change As Brihannala Without A Curse
  एकदा उर्वशी इंद्राच्या सभेत नाचत होती आणि तेथे मृत्युलोकातून आले राजा पुरुरवा (पांडवांचे वंशज) हेसुद्धा उपस्थित होते.
 • How Can Arjuna Change As Brihannala Without A Curse
  उर्वशीला पाहून पुरुरवा तिच्यावर मोहित झाले आणि यादरम्यान उर्वशीचे नृत्य बिघडले. यामुळे क्रोधीत झालेल्या इंद्रदेवाने उर्वशीला मृत्युलोकात राजासोबत राहण्याचा दंड दिला.
 • How Can Arjuna Change As Brihannala Without A Curse
  मृत्युलोकात उर्वशी पुरुरवाची पत्नी बनून राहू लागली आणि त्यांना नऊ पुत्र झाले. अनेक वर्ष पुरुरवासोबत राहण्याची अट पूर्ण झाल्यानंतर उर्वशी पुन्हा स्वर्गलोकात परतली आणि इंद्रदेवाने तिला आपल्या अप्साराच्या रुपात स्वीकारले.

Trending