Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Know Life Story Of Raja Bharthari Ujjain

उज्जैनचा हा राजा 1 स्त्रीच्या प्रेमात झाला वेडा, धोका मिळाल्यानंतर बनला साधू

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 15, 2017, 12:04 AM IST

उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान

 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली.

  ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली. राजाला पिंगलाचे हे कृत्य माहिती नव्हते, कारण तो तिच्या प्रेमात आंधळा झाला होता. जेव्हा छोटा भाऊ विक्रमादित्यला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी मोठ्या भावाला या संदर्भात सर्व माहिती दिली. त्यानंतरही राजा भर्तृहरी पिंगलाच्या बाजूनेच उभा राहिला आणि विक्रमादित्यवरच वाईट चारित्र्याचा आरोप लावत त्याला राज्यातून बाहेर काढले.

  अनेक वर्षानंतर पिंगलाचा व्यभिचार उघड झाला, जेव्हा एका तपस्वी ब्राह्मणाने कठोर तपश्चर्या करून देवतांकडून मिळालेले अमरफळ( हे फळ खाणारा व्यक्ती अमर होतो) राजाला भेट स्वरुपात दिले. राजा पिंगलाच्या प्रेमात एवढा आंधळा झाला होत की, त्याने हे फळ तिला दिले. कारण हे फळ खाल्ल्यानंतर पिंगला नेहमीसाठी तरुण आणि अमर होईल तसेच आपणही तिच्या सहवासात राहू असा राजाने विचार केला.

  पिंगलाने ते फळ घोडे सांभाळणार्‍या सेवकाला दिले. त्या सेवकाने ते फळ एका वेश्येला दिले, जिच्यावर त्याचे प्रेम होते. वेश्येने विचार केला की, हे अमरफळ खाऊन आयुष्यभर तिला या पाप कर्मात राहावे लागेल. यामुळे तिने ते फळ राजाला भेट दिले आणि सांगितले की, तुम्ही हे फळ खाल्ले तर प्रजासुद्धा दीर्घकाळापर्यंत सुखी होईल.

  पिंगलाला दिलेले ते फळ वेश्येकडे पाहून राजा भतृहरीच्या पायाखालची जमीन सरकली. राजाला भावाचे शब्द आठवले आणि पिंगलाचा विश्वासघात लक्षात आला. राजा भतृहरीचे डोळे उघडले आणि पिंगलाबद्दल मनामध्ये घृणा उत्पन्न झाली. त्यानंतर राजाने पिंगला आणि त्या सेवकाला शिक्षा दिली नाही. राजाने सर्व राजवैभवाचा त्याग करून वैराग्य धारण केले. आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये राजा भर्तृहरीने भर्तृहरि शतक ग्रंथामध्ये श्रुंगार शतकच्या माध्यमातून सौंदर्य विशेषतः स्त्री सौंदर्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींना कोणताही पुरुष नाकारू शकत नाही.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्त्रियांच्या स्वभाव व रूपरंगाशी संबंधित काही खास गोष्टी...

 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  स्मितेन भावेन च लज्जया भिया
  परांमुखैरद्र्ध कटाक्ष वीक्षणै:।
  वचोभिरीष्र्या कलहेन लीलया।
  समस्त भावै: खलु बन्धानं स्त्रिय:।।
  सोप्या शब्दात याचा अर्थ
  असा आहे की, स्त्रीचे मोहित करणारे हलकेसे हास्य, लाजणे, तक्रारीच्या भावनेने डोळे फिरवणे, गोड वाणीने किंवा तिरस्कार स्वरुपात वेगवेगळे हावभाव करणे इ. गोष्टी कोणत्याही संसारिक व्यक्तीला बंधनात किंवा मोह जाळ्यात अडकवतात.
 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  स्मितं किंचिद्वक्त्रे सरलतरलो दृष्टविभव:
  परिस्पन्दो वाचामभिनवविलासोक्ति सरस:।
  गतानामारम्भ: किसलयितलीलापरिकर:
  स्पृशन्त्यस्तारुण्यं किमिह न हि रम्यं मृगदृश:।।
  अर्थ -
  नवयुवतीच्या सर्व शरीरातून सौंदर्य झळकते. उदाहरणार्थ, चंद्रासारख्या चेहऱ्यावर मंद हास्य, साधी-सरळ, नैसर्गिक आणि चंचल दृष्टी, मोकळ्यामनाने हावभाव आणि इशारे करत बोलणे इ. गोष्टींमध्ये सौंदर्य सामावलेले असते.
 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  वक्त्रं चंद्रविकासि पंड्कज परीहासक्षमे लोचने
  वर्ण: स्वर्णमपाक रिष्णुरलिनीजिष्णु: कचानांचय:
  वक्षोजाविभकुंभसंभ्रम हरौ गुवी नितम्बस्थली
  वाचां हारि च मार्दवं युवतिष स्वाभाविकं मण्डनम्।।
  अर्थ -पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चेहरा असलेली, कमळाचे सौंदर्य कमी पडेल असे डोळे असणारी, सोन्यासारखा देह, भुंग्यापेक्षाही काळेभोर उडणारे केस, मधुर वाणी, मोहक शरीरयष्टी स्त्रीचे स्वाभाविक दागिने आहेत. यामुळे स्त्रीने श्रुंगार जरी केला नसेल तरीही ती सुंदर दिसते.

  एताश्चलद्वलय सहतिमेलोत्थ
  झंकारनूपुर पराजित राजहंस्य:।
  कुर्वन्ति कस्य न मनो विवशं तरुण्यो
  वित्रस्त मुग्धहरिणी सदृशै: कटाक्षै:।।
  अर्थ -स्त्रीच्या बांगड्या, पैंजणाचा आवाज व चालण्याची पद्धत हंसाच्या चालीलाही मागे टाकते. अशी सुंदर डोळे असणारी स्त्री कोणाच्याही मनाला वशीभूत करत नाहीत.
 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  आदर्शमे दर्शन मात्र कामा
  दृष्टवा परिष्वंग सुखैक लोला।
  आलिगितायां पुनरायताक्ष्या
  माश्यास्महे विग्रहयोरभेदम्।।
  अर्थ -जेव्हा व्यक्तीला स्वतःची पत्नी किंवा प्रेमिका दिसत नाही तेव्हा तो तिला पाहण्यासाठी आतुर होतो. जेव्हा ती समोर येते तेव्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करतो आणि भेटल्यानंतर एकमेकांपासून विभक्त न होण्याची इच्छा निर्माण करतो.

  तावदेव कृतिनामपि स्फुरत्येष निर्मूल विवेक दीपक:
  यावदेव न कुरंग चक्षुषा ताड्यते चपललोचनांचलै:।।
  अर्थ - हरणाप्रमाणे चंचल दृष्टी असणार्या स्त्रीची हवा जोपर्यंत लागत नाही, तोपर्यंतच एखाद्या विद्वानाची विवेक बुद्धी काम करते.
 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  धन्यास्त एव तरलायतलोचनानाम्।
  तारुण्य रूप धन पीनपयोधराणाम्।
  क्षामोदरीपरिलसत्यिवलीलतानाम्
  दृष्टवाकृतिं विकृतिमेति मनो न येषाम्।।
  अर्थ -सुंदर आणि चंचल डोळे असणारी, तरुण, कमनीय बांधा, सुंदर रंगरूप असलेल्या स्त्रीला पाहून ज्या पुरुषांचे मन स्थिर राहते ते धन्य आहेत.

  मालती शिरसि जृम्भणोन्मुखी
  चन्दनं वपुषि कुंकुमान्वितम्।
  वक्षसि प्रियतमा मनोहरा
  स्वर्ग एष परिशिष्ट आगत:।।
  अर्थ - ज्या स्त्रीच्या गळ्यात मालतीफ फुलांच्या कळ्यांचा सुंदर हार असेल. केशर चंदनाचा लेप शरीरावर लावलेला असेल अशी स्त्री जवळ आणि सहवासात असणे म्हणजे स्वर्गसुखापेक्षाही जास्त आनंददायी सुख आहे.
 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  उन्मत्तप्रेमसंरम्भादरभन्ते यदंगना:।
  तव पत्यूहमाधातुं ब्रह्मापि खलु कातर:।।
  अर्थ -
  प्रेमामध्ये वशीभूत स्त्री जे काम करते, त्या कामाला ब्रह्मदेवही थांबवू शकत नाहीत. जर ब्रह्मदेव हे थांबवू शकत नाहीत तर इतरांची काय कथा.
   
  नूनं हि ते कविवरा विपरीत बोधा
  ये नित्यमाहुरबला इति कामिनीनाम्।
  याभिर्विलोलतरतारक दृष्टिपातै
  शक्रादयोपि विजितास्त्वबला: कथं ता:।।
  अर्थ -
  जे कवी स्त्रीला अबला संबोधतात ते खोटारडे आहेत, कारण स्त्रीच्या चंचल दृष्टीसमोर ताकदवान वज्र जवळ असणारे इंद्रदेवसुद्धा हार मानतात. तर मग ती स्त्री अबला कशी काय असू शकते.
 • Know Life Story Of Raja Bharthari Ujjain
  प्रणयमधुरा: प्रेमोदगाढ़ा रसादलसास्तथा
  भणितमधुरा: मुग्धप्राया: प्रकाशित सम्पदा:।
  प्रकृति सुभगा विश्रसम्भार्हा: स्मरोदयायिनी।
  रहसि किमपि स्वैरालापा हरन्ति मृगो दृशाम्।।
  अर्थ- जेव्हा दोन स्त्रिया एकांतात मधुर आवाजात गोपनीय चर्चा करतात, तेव्हा तो आवाज किंवा गोपनीय गोष्टी कोणचेही मन मोहून घेतात.

Trending