Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Know The Interesting Facts Of Mahabharata

द्रौपदीने केली होती ही 1 चूक, ज्यामुळे सशरीर जाऊ शकली नाही स्वर्गात

जीवनमंत्र डेस्क | Update - Jul 07, 2017, 02:05 PM IST

पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला.

 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला. केवळ युधिष्ठीर सशरीराने स्वर्गात पोहोचले, हे जवळपास अनेक लोकांना माहिती असेल परंतु युधिष्ठीर व्यतिरिक्त इतर पांडव आणि द्रौपदीचा मृत्यू का झाला हे फार कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, युधिष्ठीर कशाप्रकारे स्वर्गात पोहोचले आणि रस्त्यामध्ये द्रौपदी आणि इतर पांडवांचा का झाला मृत्यू?

  अशाप्रकारे सुरु केली पांडवानी स्वर्ग यात्रा
  भगवान श्रीकृष्णाच्या मृत्युनंतर महर्षी वेदव्यास यांच्या सल्ल्यानुसार द्रौपदीसहित पांडवानी राजपाठ त्याग करून सशरीर स्वर्गात जाण्याचा निश्चय केला. युधिष्ठीरने परीक्षितचा राज्याभिषेक केला. त्यानंतर पांडव आणि द्रौपदीने साधूंचे वस्त्र धारण केले आणि स्वर्गाकडे निघाले. पांडवांसोबत एक श्वान(कुत्रा)ही चालू लागले. पांडवांनी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून प्रवास सुरु केला. प्रवास करता-करता पांडव हिमालयापर्यंत पोहोचले. हिमालय ओलांडून पांडव पुढे गेल्यानंतर त्यांना वाळूचा समुद्र दिसला. त्यानंतर त्यांनी सुमेरु पर्वताचे दर्शन घेतले.

  स्वर्गाच्या मार्गामध्ये सर्वात पहिले कोणाचा मृत्यू झाला हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  सर्वात पहिले झाले द्रौपदीचे पतन
  पाच पांडव, द्रौपदी आणि तो श्वान सुमेरु पर्वत चढत असताना द्रौपदी जमिनीवर कोसळली. द्रौपदीला पडलेले पाहून भीमने युधिष्ठीरला विचारले की, द्रौपदीने तर कधीच कोणतेही पाप केले नाही. मग कोणत्या कारणामुळे द्रौपदी कोसळली? युधिष्ठीरने सांगितले की, द्रौपदी आपल्या सर्वांपेक्षा अर्जुनावर जास्त प्रेम करत होती. यामुळे तिच्यासोबत असे घडले. एवढे बोलून युधिष्ठीर द्रौपदीला न पाहताच पुढे मार्गस्थ झाले.
 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  त्यानंतर कोसळले सहदेव
  द्रौपदीनंतर थोड्यावेळाने सहदेवसुद्धा कोसळले. भीमने सहदेव पडण्याचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, सहदेव कोणालाही स्वतःपेक्षा जास्त विद्वान समजत नव्हता. याच दोषामुळे त्याची आज ही स्थिती झाली आहे.
 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  असा झाला नकुलचा मृत्यू
  द्रौपदी आणि सहदेवनंतर चालता-चालता नकुलसुद्धा खाली पडले. भीमाने नकुल खाली पडण्यामागचे कारण विचारल्यानंतर युधिष्ठीरने सांगितले की, नकुलला स्वतःच्या रूपाचा खूप अभिमान होता. तो कोणालाही स्वतःप्रमाने रूपवान समजत नव्हता. यामुळे आज त्याची ही गती झाली आहे.
 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  यामुळे झाले अर्जुनाचे पतन
  युधिष्ठीर, भीम, अर्जुन आणि श्वान पुढे जात असतानाच अर्जुन जमिनीवर कोसळला. युधिष्ठीरने भीमाला सांगितले की, अर्जुनाला स्वतःच्या पराक्रमावर जास्त अभिमान होता. अर्जुन म्हणाला होता की, मी एका दिवसातच सर्व शत्रूंचा नाश करून टाकेल, परंतु असे केले नाही. स्वतःच्या या अहंकारामुळे अर्जुनाची आज अशी स्थिती झाली आहे.
 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  यामुळे झाला भीमचा मृत्यू
  थोडे पुढे गेल्यानंतर भीमसुद्धा जमिनीवर कोसळला. तेव्हा भीमाने युधिष्ठीरला आवाज देऊन विचारले की, हे राजन, तुम्हाला माहिती असेल तर माझ्या पतनाचे कारण सांगा? तेव्हा युधिष्ठीरने सांगितले की, तू खूप खात होतास आणि स्वतःच्या शक्तीचे खोटे प्रदर्शन करत होता. यामुळे आज तुला जमिनीवर पडावे लागले आहे. एवढे बोलून युधिष्ठीर पुढे चालू लागले. केवळ श्वान त्यांच्यासोबत चालत होते.
 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  सशरीर स्वर्गात गेले होते युधिष्ठीर
  युधिष्ठीर थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना घेण्यासाठी स्वतः देवराज इंद्र रथ घेऊन आले होते. तेव्हा युधिष्ठीर इंद्रदेवाला म्हटले की, माझे भाऊ आणि द्रौपदी रस्त्यामध्येच पडले आहेत. तेसुद्धा आपल्यासोबत येतील अशी व्यवस्था करा. तेव्हा इंद्रदेवाने सांगितले की, ते सर्वजण आधीच स्वर्गात पोहोचले आहेत. ते शरीराचा त्याग करून स्वर्गात पोहोचले आहेत आणि तुम्ही स्वतःच्या शरीराने स्वर्गात जात आहात.
 • Know The Interesting Facts Of Mahabharata
  यमदेवाने घेतले होते श्वानाचे रूप
  इंद्रदेवाचे बोलणे ऐकून युधिष्ठीरने सांगितले की, हा श्वान माझा परमभक्त आहे. यामुळे यालाही माझ्यासोबत स्वर्गात येण्याची परवानगी द्यावी, परंतु इंद्रदेवाने असे करण्यास नकार दिला. बराच वेळ समजावून सांगितल्यानंतरसुद्धा युधिष्ठीर त्यांचा हट्ट सोडत नसल्याचे पाहून श्वानाच्या रुपात असलेले यमदेव आपल्या वास्तविक रुपात प्रकट झाले. युधिष्ठीरला आपल्या धर्म संस्कारावर स्थित पाहून यमदेव खूप प्रसन्न झाले. त्यानंतर देवराज इंद्र युधिष्ठीरला रथामध्ये बसवून स्वर्गात घेऊन गेले.

Trending