केव्हा आणि कसे झाले श्रीराम-सीताचे लग्न, असा आहे संपूर्ण प्रसंग
धर्म ग्रंथानुसार मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला भगवान श्रीराम आणि देवी सीतेचे लग्न झाले होते.
-
धर्म ग्रंथानुसार मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला भगवान श्रीराम आणि देवी सीतेचे लग्न झाले होते. यामुळे या दिवशी लग्न पंचमीचा सण उत्सवात साजरा केला जातो. या वर्षी 23 नोव्हेंबरला गुरुवारी लग्न पंचमी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला श्रीरामचरित मानसनुसार सांगत आहोत, श्रीरामाने देवी सीतेला पहिल्यांदा केव्हा आणि कुठे पाहिले होते.
येथे पाहिले श्रीरामांनी देवी सीतेला पहिल्यांदा
श्रीराम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्र यांच्यासोबत जनकपुरीला पोहोचल्यानंतर, राजा जनक यांनी सर्वांना आदरपूर्वक महालात आमंत्रित केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही भाऊ फुले तोडण्यासाठी बागेत गेले. त्यावेळी राजा जनक यांची मुलगी सीता देवी पार्वतीची पूजा करण्यासाठी तेथे आली होती. देवी सीता श्रीरामाला पाहून त्यांच्यावर मोहित झाल्या. देवी पार्वतीची पूजा करताना सीतेने श्रीरामाला पती रूपात प्राप्त करण्याची इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी धनुष्य यज्ञ (महादेवाच्या धनुष्यवर प्रत्यंचा चढवणाऱ्या व्यक्तीसोबत सीतेचा विवाह होणार)चे आयोजन करण्यात आले. राजा जनक यांच्या आमंत्रणानंतर ऋषी विश्वामित्र आणि श्रीराम, लक्ष्मण धनुष्य यज्ञ पाहण्यासाठी आले होते.
श्रीराम-सीता विवाहाचे संपूर्ण वर्णन जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा... -
जेव्हा सीता स्वयंवरात गेले श्रीराम
राजा जनकाच्या निमंत्रणावर श्रीराम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रसोबत धनुष्य यज्ञ (सीता स्वयंवर) मध्ये आले. त्या सभेमध्ये अनेक वीर आणि पराक्रमी राजे उपस्थित होते. श्रीरामाने सभेमध्ये प्रवेश करताच सर्व राजे त्यांच्याकडे एकटक पाहू लागले. जे राक्षस राजाचा वेश धारण करून आले होते, त्यांना श्रीरामामध्ये स्वतःचा काळ दिसू लागला. राजा जनकाने योग्य वेळ पाहून सीतेलाही सभेमध्ये बोलावले. सभेमध्ये येताच सीतेची दृष्टी सर्वात पहिले श्रीरामावर पडली. तेवढ्यात सेवकाने घोषणा केली की, जो व्यक्ती महादेवाचे हे धनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल त्यालाच जनककुमारी वरमाला घालेल. घोषणा ऐकल्यानंतर अनेक वीर पराक्रमी राजांनी ते शिव धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला परंतु यशस्वी झाले नाहीत. हे पाहून राजा जनकाला वाटले की, ही पृथ्वी विरांपासून शून्य झाली आहे. -
जेव्हा श्रीरामाने तोडले शिवधनुष्य
ऋषी विश्वामित्र यांच्या आज्ञेनुसार श्रीराम ते शिवधनुष्य तोडण्यासाठी निघाले. हे पाहून सितासुद्धा श्रीरामाच्या यशासाठी प्रार्थना करू लागली. श्रीरामाने मनातल्या मनात गुरूला नमस्कार केला धनुष्य उचलले. धनुष्यावर प्रत्यंचा चढवताना धनुष्य तुटले. हे पाहून राजा जनक, त्यांची राणी आणि सीता यांना खूप आनंद झाला. मंगल गीत गाणे सुरु झाले. ढोल, मृदंग, वाजंत्री वाजू लागली. हे दृश्य पाहून देवताही स्वर्गातून पुष्प वर्षाव करू लागले. श्रीराम आणि सीतेची जोडी पाहून काही दुष्ट राजे या दोन्ही राजकुमारांना बंदी करा आणि सीतेला सोबत घेऊन चला असे म्हणू लागले. हे ऐकून लक्ष्मणाला खूप राग आला. तेवढ्यात तेथे परशुराम आले. त्यांना पाहून तेथे उपस्थित सर्व राजे भयभीत झाले. -
परशुरामांचे धनुष्य आपोआप श्रीरामाच्या हातामध्ये गेले
आपल्या आराध्य देव महादेवाचे धनुष्य तुटलेले पाहून परशुरामांना खूप राग आला आणि त्यांनी राजा जनकाला हे कोणी केले असे विचारले. परंतु भीतीमुळे राजा जनक काहीच बोलले नाहीत. परशुरामाचा प्रश्न ऐकून श्रीराम म्हणाले की, हे ना ! महादेवाचे धनुष्य तोडणारा तुम्हाला एखादा दासच असेल. श्रीरामाचे वाक्य ऐकून परशुराम म्हणाले की, धनुष्य तोडणारा व्यक्ती माझा शत्रू आहे. परशुरामाचा राग पाहून लक्ष्मण त्यांचा उपहास करू लागले. वाद वाढत चाललेला पाहून श्रीरामाने काही रहस्यपूर्ण गोष्टी सांगितल्या. या गोष्टी ऐकल्यानंतर परशुरामाला श्रीरामामध्ये भगवान विष्णू यांचे रुप दिसू लागले. मनातील शंका दूर करण्यासाठी परशुराम यांनी आपले विष्णू धनुष्य श्रीरामाकडे करून ओढण्यास सांगितले. तेवढ्यात पराशुरामांना जाणवले की, ते धनुष्य आपोआप श्रीरामाच्या हाताकडे जात आहे. हे पाहून त्यांच्या मनातील शंका दूर झाली आणि ते तप करण्यासाठी वनात निघून गेले. -
ब्रह्मदेवाने तयार केली होती श्रीरामाची लग्नपत्रिका
त्यानंतर ऋषी विश्वामित्र यांच्या सांगण्यावरून दशरथ राजाला निमंत्रण पाठवून लग्नाची तयार सुरु करण्यात आली. निमंत्रण मिळताच राजा दशरथ भरत, शत्रुघ्न आणि आपल्या मंत्र्यांसोबत जनकपुरीला आले. अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यावेळी हेमंत ऋतू होता.
ग्रह, तिथी, नक्षत्र, योग पाहून ब्रह्मदेवाने त्यावर विचार करून लग्नपत्रिका तयार केली. त्यानंतर नारदमुनींच्या मदतीने राजा जनकाकडे लग्नपत्रिका पाठवण्यात आली. शुभ मुहूर्तावर श्रीरामाचे वऱ्हाड आले. राजा जनकाने सर्वांचे आदरपूर्वक स्वागत केले. श्रीराम आणि सीतेचे लग्न झाल्यानंतर राजा जनक आणि दशरथ अत्यंत प्रसन्न झाले. -
असे झाले लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नचे लग्न
श्रीराम व देवी सीतेचे लग्न झाल्यानंतर ऋषी वशिष्ठ यांनी राजा जनक आणि त्यांचे लहान भाऊ कुशध्वज यांच्या मुली मांडवी, श्रुतकीर्ती व उर्मिला यांना बोलावून घेतले. जनकाने राजा दशरथ यांच्या सहमतीने मांडवीचे लग्न भरतशी, उर्मिलाचे लक्ष्मणशी आणि श्रुतकीर्तीचे शत्रुघ्नशी लावले. आपल्या सर्व मुलांचे लग्न पाहून दशरथ राजाला खूप आनंद झाला. सर्व वऱ्हाड आयोध्येला पोहोचल्यानंतर सर्व नगरातील नागरिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. कौशल्या, सुमित्रा आणि कैकयी मुलांसोबत सुनांना पाहून खूप आनंदित झाल्या.