Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | lord vishnu vaman avtar story in marathi

भगवान विष्णूंना घ्यावा लागला वामन अवतार, वाचा ही रोचक कथा

जीवनमंत्र डेस्क | Update - Sep 02, 2017, 09:00 AM IST

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन द्वादशी किंवा वामन जयंती म्हणतात.

  • lord vishnu vaman avtar story in marathi
    भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन द्वादशी किंवा वामन जयंती म्हणतात. श्रीमद्भागवतनुसार या तिथीला श्रवण नक्षत्रामध्ये अभिजित मुहूर्तावर भगवान वामन यांचे प्राकट्य झाले होते. या वर्षी वामन द्वादशी 2 सप्टेंबर, शनिवारी आहे. धर्म ग्रंथामध्ये भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता. या अवतराशी संबंधित कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

  • lord vishnu vaman avtar story in marathi
    प्राचीन काळी असूराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. बळीराजा राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील प्रजादक्ष राजा होता. दानशूरात अग्रेसर होता. त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने देवांचाही पराभव केला. लक्ष्मीला दासी केले. देवांचे स्वातंत्र्य हरवले. सर्वत्र त्याचे राज्य होते. त्यानंतर बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूची निवड करण्यात आली. 

    एकदा बळीराजा यज्ञ करीत होता. यज्ञानंतर दानधर्माची पद्धत होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे झाले. बळीने विचारले ‘काय पाहिजे’ बटू म्हणाला ‘मी मागेल ते तुला द्यावे लागेल, असे वचन दे’. बळी म्हणाला ‘मी वचन देतो, तुला हवे ते माग’. बटू म्हणाला ‘तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे. मला तीन पावले जमीन दे’.बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या डोक्यावर ठेवले. बळीराजा पाताळलोकात गेला. गविर्ष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले.

Trending