Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Mahabharata draupadi pandava story

द्रौपदीसाठी पांडवांनी बनवला होता हा 1 खास नियम, तोडल्यास ही होती शिक्षा

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 26, 2017, 09:00 AM IST

शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत.

 • Mahabharata draupadi pandava story
  शास्त्रांमध्ये महाभारताला पाचवा वेदही म्हटले गेले आहे. याचे रचनाकार महर्षि कृष्णव्दैपायन वेदव्यास आहेत. या ग्रंथामध्ये एक लाख श्लोक आहेत, यामुळे याला शतसाहस्त्री संहिता देखील म्हटले जाते. आज आम्ही तुम्हाला ग्रंथाच्या काही मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत...

  1. पांडवांनी द्रोपदीसाठी बनवला होता एक खास नियम
  द्रौपदीसोबत विवाहनंतर एक दिवस नारदमुनी पांडवांना भेटण्यास गेले. त्यांनी पांडवांना सांगितले की, प्राचीन काळात सुंद-उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ होते. त्यांनी आपल्या पराक्रमाने देवतांवर विजय मिळवला होता. परंतु एका स्त्रीच्या कारणामुळे त्यांच्यात फूट पडली. त्या दोघांना एकमेकांचा वध केला. अशी स्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी नियम तयार करा. तेव्हा पांडवांनी द्रौपदीसाठी एक नियम बनवला, एका नियमित वेळेपर्यंत द्रौपदी एका भावाजवळ राहिल. जेव्हा एक भाऊ द्रौपदीसोबत एकांतात असेल तेव्हा दुसरा भाऊ तेथे जाणार नाही. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला 12 वर्षे ब्रम्हचारी राहुन वनात जावे लागेल.

  पुढील स्लाईडवर वाचा... अर्जुनाने हा नियम का तोडला आणि इतरही रोचक गोष्टी...

 • Mahabharata draupadi pandava story
  अर्जुनाने तोडला होता नियम
  एकदा अर्जुन जवळ रडत रडत एक ब्राम्हण आला, त्यांने सांगितले की, त्यांच्या गाईंना डाकू घेऊन जात आहेत. अर्जुनाचे अस्त्र-शस्त्र त्यावेळी युधिष्ठिरच्या महालात होते आणि ते यावेळी द्रौपतीसोबत एकांतात होते. नियमानुसार अर्जुन युधिष्ठिरच्या महालात जाऊ शकत नव्हते. परंतु त्यांना ब्राम्हाणाची मदत करण्यासाठी नियम तोडला आणि आपले अस्त्र-शस्त्र घेऊन डाकूंकडून गाई पुन्हा घेऊन आले. नियम तोडल्यामुळे अर्जुन 12 वर्ष वनवासात गेले. वनवासाच्या काळात अर्जुन जेव्हा सौभद्रतीर्थमध्ये स्नान करत होते तेव्हा त्यांचा पाय मगरीने पकडला. अर्जुनाने मगर उचलुन वर आणली. त्याच वेळी ती मगर एक सुंदर अप्सरा बनली. तिने सांगितले की, एका तपस्वीने मला आणि माझ्या मैत्रिनींना श्राप देऊन मगर बनवले होते. आता तुम्ही माझ्या मैत्रीनिंचा देखील उद्धार करा. यावेळी अर्जुनाने अप्सराच्या मैत्रिनींचा देखील उद्धार केला.
 • Mahabharata draupadi pandava story
  अग्निदेवाने अर्जुनाला दिला होता गांडीव धनुष
  एकदा देव श्रीकृष्ण आणि अर्जुन यमुना तटावर बसले होते. त्यावेळी तेथे ब्राम्हाणाच्या वेशात अग्निदेव आले. त्यांनी आपला परिचय देतांना सांगितले की, मी खाण्डव वनाला भस्म करु इच्छितो, परंतु या वनात देवराज इंद्राचा मित्र तक्षक नाग आपल्या कुटूंबासोबत राहते. यामुळे इंद्र मला खाण्डवर वन जाळू देत नाही. तेव्हा अर्जुनाने त्याच्याकडे दिव्य अस्त्र-शस्त्राची मागणी केली. अग्निदेवाने अर्जुनाला एक अक्षय तरकश, गांडीव धनुष्य आणि वानरचिहृयुक्त ध्वजाने सुसज्जित रथ प्रदान केला. अग्निदेवाने श्रीकृष्णाला एक दिव्य चक्र आणि अग्नेयास्त्र प्रदान केले. अग्नेदेव जेव्हा खाण्डव वन जाळत होते तेव्हा इंद्रदेव तेथे आले आणि मुसळधार पाऊस कोसळू लागले. परंतु अर्जुनाने आपल्या शस्त्रांच्या मदतीने पाऊस मध्येच थांबवला. तेव्हा आकाशवाणी झाली की, अर्जुन आणि श्रीकृष्ण साक्षात नर-नारायणाचा अवतार आहे. तुम्ही यांच्यापासुन जिंकू शकत नाही. हे ऐकुण इंद्र तेथून निघुन गेले.
 • Mahabharata draupadi pandava story
  जाणुन घ्या पांडवांच्या पत्नी आणि पुत्रांविषयी
  1. पांडवांची द्रौपदी व्यतिरिक्त दूस-या पत्निदेखील होत्या. युधिष्ठिरच्या पत्नीचे नाव देविका होते, त्यांच्या पुत्राचे नाव यौधेय होते. नकुलची पत्नी करेणुमती, त्यांचा पुत्र निरमित्र आणि सहदेवची पत्नी विजया त्यांचा पुत्र सुहोत्र होता.
  2. भीमसेनच्या दोन पत्नि होत्या. पहिली हिडिंबा आणि दुसरी काशीराजची पुत्री बलंधरा. हिडिंबाच्या पुत्राचे नाव घटोत्कच आणि बलंधराच्या पुत्राचे नाव सर्वग होते.
  3. अर्जुनाने श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा, नागकन्या उलूपी आणि मणिपुरचा राजकुमारी चित्रांगदासोबत लग्न केले होते. अर्जुनाला सुभद्रापासुन अभिमन्यू, उलूपी पासुन इडावान् आणि चित्रांगदापासुन बभ्रूवाहन हा पुत्र होता.
  4. द्रोपतीला पाची पांडवांपासुन एक एक पुत्र होता. युधिष्ठिरच्या पुत्राचे नाव प्रतिविन्ध्य, भीमाच्या पुत्राचे नाव सुतसोम, अर्जुनच्या पुत्राचे नाव श्रुतकर्मा, नकुलच्या पुत्राचे नाव शतानीक तर सहदेवाच्या पुत्राचे नाव श्रुतसेन होते.
 • Mahabharata draupadi pandava story
  14 महिन्यात बनली होती दिव्य सभा
  खाण्डव वनात राक्षसांचा शिल्पकार दानव देखील राहत होता. जेव्हा अग्निदेवाने खाण्डव वन नष्ट केला तेव्हा दानव तेथून पळू लागला. त्याला श्रीकृष्ण आणि अर्जुनाने पकडले आणि जीवनदान दिले. अर्जुनाने त्याला एक अशी सभा निर्माण करण्यास सांगिलतले की, ज्याची नक्कल कोणीच करु शकणार नाही. मय दानवाने फक्त 14 दिवसात एका दिव्य सभेची निर्मिती केली आणि धर्मराज युधिष्ठिरला भेट दिली. ती सभा दहा हजार हात लांब आणि रुंद होती. मय दानवाच्या आज्ञेखातर आठ हजार राक्षर त्या दिव्य सभेचे संरक्षण आणि देखरेख करत होते. त्या सभेत एक सरोवर देखील होते. पाहिल्यावर ते भूमिसारखे दिसत होते. मय दानवांनी भीमला एक सोन्याची गदा भेट दिली होती. सोबतच अर्जुनाला देवदत्त नवाचा एक दिव्य शंख भेट म्हणुन दिला होता.
 • Mahabharata draupadi pandava story
  चीरहरणाच्या वेळी झाले होते हे अपशकुन
  ज्यावेळी दुःशासन द्रौपदीचे चीरहरण करत होता, त्याच वेळी धृतराष्ट्राच्या यज्ञशाळेमध्ये अनेक गिधाड, गाधव आणि सर्व पक्षी येऊन आवाज करु लागले. हा गोंधळ ऐकुण गांधारी घाबरली. विदुर आणि गांधारीने घाबरुन याची सुचना राजा धृतराष्ट्राला दिली. थोडा विचार करुन धृतराष्ट्राने द्रौपदीला समजावुन सांगितले की, तु परम पतिव्रता आहे. तुझी जी इच्छा आहे ती मला माग. द्रौपदीने वर मागितला की, सम्राट युधिष्ठिर कौरवांच्या गुलामीपासुन मुक्त व्हावे. धृतराष्ट्राने द्रौपदीला दुसरा वर मागण्यास सांगितला. तेव्हा द्रौपदीने भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवलाही कौरवाच्या गुलामीतून मुक्त करण्यास सांगितले. धृतराष्ट्राने हा वर पुर्ण केला.
 • Mahabharata draupadi pandava story
  ऋषीने दिला दुर्योधनाला श्राप
  पांडव वनात गेल्यानंतर एक दिवस ऋषि मैत्रेय हस्तिनापुरात आले. राजा दुर्योधन आणि धृतराष्ट्राने त्यांचा योग्य आदर सत्कार केला. त्यांना सांगितले की, यावेळी पांडव काम्यक वनात निवास करत आहेत. महर्षिने दुर्योधनाला सांगितले की, तुला जर कुरुवंशचे हित मिळवायचे असेल तर पांडवांना ससम्मान त्यांचे राज्य परत कर आणि त्यांच्यासोबत मैत्री करुन घे. धर्मराज युधिष्ठिर तुला क्षमा करतील. ही गोष्ट ऐकुण दर्योधन हसला आणि आपल्या मांड्या ठोकु लागला. दुर्योधनाचा उद्धटपणा पाहुन ऋषि मैत्रेयने त्याला श्राप दिला की, मूर्ख दुर्योधन, तुझ्या या द्रोहामुळे कौरव पांडवांमध्ये भयंकर युध्द होईल. या युध्दात भीमसेन गदाने तुझी मांडी तोडून टाकतील.
 • Mahabharata draupadi pandava story
  द्रौपदीचा वध करु इच्छित होते कीचकचे भाऊ
  महाभारताच्या नुसार, अज्ञातवासाच्या वेळी द्रौपदी सैरेध्रीच्या रुपात विराट नगरची राणी सुदेष्णची सेवा करत होती. एक दिवस विराट नगरचा सेनापति कीचकने द्रौपदीला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला. त्यानी द्रौपतीसोबत दुराचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु द्रौपती वाचली. तेव्हा द्रौपतीने भीमला कीचकचा वध करण्यास सांगितले. भीमने योजना आखुन किचकचा वध केला. ही गोष्ट जेव्हा किचकच्या भावांना कळाली तेव्हा त्यांना द्रौपदीला जबाबदार ठरवले आणि तिला किचकसोबत जाळण्यासाठी स्मशानभूमि पर्यंत आणले. तेथे भीमने सर्वाचा वध केला आणि द्रौपतीला सोडवून आणले.

Trending