Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Navratr celebration lord durga story

यामुळे साजरी केली जाते नवरात्री, ही आहे रोचक कथा

जीवनमंत्र डेस्क | Update - Sep 21, 2017, 12:00 PM IST

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात.

  • Navratr celebration lord durga story
    अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म आहे. देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. हा महिषासुरमर्दिनी अष्टभुजा शक्तीदेवीचा उत्सव असतो. या संदर्भात पुराणात एक कथा सांगण्यात आली आहे.

    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, नवरात्रीची कथा...

  • Navratr celebration lord durga story
    पुराणकाळात महिषासुर नावाचा महाभयंकर दैत्य अतिशय धुमाकूळ घालत सर्व मानव व देवादिकांना त्रास देत होता. ‘त्याचा वध एका स्त्रीच्या हाती असेल. अन्य कोणी त्यास मारू शकणार नाही’ असा त्याला वर प्राप्त होता. आणि अशी आपल्याला मारणारी कोणी स्त्री या तिन्ही लोकांत नाही, असा त्याचा विश्वास होता. म्हणून तो खूप उन्मत्त झाला होता. तेव्हा जगदंबेने रौद्ररूप धारण केले आणि महिषासुरावर ती चाल करून गेली. तो दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदेचा होता. त्या दिवसापासून नऊ दिवस जगदंबेच्या रौद्र रूपातली दुर्गा माता महिषासुराशी अहोरात्र लढत होती. या लढाईत अखेर त्याचा वध झाला. दुर्गादेवीच्या या शौर्यामुळे समस्त देव-मानव जातीला स्थैर्य मिळाले. तो मातेचा विजयोत्सव ‘नवरात्र’ म्हणून साजरी केली जाते.

Trending