Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Navratr Interesting Things About Ravan

रावण नव्हता अजेय योद्धा, या चौघांकडूनही झाला होता पराभूत

जीवनमंत्र डेस्क | Update - Sep 30, 2017, 11:00 AM IST

30 सप्टेंबर, शनिवारी विजयादशमी आहे. बहुतांश लोकांना केवळ एवढेच माहिती आहे की, रावण फक्त श्रीरामाकडूनच पराभूत झाला होता

 • Navratr Interesting Things About Ravan
  30 सप्टेंबर, शनिवारी विजयादशमी आहे. बहुतांश लोकांना केवळ एवढेच माहिती आहे की, रावण फक्त श्रीरामाकडूनच पराभूत झाला होता. परंतु हे पूर्ण सत्य नाही, रावण श्रीरामाव्यतिरिक्त महादेव, राजा बळी, बाली आणि सहस्त्रबाहु यांच्याकडूनही पराभूत झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, या चौघांकडून रावण केव्हा आणि कसा पराभूत झाला होता.

  पुढील स्लाईडवर वाचा... रावण पराभूत होण्याचे चार प्रसंग...

 • Navratr Interesting Things About Ravan
  बालीने रावणाला पराभूत केले
  एकदा रावण बालीसोबत युद्ध करण्यासाठी गेला. बाली त्यावेळी पूजा करत होता. रावण वारंवार बालीला युद्धासाठी आव्हान देत होता. यामुळे बालीच्या पूजेमध्ये व्यत्यय येत होता. जेव्हा रावणाने ऐकले नाही तेव्हा बालीने त्याला आपल्या काखेत दाबून चार समुद्रांची परिक्रमा केली होती. बाली खुप शक्तिशाली आणि चपळ होता. सकाळी सकाळी चारी समुद्रांची तो परिक्रमा करत असे. अशाप्रकारे पूजा करुन तो सूर्याला अर्घ्य अर्पित करत होता. बालीने परिक्रमा पुर्ण करेपर्यंत रावणाला काखेत दाबून ठेवले आणि रावण बालीच्या कैदेतून सुटू शकला नाही. पूजेनंतर बालिने रावणाला सोडून दिले.
 • Navratr Interesting Things About Ravan
  सहस्त्रबाहु अर्जुनकडून पराभूत झाला रावण
  सहस्त्रबाहु अर्जुनाचे एक हजार हात होते, यामुळेच त्याचे नाव सहस्त्रबाहु पडले. जेव्हा रावण सहस्त्रबाहुसोबत युध्द करण्यास पोहोचला तेव्हा सहस्त्रबाहुने आपल्या हातांनी नर्मदेचा प्रवाह थांबवला. सहस्त्रबाहुने नर्मदेचे पाणी जमा केले आणि सर्व पाणी एकदाच सोडले ज्यामुळे रावण पुर्ण सेनेसोबत नर्मदेत वाहुन गेला. या पराभवानंतर रावण पुन्हा सहस्त्रबाहु अर्जुनासोबत युध्द करण्यास पोहोचला होता. तेव्हा सहस्त्रबाहुने त्याला बंदी बनवुन कारागृहात टाकले.
 • Navratr Interesting Things About Ravan
  राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव
  दैत्यराज बळी पाताळलोकाचे राजा होते. एकदा रावण, राजा बळीसोबत युद्ध करण्यासाठी पाताळलोकमधील त्यांच्या महालात गेला. तेथे गेल्यानंतर रावणाने बळीला युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी महालात खेळत असलेल्या लहान मुलांनीच रावणाला घोड्यांसोबत बांधले होते. अशा प्रकारे राजा बळीच्या महालात रावणाचा पराजय झाला.
 • Navratr Interesting Things About Ravan
  महादेवाकडुन पराभव
  रावण खुप शक्तिशाली होता. त्याला आपल्या शक्तीवर खुप गर्व होता. याच गर्वात तो महादेवाला पराभूत करण्यासाठी कैलास पर्वतावर गेला. रावणाने महादेवाला युद्धासाठी बोलावले. परंतु महादेव ध्यानात मग्न होते. रावण कैलास पर्वत उचलु लागला. यावेळी महादेवाने पायाच्या अंगठ्याने कैलास पर्वताला दाबले आणि पर्वताचे वजन वाढले. हे वजन रावण उचलु शकला नाही आणि पर्वताखाली दबला. या पराभवानंतर रावणाने महादेवाला गुरु मानले.

Trending