Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi

महाभारत युद्धापूर्वीच या चार पांडवांचा झाला होता मृत्यू, यामुळे पुन्हा झाले जिवंत

जीवनमंत्र डेस्क | Update - Sep 11, 2017, 11:00 AM IST

महाभारत युद्ध पांडवांनी जिंकले होते आणि या विजयामध्ये भीम आणि अर्जुनाची भूमिका महत्त्वाची होती.

 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  महाभारत युद्ध पांडवांनी जिंकले होते आणि या विजयामध्ये भीम आणि अर्जुनाची भूमिका महत्त्वाची होती. अर्जुनाने भीष्म आणि इतर महारथीना पराभूत केले होते. भीमाने दुर्योधन आणि त्याच्या सर्व भावंडांना मारून टाकले होते. या गोष्टी सर्वांना माहिती आहेत, परंतु युद्ध सुरु होण्यापूर्वीच भीम आणि अर्जुनासोबत नकुल आणि सहदेव यांचा मृत्यू झाला होता हे फार कमी लोकांना माहिती असावे. या चारही भावांना युधिष्ठीरने पुन्हा जिवंत केले होते. महाभारतातील या रोचक प्रसंगाच्या माध्यमातून जाणून घ्या, चारही पांडवांचा मृत्यू का झाली आणि युधिष्ठीरने त्यांना कशाप्रकारे पुन्हा जिवंत केले...

 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  द्यूत क्रीडेत पराभूत झाल्यानंतर पांडवांना वनवासात जावे लागले. वनवासात असेलेले पांडव काम्‍यक वन सोडून द्वैतवनात येऊन राहू लागले. या वनात अनेक ब्राह्मण राहात होते. प्रत्‍येक दिवशी अग्निहोत्र करून आपल्‍या धर्माचे पालन करत होते. मात्र एका दिवशी एका ब्राह्मणानाचे अरणीसहित मंथनकाष्‍ठ ( यज्ञासाठी आग निर्माण करणारे लाकडापासून तयार करण्‍यात आलेले यंत्र) एक हरीण घेऊन पळाले. मंथनकाष्‍ठ यंत्र हरणाने पळवल्‍याची अडचण ब्राह्मणाने पांडवांना सांगितली, व ते यंत्र मला परत मिळवून द्या अशी विनंती केली. मंथनकाष्‍ठ यंत्राचा शोध घेण्‍यासाठी पांडव निघाले. अनेक प्रयत्‍न करूणही ते हरीण पांडवांच्या दृष्टीस पडेना.

  हरणाला पकडण्‍यासाठी पांडवांची पायपीट झाल्‍यामुळे आता तेही थकले होते. सर्वानाच तहान लागली होती. सर्व पांडव एका झाडाखाली बसले. युधिष्ठिराने नकुलला सर्वांसाठी पाणी आणण्यास सांगितले. तो पाणी आणण्यासाठी तलावाजवळ गेला. नकुल पाणी पिण्‍यासाठी वाकला, पाणी पिणार इतक्‍यात अकाशावाणी झाली. 'नकुल पाणी पिण्‍याच्‍या अगोदर मी विचारलेल्‍या काही प्रश्नांची उत्तेर द्यावी लागतील.' तहान लागलेल्‍या नकुलाने आकाशवाणीकडे दुर्लक्ष केले व पाणी प्‍यायला सुरूवात केली. पाणी पिल्‍यानंतर नकुल मरून तलावाच्‍या कडेला पडला.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  जेव्हा नकुल परत आला नाही...
  पाणी आणण्यासाठी गेलेला नकुल परत न आल्‍यामुळे युधिष्ठिराने सहदेवाला सांगितले, नकुल का येत नाही ते पाहूण ये आणि पाणी आणण्यासाठी त्‍याला मदत कर. नकुल ज्‍या तलावाकडे पाणी आणण्यासाठी गेला होता तिकडे सहदेव गेला. तलावाजवळ सहदेव येऊन पोहचला पहोचला. आपला भाऊ मृत्‍युमुखी पडलेला पाहून सहदेवाला खुप दु:ख झाले. सहदेवाला तहान लागलेली असल्‍यामुळे तोही पाणी पिण्‍यासाठी वाकला आणि परत आकाशवाणी झाली. तहानेने व्‍याकूळ झालेला सहदेव आवाजाकडे दूर्लक्ष करून पाणी प्‍यायला लागला. पाणी पिल्‍यानंतर सहदेवाचाही मृत्‍यू झाला.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  नकुल-सहदेव परत न आल्‍यामुळे युधिष्ठिराने अर्जुनाला त्‍यांच्‍या शोधासाठी पाठवले. अर्जुन गेल्‍या नंतर बराच वेळ उलटला, तिघेही परत येण्‍याची चिन्‍हे दिसत नव्‍हती म्‍हणून युधिष्ठिराने भीमाला भावांच्‍या शोधासाठी पाठवले. आपले तिन भाऊ मृत्‍युमुखी पडलेले पाहूण भिमाला राग आला. त्‍याला वाटले हे काम राक्षसांचे आहे. त्‍यांच्यासोबत युद्ध करण्‍याअगोदर थोडे पाणी प्‍यावे असे भिमाला वाटले. भिम पाणी पिऊ लागला. तेवढ्यात परत आकाशवाणी झाली, मात्र ताहनेने व्‍याकूळ झालेल्‍या भिमाने आवाजाकडे दुर्लक्ष केले. पाणी प्यायल्यानंतर तिन भावांसारखीच भिमाची आवस्‍था झाली.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  आपले चारही भाऊ परत येत नाहीत हे लक्षात आल्‍यानंतर युघिष्ठिराची काळजी वाढू लागली. आपल्‍या भावांचा शोध घेत तो तलावाजवळ येऊन पोहचला. आपल्‍या चार भावांचे मृतदेह पाहून युधिष्ठिराला दु:ख झाले. दु:ख झालेले असले तरी युधिष्ठिरालाही तहान लागलेली होती. पाणी पिण्‍यासाठी युधिष्ठिर तलावाजवळ आला. पाणी पिणार तेवढ्यात आकाशवाणी झाली. युधिष्ठिराने विंनती केल्‍यांनतर तलावाजळ एक यक्ष प्रकट झाला.

  यक्ष युधिष्ठिराला म्‍हणाला जर मी विचारलेल्‍या प्रश्नांची सर्व उत्तेर बरोबर दिलीस तर तू या तलावाचे पाणी घेऊ शकतो. युधिष्ठिराने यक्षाने विचारलेल्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्‍याची तयारी दर्शवली. युधिष्ठिर यक्षाला म्‍हणाला तुम्‍ही प्रश्‍न विचार मी माझ्या तर्कानुसार उत्तरे देईल.

  पुढे जाणून घ्या, यक्षाने युधिष्ठीरला कोणकोणते प्रश्न विचारले...
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  यक्ष-
  पृथ्‍वीपेक्षा महान काय आहे? वायु पेक्षा कशामध्‍ये जास्‍त गती आहे?
  युधिष्ठिर-
  पृथ्‍वीपेक्षा महान जन्‍म देणारी आई आहे. मन हे वायुपेक्षाही जास्‍त गतिमान आहे.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  यक्ष-
  झोपी गेल्‍यांनतर डोळे उघडे कोण ठेवतो ? हृदय कशात नसते आणि सर्वात वेगाने पुढे जाणारे काय आहे ?
  युधिष्ठिर-
  मासा झोपी गेल्‍यानंतरही डोळे उघडे ठेवतो. दगडामध्‍ये ह्दय नसते. सर्वात वेगाने पुढे जाणारी नदी असते.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  यक्ष-
  परदेशात जाणा-याचा मित्र कोण्‍ा आहे? घरी राहणा-याचा मित्र कोण आहे? रोगी मानसाचा मित्र कोण्‍ा आहे? ज्‍याचा मृत्‍यू जवळ आला आहे, त्‍याचा मित्र कोण्‍ा आहे?
  युधिष्ठिर-
  परदेशात जाणा-याच्‍या सोबत असणारेच त्‍याचे मित्र असतात. घरी राहणा-यांचा मित्र त्‍या घरातील महिला असते. वैद्य रोग्‍याचा मित्र आहे. दान करणारा हा मरणा-याचा मित्र आहे.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  यक्ष-
  सुर्य कुणामुळे उगवतो ? सुर्याच्‍या चारही बाजूला कोण्‍ा असतात ? सुर्यास्‍त कुणामुळे होतो व तो कशात सामावला आहे ?
  युधिष्ठिर -
  ब्रह्मामुळे सुर्य उगवतो. सुर्याच्‍या चारही बाजूला देव असतात. धर्म हा सुर्यास्‍त करतो. सत्‍यामध्‍ये सुर्य सामावला आहे.
 • Mahabharata Facts In marathi, Mahabharata In marathi
  कसे पुनर्जीवित झाले चारही पांडव
  युधिष्ठिराने दिलेल्‍या उत्तराने यक्ष आनंदीत झाला. यक्ष युधिष्ठिराला म्‍हणाला तुझे चार भाऊ मरण पावले आहेत, यापैकी मी एकाला जिवंत करू शकतो. तु सांग कोणाला जिवंत करायचे आहे. युधिष्ठिराने चार पांडवांपैकी नकुलला जिवंत करण्‍याची विंनती यक्षाला केली. यक्ष म्‍हणाला चार भावांपैकी भिमामध्‍ये 10 हजार हत्तीचे बळ आहे. युद्धात अर्जुनाचा कोणी पराभव करू शकत नाही. मग तु या दोघांना सोडून नकुलला जिवंत करण्‍यासाठी का सांगत आहेस. यावेळी युधिष्ठिर म्‍हणाला माझे पिता स्‍वर्गिय पांडूच्‍या दोन पत्‍नी होत्‍या. दोघांचेही मुले जिवंत राहावीत अशी माझी इच्‍छा आहे. यामुळे माता माद्रीचा पुत्र नकुल याला जिवंत करण्‍याची विनंती करत आहे. युधिष्ठिराच्‍या उत्तरामुळे यक्ष आनंदीत झाले आणि त्‍यांनी चारही पांडवाना जिवंत केले.

Trending