Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Ramayana And Mahabharata Facts In marathi

तुम्हाला माहिती आहे का, हे 4 पात्र रामायण आणि महाभारत दोन्ही काळात होते

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 28, 2017, 11:56 AM IST

रामायण काळ म्हणजे त्रेतायुग आणि महाभारत काळ म्हणजे द्वापर युगामध्ये हजारो वर्षांचे अंतर आहे.

 • Ramayana And Mahabharata Facts In marathi
  रामायण काळ म्हणजे त्रेतायुग आणि महाभारत काळ म्हणजे द्वापर युगामध्ये हजारो वर्षांचे अंतर आहे. तरीही काही पात्र असे आहेत, ज्यांचा उल्लेख या दोन्ही युगांमध्ये आढळून येतो. येथे जाणून घ्या, 4 अशा पात्रांची माहिती ज्यांनी रामायण तेश महाभारत काळातही महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत.
  1. परशुराम -
  परशुराम भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्रेता युगात सीता स्वयंवरमध्ये ठेवण्यात आलेले शिवधनुष्य श्रीरामाने तोडल्यानंतर परशुराम क्रोधीत झाले होते. महाभारत काळातही भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांचे गुरु परशुरामच होते. परशुराम आणि भीष्म यांच्यामध्ये युद्धसुद्धा झाले होते.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 3 पात्रांविषयी...

 • Ramayana And Mahabharata Facts In marathi
  पवनपुत्र हनुमान
  रामायणात श्रीरामाचे कार्य पूर्ण करण्यात हनुमानाची भूमिका सर्वात महत्त्वाची मानण्यात आली आहे. याच कारणामुळे प्रभू श्रीरामाने हनुमानाला आपला भाऊ भरतप्रमाणे प्रिय मानले आहे. हनुमान चालीसात लिहिण्यात आले आहे की,
  रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
  तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
  या चौपाईच्या अर्थ - श्रीरामाने हनुमानाची प्रशंसा करत म्हटले आहे की, माझा भाऊ भरतप्रमाणे तूसुद्धा मला प्रिय आहेस. हनुमानाचा उल्लेख महाभारत काळातही आढळून येतो. द्वापर युगात पांडवांच्या वनवास काळात भीमाला स्वतःच्या शक्तीचा गर्व झाला होता. भीमाचे गर्वहरण करण्यासाठी वृद्ध वानर रुपात हनुमान भीमाला भेटले होते. हनुमानाला पवनपुत्र म्हटले आणि भीमसुद्धा पावन देवाचे पुत्र आहेत. यामुळे हनुमान आणि भीम भाऊ असल्याचे मानले जाते.
 • Ramayana And Mahabharata Facts In marathi
  जांबुवंत
  श्रीरामच्या सैन्यामध्ये हनुमान, सुग्रीव, अंगदसोबतच जांबुवंतसुद्धा होते. रामायणातील सुंदरकांडमध्ये हनुमानाला प्रश्न पडला होता की, ते देवी सीतेला शोधण्यासाठी समुद्र ओलांडून लंकेत कसे जाणार. तेव्हा जांबुवंतने पवनपुत्र हनुमानाला त्यांच्यामधील शक्तींची जाणीव करून दिली. त्यानंतर हनुमान समुद्र ओलांडून लंकेत गेले. महाभारतातील एका प्रसंगात श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्यामध्ये युद्ध झाले होते. या युद्धामध्ये श्रीकृष्ण विजयी झाले होते.
 • Ramayana And Mahabharata Facts In marathi
  मयासुर
  रामायणात रावणाची पत्नी मंदोदरीचे वडील मयासुर होते. मयासुर ज्योतिष तसेच वास्तूचे जाणकार होते. महाभारतात युधिष्टिरच्या राजसभेच्या भवनाचे निर्माण मयासुर यांनी केले होते. या सभा भवनाचे नाव मयसभा ठेवण्यात आले होते. मयसभा अत्यंत सुंदर आणि भव्य भवन होते.

Trending