Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi

येथे आहे पद्मावतीचे मंदिर, यामुळे खिलजी झाला होता शत्रू; वाचा संपूर्ण कथा

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 10, 2017, 11:41 AM IST

मागील काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी पद्मावती चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. या चित्रपटाच्या कथेवरून बरेच वाद

 • Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi
  मागील काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांनी पद्मावती चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. या चित्रपटाच्या कथेवरून बरेच वाद सुरु आहेत. राजस्थानच्या चित्तौडगढ येथे एका मंदिरात पद्मावती म्हणजे पद्मिनीची मूर्ती स्थापित आहे. याच स्वरूपावरून राणीचे स्वरूप दाखवण्यात आले आहे. राणीच्या सौंदर्याविषयी असेही सांगितले जाते की, त्या पाणी पिताना पाणी त्याच्या गळ्यातून खाली जाताना दिसत होते. परंतु राणी पद्मिनी असल्याचे कोणतेही ऐतिहासिक प्रमाण आढळून येत नाही. परंतु मलिक मोहम्मद जायसी यांच्या महाकाव्य पद्मावतमध्ये सर्वात पहिले राणी पद्मिनीचा उल्लेख आढळून येतो. हे महाकाव्य या घटनेच्या 240 वर्षांनंतर रचले गेले आहे. या व्यतिरिक्त राजस्थानच्या प्रचलित मान्यता आणि गीतांमध्ये राणी पद्मिनीचा उल्लेख आढळतो. आज आम्ही तुम्हाला राणी पद्मावतीची कथा सांगत आहोत...

  कोण होती राणी पद्मावती
  राणी पद्मावतीच्या वडिलांचे नाव गंधर्वसेन आणि आईचे चंपावती होते. राणी पद्मावतीचे वडील गंधर्वसेन सिंहल प्रांताचे राजा होते. त्यांचे लग्न चित्तौडचे राजपूत राजा रावल रतन सिंहसोबत झाला होता. मान्यतेनुसार रावल रतन सिंह पूर्वीपासून विवाहित होते. त्यानंतर त्यांचे लग्न पद्मावती राणीसोबत झाले. त्यावेळी राणी पद्मावतीच्या सौंदर्याची चर्चा सर्वदूर होती. राजाच्या एका फितूर झालेल्या सेवकाने खिलजी वंशाचा शासक अलाउद्दीन खिलजीसमोर राणी पद्मावतीच्या सौंदर्याची खूप प्रशंसा केली. हे सर्व ऐकून खिलजी राणी पद्मावतील पाहण्यासाठी आतुर झाला. त्याने चित्तौडच्या किल्ल्यावर आक्रमण केले.

  पुढील स्लाईड्सवर वाचा, पद्मावतीशी संबंधित इतिहास...

 • Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi
  काय झाले हल्ल्यानंतर
  हल्ल्यानंतर तह करण्यासाठी त्याने राजा रतन सिंहसमोर प्रस्ताव ठेवला की, राणी पद्मावतीला तो आपल्या बहिणीप्रमाणे मानतो आणि त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे. त्यानंतर राजा रतन सिंह यांनी राज्याच्या रक्षणासाठी हा प्रस्ताव मान्य केला. राणी पद्मावती आरशात चेहरा दाखवण्यासाठी तयार झाली. हे गोष्ट अलाउद्दीनला ही बातमी समजताच तो खूप खुश झाला परंतु त्याच्या मनात काहीतरी वेगळेच होते.
 • Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi
  राणीच्या सौंदर्यावर मोहित खिलजीने रतनसिंहला बंदी बनवले
  राणी पद्मावतीला पाहिल्यानंतर खिलजीने राजा रतन सिंहसमोर तह करण्याचे नाटक केले. परत आपल्या शिबीराकडे निघाल्यानंतर अलाउद्दीनसोबत राजा रतन सिंहही होते. त्यावेळी संधी साधून खिलजीने रतन सिंह यांना बंदी बनवले आणि त्यांच्या बदल्यात राणी पद्मावतीची मागणी केली. चौहान राजपूत सेनापती गोरा आणि बादल यांनी खिलजीला हरवण्यासाठी एक चाल खेळली आणि त्यानुसार संदेश पाठवला की, सकाळी राणी पद्मावती यांना खिलजीकडे पाठवले जाईल.
 • Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi
  गोरा आणि बादल खिलजीच्या खिबिरात दाखल झाल्यानंतर
  दुसऱ्या दिवशी सकाळी 150 पालख्या किल्ल्यातून खिलजीच्या शिबीराकडे निघाल्या. रतन सिंह यांना बंदी करून ठेवलेल्या ठिकाणी पालख्या थांबल्या. पालख्या पाहून रतन सिंह यांना वाटले की, राणी पद्मावती येथे आल्या आहेत. त्यावेळी ते स्वतःला खूप अपमानित समजू लागले. परंतु त्या पालख्यांमध्ये राणी नव्हती आणि दासीही नव्हत्या. पालख्यांमधून अचानक सशस्त्र सैनिक उतरले आणि त्यांनी राजा रतन सिंहला कारागृहातून मुक्त करून किल्ल्याकडे घेऊन निघाले. या युद्धामध्ये सेनापती गोरा वीरगतीला प्राप्त झाले परंतु बादलने रतन सिंह यांना सुखरूप किल्ल्यावर पोहोचवले. 
 • Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi
  खिलजीची योजना फसली
  खिलजीने क्रोधीत होऊन चित्तौडवर आक्रमण केले. सौन्याने किल्ल्यात प्रवेश करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु किल्ल्यात प्रवेश करू शकले नाहीत. त्यानंतर खिलजीने किल्ल्याची घेराबंदी केली. यामुळे किल्ल्यातून खाद्य, पाणी हळू-हळू समाप्त होऊ लागले. शेवटी रतन सिंहने किल्ल्याने दरवाजे उघडण्याचे आदेश दिले आणि युद्ध करताना ते वीरगतीला प्राप्त झाले. ही बातमी राणी पद्मावतीला समजल्यानंतर त्यांनी विचार केला की आता खिलजीचे सैन्य चित्तौड सर्व पुरुषांना मारून टाकणार. आता चित्तौडच्या महिलांकडे दोनच पर्याय होते, जोहरसाठी तयार होणे किंवा विजयी सैन्यासमोर अपमानित होऊन शरण जाणे.
 • Sanjay Leela Bhansali Rani Padmavati Story In marathi
  तेव्हा राणी पद्मावतीने जोहरचा पर्याय निवडला 
  त्यानंतर सर्व महिलांनी एक विशाल चिता रचली आणि राणी पद्मावतीसहित सर्व महिलांनी त्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःला संपवले. ही सर्व घटना खिलजीचे सैन्य पाहत राहिले. सर्व महिलांचे वीरमरण पाहून पुरुषांनी केशरी वस्त्र आणि पगडी धारण करून शेवटपर्यंत खिलजीच्या सैन्याचा विरोध केला. त्यानंतर विजयी सैन्य किल्ल्यात दाखल झाले परंतु त्यांना तेथे फक्त राखच दिसली.

Trending