Home | Jeevan Mantra | Pauranik Rahasya Kathaa | Story Of 8 Wives Of Lord Krishna

कधी हरण तर कधी युद्ध करून अशाप्रकारे श्रीकृष्णाने केले होते 8 लग्न

जीवनमंत्र डेस्क | Update - Aug 09, 2017, 09:31 AM IST

श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी सण साजरा केला जातो. या वर्षी हा सण 15 ऑगस्ट मंगळवारी आहे.

 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी सण साजरा केला जातो. या वर्षी हा सण 15 ऑगस्ट मंगळवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णशी संबंधित रोचक गोष्टी सांगत आहोत. भगवान श्रीकृष्णाविषयी सांगितले जाते की, त्यांच्या सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. यामागचे कारण असे आहे की, नरकासुराच्या कारागृहात बंदी असलेल्या हजारो राजकुमारीकांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केल्यानंतर या सर्व राजकुमारीकांनी श्रीकृष्णाला पती मानले आणि श्रीकृष्णानेसुद्धा यांचा पत्नी रुपात स्वीकार केला. यामुळे यांच्या पत्नींची संख्या हजारांमध्ये आहे. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या मुख्य 8 राण्या होत्या, ज्या पटराणी म्हणून प्रसिद्ध झाल्या. या सर्व राण्यांची एक रोचक कथा आहे.

  रुक्मिणी
  देवी राधा भगवान श्रीकृष्णाची प्रेयसी बनून राहिली परंतु श्रीकृष्णाच्या प्रमुख पटराणी रुपात सर्वात पहिले रुक्मिणी देवींचे नाव घेतले जाते. या विदर्भ देशाच्या राजकुमारी होत्या आणि यांनी श्रीकृष्णाला आपले पती मानले होते. परंतु यांचा भाऊ रुक्मीला यांचे लग्न चेदी नरेश शिशुपालशी करण्याची इच्छा होती. यामुळे रुक्मिणीचे प्रेमपत्र वाचून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण करून त्यांच्याशी लग्न केले.

  पुढे जाणून घ्या, या 8 कन्या कशा बनल्या श्रीकृष्णाच्या पटराण्या....

 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  कालिंदी
  भगवान श्रीकृष्णाची दुसरी पटराणी देवी कालिंदी मानल्या जातात. या भगवान सूर्यदेवाच्या पुत्री आहेत. यांनी श्रीकृष्णाला पती रुपात प्राप्त करण्याची कठोर तपश्चर्या केली होती. यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने सूर्यदेवाकडे कालिंदीचा हात मागितला.
 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  मित्रवृंदा
  भगवान श्रीकृष्णाची तिसरी पटराणी मित्रवृंदा आहेत. या उज्जैनच्या राजकुमारी होत्या. भगवान श्रीकृष्णाने स्वयंवरात सहभागी होऊन मित्रवृंदाला आपली पत्नी बनवले होते.
 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  सत्या
  भगवान श्रीकृष्णाच्या चौथ्या पटराणीचे नाव सत्या आहे. काशीचे नरेश नग्नज‌ित् यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक विचित्र अट होती. त्या अटीनुसार जो व्यक्ती सात बैलांना एकाचवेळी वेसन घालेले तो सत्याशी लग्न करेल. श्रीकृष्णाने ही अट पूर्ण करून सत्याशी लग्न केले.
 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  जांबवंती
  ऋक्षराज जांबुवंतची मुलगी जांबवंती श्रीकृष्णाची पाचवी पटराणी होती. स्यमंतक मणीसाठी जेव्हा श्रीकृष्ण आणि जांबवंत यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा जांबवंतच्या लक्षात आले की, श्रीकृष्णच त्यांचे आराध्य श्रीराम आहेत. त्यानंतर जांबवंतने जांबवंतीचे लग्न श्रीकृष्णाशी केले.
 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  रोहिणी
  भगवान श्रीकृष्णाच्या सहाव्या पटराणीचे नाव रोहिणी होते. रोहिणी गय देशाचे राजा ऋतुसुकृत यांची मुलगी होती. काही पुराणांमध्ये यांचे नाव कैकयी किंवा भद्रा असे आढळून येते. रोहिणीने स्वयंवरामध्ये श्रीकृष्णाला स्वतः पती रुपात स्वीकार केले होते.
 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  सत्यभामा
  भगवान श्रीकृष्णाची सातवी पटराणी होती सत्यभामा. ही सत्राजितची मुलगी होती. सत्राजितने प्रसेनची हत्या केल्याचा आणि स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप श्रीकृष्णावर लावला होता. श्रीकृष्णाने हे दोन्ही आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध केले आणि स्यमंतक मणी सत्राजितला परत दिला. त्यानंतर सत्राजितने सत्यभामा आणि श्रीकृष्णाचे लग्न लावून दिले.
 • Story Of 8 Wives Of Lord Krishna
  लक्ष्मणा
  भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या पटराणीचे नाव लक्ष्मणा होते. स्वयंवरमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यात वरमाला घालून लक्ष्मणाने पती रुपात श्रीकृष्णाचा स्वीकार केला.

Trending